मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें| स्फुट पदें श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें महावाक्यपंचीकरण ग्रंथ चौचरणी वोव्या स्फुट श्लोक सोलीव सुख शुक आख्यान ध्रुवाख्यान रुक्मिणी स्वयंवर हिंदुस्तान ओव्या संतमाळा श्री रामदास श्री कल्याणकृत अष्टपदी हें महिमान स्मरणाचें गणपति शारदा श्रीगुरु श्रीराम मारुती शंकर देवी स्फुट पदें श्रीकल्याणकृत पदें - स्फुट पदें ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण स्फुट पदें Translation - भाषांतर १. ( राग - कल्याण; ताल - दादरा ) साधवपायीं । रत कांही साधका ॥ध्रु.॥निर्विकारी देव मोठा । त्याची प्रतिमा नाहीं उपमा । साधुरूप पाहीं रत कांहीं. ॥१॥मायातीत तूं ब्रह्ममूर्ति । आशारहितु पाशरहितु । रत काहीं. ॥२॥मोक्षपाणी भवरिपु तो । कल्याण जपतों निसिदिनीं । रत कांहीं. ॥३॥२. ( राग - काफी; ताल - दीपचंदी ) रामनामाचें भंडार लुटा । काळ गिळोन टाका गटगटा ॥ध्रु.॥कीर्तनरंग भरला मोठा । येकमेकासी स्वानंदें भेटा ॥१॥लाज सांडोनि मारी हांक मोठा । नामबळें फांडुं काळपोटा ॥२॥साधुसंतांसि आवळोनि भेटा । मग कल्याण नंदा वैकुंठा ॥३॥३. ( चाल - साधुसंता मागणें ) जाले कीर्तन शेवट गोड करा । मनीं धरा श्रीजानकीच्या वरा ॥१॥कीर्तनरंगीं वाजवा करटाळी । नामघोषें पातकां होय होळी ॥२॥येथूनी कल्याण साम्राज्य सुखरासी । आवघे उठा ओवाळा राघोबासी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP