अग्नीचें पुनः संधान
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
प्रयोजन :- विवाह झाल्यावर पतिपत्नी यांणीं गृह्याग्नीची स्थापना करून गृहस्थाश्रमामध्यें त्याचें अव्याहत रक्षण केलें पाहिजे, असा शास्त्राचा नियम आहे. परंतु वस्तुतः गृह्याग्नि बाळगणारे फारच थोडे आहेत. गृह्याग्नीचा मध्येंच विच्छेद म्हणजे लोप झाल्याबद्दल प्रायश्चित्त करावयाचें तें मृतानें केलें नसल्यानें कर्त्यास केलें पाहिजे. याकरितां संकल्प खालीं लिहिल्याप्रमाणें करावे. “ अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या पित्याचा ( अगर चुलत्याचा वगैरे ) गृह्याग्नि बंद पडला त्यामुळें त्या दिवसापासून आजपर्यंत झालेल्या पापाचा परिहार होऊन परमेश्वर - प्रीति होण्याकरितां प्रत्येक वर्षाबद्दल एक कृच्छ्र प्रायश्चित्त सूतकांतीं मी करेन, अथवा त्याऐवजी गाई किंगा यथाशक्ति निष्क्रयद्रव्य मी सूतकांती देईन. ” “ गृह्याग्नि विच्छेदानें लोप पावलेल्या संध्याकाळ व सकाळच्या होमाचे, तसेंच अमावस्या व पौर्णिमा या दिवशीं करावयाच्या स्थालीपाकाचें साहित्य म्हणजे तांदूळ व तूप वगैरे सूतकांतीं देईन अगर त्याबद्दल निष्क्रयद्रव्य ब्राह्मणांस देईन. ”
नंतर आचमन व अमंत्रक प्राणायाम करून “ अग्नि विच्छेद झाल्यामुळे दहन करण्यासाठीं अवश्य असलेल्या अग्नीचें मृतासाठीं आधान ( स्थापना ) करतों, ” असा संकल्प करावा; व यथाविधि “ हे अग्नि तूं सर्वव्यापी आहेस; तुझी कोणी निंदा करीत नाहींत. खरोखर तूं गतिशील आहेस. तुझ्या ज्वाला आहुतीमुळें कार्यसमर्थ व सर्वगत होतात; त्या ज्वालांनीं युक्त होत्साता आत्मास आरोग्य दे. ” (तै. ब्रा. २-४-१-९)
( हा मंत्र कृष्णयजुर्वेदांत आहे असें जगदीश्वर छापखान्यांत छापलेल्या पोथींत लिहिलें आहे, परंतु कोणतेही श्रुतींत किंवा सूत्रांत उपलब्ध झाला नाहीं. ) “ या प्रेत रूप यजमानाचे मांस खाण्याची इच्छा हें माझें अग्नि करीत आहेत ते अग्नि या निजविलेल्या प्रेतरूप हविषाला अनुकूल असोत व या प्रेताला स्वर्गलोकाला पोहोंचवोत. ’
या मंत्रांनीं अग्न्याधान करावें, म्हणजे गृह्याग्नि सिद्ध होतो.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP