श्री कल्याण - ओव्या संतमाळा

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


आत्मयारामाचा मुगुट सुभट । कारुण्यतेजें मुद्नल भट ।
निवृत्ति सुरेख टिळा नीट । मुक्ताक्षता मुक्ताई ॥१॥
आकर्णपूर्ण उभय नयन । भानु कूर्म अवलोकन ।
नासीक सरळ सुंदर जाण । आचार्यस्वामी विराजे ॥२॥
मुखारविंदीं आनंद । तो चि शोभे रामानंद ।
नामया ज्ञानी  कर्ण प्रसिद्ध । वाचा नरसिंहसरस्वती ॥३॥
कुंडलें तळपती मकराकार । मुकुंदराज मुक्तेश्वर ।
कुंठी शोभती सुमनहार । कबीर जसवंत तुळशीचे ॥४॥
उभय कुचाचें स्थान परम । नारायण आणि अच्युताश्रम ।
मन वाचन विश्राम । आत्मा रामदासस्वामी ॥५॥
आजानुबाहो लंबायमान । सालया येकाजनार्दन ।
वीरकंक ण विराजमान । कृष्णदास केशवाचे ॥६॥
धनाजाठ तो धनुष्यभावा । अमोघ तुणीर तुकावा ।
कृष्णयाज्ञवल्की जाणवा । यज्ञोपवीत हदईचें ॥७॥
नाभी मिराई  सधर । कटिसूत्र तो सोनार ।
पीतांबर दासोदिगंबर । शांतिवसन तो जयराम ॥८॥
ऐसी साधुरूपें आनंदमूर्ती । शोभला दिसे अद्बयभक्ती ।
विमळ रंग तनु । प्राप्ती । रंगमूर्ती विराजे ॥९॥
चरणी ब्रीदांचा घोष । सुरदास आणि रोहिदास ।
उभय पाउलें विशेष । कल्याण आणि दत्तात्रय ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP