अभंग ४
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांड
( चाल : डोळे थकले माझे देवा )
शंख चक्र गदा पद्मधर ॥
तोची हा पांडुरंग ॥ पंढरीश ॥धृ॥
उभा विटेवरी करद्वय कटेवरी ॥
वाट पाहे भक्तांची हरी, आतुर ॥१॥
विठ्ठल नामाचा घोष ऐकुनी ॥
द्रव येई हरीचे अंत:करणी ॥२॥
म्हणे मी उभा एथ भक्ता कारण ॥
भक्तजन भेटता आनंदीत हो मन ॥३॥
कृपा दृष्टी सतत, आम्हां दीनावरी ॥
दासी म्हणे ठेवा तुम्ही निरंतरी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP