अभंग १४
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - भूप
हा ब्रह्मानंद नाम सोहळा ॥
तुझ्या भजनाचा गोपाळा ॥धृ॥
गाता हृदयी ये प्रेम उमाळा ॥
प्रेमाश्रूंनी भरुनी ये डोळी ॥१॥
भक्तिभावनेने दाटला गळा ॥
दृष्टीपुढे दिसे कृष्ण सावळा ॥२॥
काय सांगू तो आनंद आगळा ॥
प्रेमादरे दासी करी नमन घननीळा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP