हें महिमान स्मरणाचें

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


श्रीराम

जेथें श्रीरामनामाचा कडकडाट । तेथें भवसमुद्रीं पायेवाट ।
पायेरि करूनिया वैकुंठ । होती प्रविष्ट परब्रह्मीं ॥१॥
रामनामांकित नर । बुडऊं न शके भवसागर ।
श्रीराममुद्रांकित मी वानर । सुखें परपार पावलों ॥२॥
नित्य श्रीरामनामस्मरण । तेथें वीर्य धैर्य कल्याण ।
ब्रह्म पावती सनातन । हें महिमान स्मरणचें ॥३॥
जेथें श्रीरामनामविस्मरण । तेथें अकीर्ति अपेश अकल्याण ।
अतिनिंद्यत्वें पापी पूर्ण । अध:पतन महा नरकीं ॥४॥
यालागी साक्षपें आपण । समूळ सांडावें विस्मरण ।
नित्य करितां श्रीरामस्मरण । कीर्ति कल्याण निज विजये ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP