श्री कल्याण - श्री रामदास

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अविद्याभ्रमें भ्रांत होऊनि ठेलों । घनानंदसूखास मूकोन गेलों ।
तया अशोच्या जीवासि केला प्रबोधु । नमस्कार माझा तया दासबोधा ॥१॥
स्मृती न्याय मीमांसकें तर्कशास्रें । श्रुती वेद वेदांत वाक्यें विचित्रें ।
मुमुक्षा जना दाविला मार्ग साधा । नमस्कार माझा तया दासबोधा ॥२॥
स्तुती भक्त ज्ञानी विवेकी विरागी । गुरुशिष्य ते लक्षणें आत्मयोगी ।
गुणत्रैविभागीं बरें चित्त वेधा । नमस्कार माझा तया दासबोधा ॥३॥
महावाक्य तत्वादिकें पंचिकर्णे । खुणा लाधती नित्य नेमें विवर्णें ।
बरें शोधिला पाहतां आत्मशोधा । नमस्कार माझा तया दासबोधा ॥४॥
मना उन्मना साधना हे चि आहे । विवेकें विचारें विवंचूनि पाहे ।
गुणातीत होसी हरे भूतबाधा । नमस्कार माझा तया दासबोधा ॥५॥
जनीं सज्जनीं प्रीति हे ची धरावी । घडीनें घडी सार्थकाची करावी ।
तया वाचितां नूरवे कामक्रोधा । नमस्कार माझा तया दासबोधा ॥६॥
गुरूअंजनें लेउनी ज्ञान नेत्रीं । सदा पाठ वीसं वदे जो वगत्रीं ।
तयालगि तारी असंख्या प्रसिद्धा । नमस्कार माझा तया दासबोधा ॥७॥
प्रभू राम दासासि कल्याणकर्ता । नुरे सर्वथा पाहतां भेदवार्ता ।
अनंता२ अखंडा निज ज्ञानसिद्धा । नमस्कार माझा तया दासबोधा ॥८॥

॥ श्रीरामदासार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP