श्रीकल्याणकृत पदें - शारदा

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


१. ( राग - काफी; ताल - त्रिवट )
रंगीं येईं माते शारदे । बुद्धि देईं मातें माते शारदे ॥ध्रु.॥
हरिहरांतर सकळिक अंतरीं । व्यापक अंतरीं जीवनकळा ॥१॥
स्युविरवरदा कविवरवरदा । कल्याणवरदा योगलिळा ॥२॥

२. ( राग - कल्याण; ताल - दादरा )
ब्रह्मसुते माते वो वर दे दे ॥ध्रु.॥
सज्जनजीवनी । मुनिजनमोहनी । राघववरदा तूं वो वो ॥१॥
सकळीक त्रयलोक हरिहरादिक । जीवनकळा सकळा तूं वो वो ॥२॥
रामउपासक चिंतिती अंतरीं । विजयी कल्याण करीं तूं वो वो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP