अभंग ८
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - बागेश्री
श्रीहरीवरी करीता प्रेमभक्ती ॥
आंगी येई नवोदित शक्ती ॥धृ॥
हरीगुण प्रेमे गाण्या गीती ॥
आवडी गाऊनी करू स्तुती ॥१॥
प्रभुसी भजनाची आवड अती ॥
प्रेमे त्यांत रंगवु आपली वृत्ती ॥२॥
सर्वकाळ असावे हरीरूप चित्ती ॥
मुखी नाम चित्ती राम ही उत्तम गती ॥३॥
दासी मागे हेच देवा तुम्हांप्रती ॥
शेवटची आस पुरवा ही विनंती ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP