अष्ट दानें
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
१ आमान्न,
२ उदकुंभ,
३ गाई,
४ वस्त्र,
५ भूमि,
६ शय्या ( डाळी ),
७ छत्री,
८ आसन.
याप्रमाणें अष्टदानें आहेत.
“ परलोकांत त्या त्या दानाचें फल मृतास मिळावें म्हणून ही अष्ट दानें करितों ” असा संकल्प करावा. दश दानांप्रमाणें ब्राह्मणांची पूजा करून हीं दानें द्यावी.
१ आमान्नदानाचा मंत्र :- “ अन्न हें लक्ष्मीरूप व विष्णुरूप आहे. हें सर्व ब्रह्मांडाचें पोषक आहे; तें जन्मजन्मांतरी मृतास मिळो. ”
२ उदकुंभदानाचा मंत्र :- “ हा पाण्यानें भरलेला घडा ब्रह्माविष्णुमहेश या तीन देवांनीं युक्त आहे. याच्या दानानें पुण्य देणारा धर्मराज संतुष्ट होवो. ”
३ गाई, ४ वस्त्र व ५ भूमि देतेवेळचे मंत्र :- “ वर लिहिले आहेत.
६ शय्यादानाचा मंत्र :- “ कृष्णाचें शयन जसें लक्ष्मीविरहित नसतें तसें मृताचें शयन जन्मजन्मान्तरी स्त्रीविरहित नसो. ”
७ छत्री देतेवेळचा मंत्र :- “ देवा, इहलोकीं व परलोकीं उन्हाचे तापापासून मृताचें रक्षण कर. हें छत्र तूं प्रसन्न व्हावें म्हणून तुला देतों. मृताचें सदोदित कल्याण असो. ”
८ आसनदानाचा मंत्र :- हे त्रैलोक्यनाथा कृपानिधे देवा, या आसनानें तूं प्रसन्न हो, व मृताचें रक्षण कर. वृषोत्सर्गाचे अंगभूत म्हणून निराळीं आणखी आठ दानें देतात. ती -
३ आमान्न दानें तीन, ४ तीळ, ५ उदकुंभ, ६ गाई, ७ वस्त्रे, ८ सोनें, याप्रमाणें आहेत. दान मंत्र वरती आलेच आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP