श्रीकल्याणकृत पदें - देवी

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


१. ( चाल - सामर्थ्याचा गाभा )
रघुविरवरदे वरमाते । वर सत्वर मम मातें ।
अंतर विवरविं निगमातें । परतर पावविं उगमाते ॥ध्रु.॥
सुरसा नवरस रसदानी । नारद तुंबर वरदानी ।
फणिवर विधिहर सुखदानी । अखंड ध्यानीं तव ध्यानीं ॥१॥
महिजळनळनिळ व्यापक तूं । रजतमसात्त्विक रूपक तूं ।
भवभयभ्रमतमलोपक तूं । जनवनसज्जनदीपक तूं ॥२॥
सकळिक जननी जनमाया । काया माया मुळमाया ।
साधु मुनिजन उन्मनिया । हरिजन कल्याणें उपाया ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP