राग - देस

आळविते तुजला भक्तीप्रेमानें ॥
गाउनी भजन अती आवडीनें ॥धृ॥
गोड मधुर नाम तुझें देवा ॥
खुलवी अंतरीं या हृदया ॥१॥
तव नाम भजन गुंगवी जना ॥
ऐसा तुझा असे नाम महिमा ॥२॥
संतांचें हे अमोल बोधामृत ॥
श्रद्धेनें म्हणतां होई आपुले हित ॥३॥
घुमे अंतरीं नाद तो सतत ॥
दासी रंगली पूर्ण त्यांत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP