अभंग ६
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - पीलु
चाल : नाव किनारे लगाव
रक्शिले मज संकटी ॥ हरीने ॥
आला धाऊनी हाकेला ॥धृ॥
भक्ती - प्रेमाचा हरी भुकेला ॥
जाणतो शुद्ध भावनेला ॥आला॥१।
दृढ श्रद्धेने आळवूया हरीला ॥
गाऊन प्रेमे हरी भजनाला ॥२॥
दासीने हरीपदी वाहुनी तन मन ॥
हरीकृपे निर्भय केले जीवन ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP