अभंग ५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - जय जयवंती
( चाल : सद्गुरु नायके )
जिकडे पाहावे तिकडे श्रीहरी दिसे ॥
हरिमय जगत हें सर्व भासे ॥धृ॥
सकल प्राणीयात हरी हा वसे ॥
हरीविण रिता ठाव नसे ॥१॥
ऐसे गुरुबोधाचे उमटले ठले ॥
हृदयाभीतरीं ते दृढ झाले असे ॥२॥
कृष्णमुरारी मम हृदयीं वसे ॥
निरंतर आनंदमय जीवन असे ॥३॥
दासीला हरिविण दुजे कांहीं नसे ॥
कृष्णप्रेमांत अखंड रमली असे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP