अभंग १
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - खंबावती
मन खुलले फुलले नामीं तुझ्या ॥
सुगंध दरवळे अंतरी माझ्या ॥धृ॥
हृत् कमलांतील नाम मधु पराग ॥
सेवुनी तृप्त होई श्रीकृष्ण भृंग ॥१॥
प्रेमरस सेवुनी होई तो गुंग ॥
हृत्कमळ पाकळ्या होती मग बंद ॥२॥
त्यांतची झाला कृष्णभृंग बद्ध ॥
प्रेमभक्तितुनी हरि न होई मुक्त ॥३॥
ऐसा भक्तिचा नाम महिमा गात ॥
दासीनें गोवीला कृष्ण हृदयांत ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP