श्रीकल्याणकृत पदें - शंकर

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


१. ( राग - शंकराभरण; ताल - दादरा )
चंद्रमौळी हर हर चंद्रमौळी ॥ध्रु.॥
गळां रुंडमाळा । उर्ध्वपुंड्र ल्याला ॥१॥
चिताभस्म अंगीं । जटाधारी जोगी ॥२॥
त्रिशूळ डमरु हातीं । करी खापरी धरी ॥३॥
शतकोटीचें बीज । जना सांगतों गुज ॥४॥
ग्रंथशोधन करीतो । त्रैलोक्या वांटीतो ॥५॥
व्याघ्रांबरधारी । वेष्टिला विखारीं ॥६॥
निजनाम कल्याणकारी । निवाला अंतरीं ॥७॥

२. ( राग - कानडा; ताल - त्रिवट )
हर हर हर हर सुखधामा । योगींद्र सुंदर जितकामा ।
सज्जनमुनिजनविश्रामा । रघुविरमानस आरामा ॥ध्रु.॥
सुरवरमंडन शूळपाणी । पिनाकपाणी शुभवाणी ।
अगणित महिमा पुराणीं । प्रतापसिंधु गुणखाणी ॥१॥
गजमुख षण्मुख निज ताता । स्मरहर भवहर भवत्राता ।
परतरपावन पददाता । भोळा शंकर हर म्हणतां ॥२॥
काशायअंबर निशाणी । दितीकुळकंदन घमशानी ।
अखंड राहे स्मशानीं । कविवर म्हणती ईशानी ॥३॥
गिरिजावर गुरु सुखरासी । जनवनपावन पुण्या रासी ।
स्मरतां कर्पुरगौरासी । कल्याणकर दासासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP