श्री कल्याण - ध्रुवाख्यान
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
धृवाची कथा सत्पथा मोक्ष दावी । शुकें जी मुखें सेविली ते वदावी ।
रवी भूप जो दीप उत्तान साचा । तपोधीर्य जो सूर्य सत्कीर्ति साचा ॥१॥
सुरति सुनति दोघी राजभार्या प्रसिद्धा । सवतिपण इसाळे चालती पूर्ण स्पर्धा ।
सुत उभय तयांचे थोर लावण्यखाणी । विषमसम नरेंद्रू बैसवी जानु दोनी ॥२॥
कसे बाळ तेजाळ लावण्यखाणी । मुखें बोलवी राव तो रम्यवाणी ।
म्हणे जन्ननी श्रेष्ठ कां त्यास मानी । मनीं खेद अत्यंत मानीत हाणी ॥३॥
क्रिडत जाय कुमार स्वमंदिरीं । जननी लोणमुखेंदु सुखादरी ।
स्वनयनी धरू२ पाहतसे जसें । दुडदुडा धरिलें करि राजसें ॥४॥
कठिण शब्द अयुक्त चि मांडिलें । पदलते उदरावरि ताडिले ।
न रडतो शिशुराज शिरोमणी । नमनरूप पुसे मग जन्ननी ॥५॥
मातें काये निमित्य ताडणपदा श्लोकाक्षराच्या पदा ।
कैचें रे हतभाग्य तूं पद तुला या अंगिकारी पदा ।
यातें प्राप्तमतें किमर्थ न घडे ऐसे पुसे जन्ननी।
पूर्वी क्लेश विशेष भोगित पदें देवाचिये अर्चनीं ॥६॥
जावें घोर अरण्य दुर्घट दरी कीं पर्वती कर्मरी ।
निर्वाणीं त्यजि प्राण हा मग पदा देईल तो श्रीहरी।
सत्रासें जननी छळी मग निघे माता नमस्कारुनी ।
सन्मार्गे चि प्रबोधिलें जननिये तूं धन्य हो या जनीं ॥७॥
पुसेना स्वमाये निघे काननासी । दिसेना पुढें मार्ग नेत्रांबुजासी ।
पथीं थोर आरण्य पुक्लाक सीळा । पडे तो रडे चिंतितो मेघनीळा ॥८॥
रडत राजशिशू अनवाणी । स्मरतसे स्मर पूर्वजवाणी ।
वनचरें गज व्याघ्र किकाटती । निबिड रात्र सिंह्यादिक गर्जती ॥९॥
गगनिं देवऋषी हरि गातसे । नभगती सुख तन्मय जातसे ।
स्मरण बाळ स्वकीर्तनिं ऐकतां । परम तोष शिशूवर वंदिता ॥१०॥
स्वकीय तो पुसतां चि वदे तया । भजन आत्मसुखें न वदे तया ।
हरि तुला तरि भेटवितो मुला । म्हणत जात असे प्रूभच्या स्थळा ॥११॥
सहस्राक्षें तेव्हाम जननिरुप घेऊनि जवली ।
वळी नाना बुद्धी परि ह्लदयिं त्याते न कळवी ।
म्हणे ये वेल्हाळा तुजविण बहू शीण मजला ।
झरे पान्हा कां पां कठिणपण हें आजि तुजला ॥१२॥
हरी नाना विघ्न अचळ स्मरणीं दास रमती ।
तमी नाना ऐसा सुरपति करी थोर कुमती ।
कथा वार्ता साधू दिनजनकृपाळा झडकरी ।
करा साह्ये आतां स्मरण करितें बाळ निकुरी ॥१३॥
निरोपेत ब्रह्मात्मज धांवताहे । अकस्मात येऊनि संमोखिताहे ।
पदारूढ निर्द्बंद कल्याण वाचा । वसे तो चिरंजीव जो सूर्य साचा ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP