राग - दुर्गा

अलंकापुरीचा महान ईश ॥
तोची भक्तरज श्री ज्ञानेश ॥धृ॥
दीन जनांची प्रेमळ माऊली ॥
भक्तांवरी असे कृपेची साऊली ॥१॥
आनंद वाटे मग होता दर्शन ॥
चित्ता होई अती समाधान ॥२॥
डोई ठेवीता समाधीवरी ॥
अंतरी ऊठती आनंद लहरी ॥३॥
माय माऊली माझी ज्ञानाई ॥
अखंड वास करी दासी हृदयीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP