मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवसंहिता|पंचम पटल| शिवसंहिताफ़लकथनम् पंचम पटल योग प्रकरण भोगरूपयोगविघ्नविद्याकथनम् धर्मरूपयोगविघ्नकथनम् ज्ञानरूपविघ्नकथनम् चतुर्विधयोगकथनम् मृदुसाधकलक्षणम् मध्यसाधकलक्षणम् अधिमात्रसाधकलक्षणम् अधिमात्रतमसाधकलक्षणम् प्रतीकोपासनाकथनम् मूलाधारपद्मविवरणम् स्वाधिष्ठानचक्रविवरणम् मणिपूरचक्रविवरणम् अनाहतचक्रविवरणम् विशुद्धचक्रविवरणम् आज्ञाचक्रविवरणम् सहस्रारपद्मविवरणम् राजयोगकथनम् राजाधिराजयोगकथनम् शिवसंहिताफ़लकथनम् पंचम पटल - शिवसंहिताफ़लकथनम् महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे. Tags : shivasanhitaमराठीशिवसंहिता शिवसंहिताफ़लकथनम् Translation - भाषांतर जो बिद्धिमान् साधक उपरोक्त मंत्राचा अठ्ठावीस लक्ष जप करील तो महाबलवान्, कामदेव म्हणजे कामदेवासारखा रूपवान् व विद्याधरांचा स्वामी होईल. तीस लक्ष जप करणारा साधक ब्रह्मदेव व विष्णूसारखा होतो आणि साठ लक्ष जप केला; तर तो रुद्रासारखा होतो. ऐंशी लाख जपसंख्या करणारा साधक अमरत्व व सर्वप्रियता प्राप्त करतो. जर साधकाने एक कोटी मंत्रजप केला; तर तो महायोगी होऊन परमपदात लीन होतो. हे पार्वती ! अशा प्रकारचे मंत्रजपाचे साधन करणारा योगी तिन्ही लोकांमध्ये अत्यंत दुर्लभ आहे.श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! एक त्रिपुरस्वरूप व त्रिपुरान्तक शिवच परमकारण आहेत. त्यांचे पद किंवा चरणकमल अक्षय, शांत, अप्रमेय म्हणजे प्रमाणरहित व अनामय म्हणजे रोगरहित आहेत. हे चरणकमल अक्षय, शांत, अप्रमेय म्हणजे प्रमाणरहित व अनामय म्हणजे रोगरहित आहेत. हे चरणकमल बुद्धिमान् योगीसाधकच स्वत:च्या इच्छाबलाने प्राप्त करतात यात संदेह नाही. हे महेश्वरी ! ही शिवविद्या म्हणजे शिवाचे शास्त्र हे महान् शास्त्र किंवा महाविद्या आहे म्हणजे शिवविद्या अर्थात् माहेश्वरी किंवा शांभवी विद्या ही महाविद्या आहे. ही विद्या सर्व प्रकरे गोपनीय म्हणजे गुप्त व श्रेष्ठ आहे.श्रीशंकर म्हणतात, मी सांगितलेले हे शास्त्र गुप्त असून बुद्धिमान् लोक केव्हाही हे शास्त्र प्रकट करीत नाहीत अर्थात् गुप्त ठेवतात. ज्या साधकाला सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा आहे त्याने ही हठविद्या अत्यंत गुप्त ठेवावी; कारण की ही विद्या गुप्त ठेवावी; कारण की ही विद्या गुप्त राहीली; तर वीर्यवती म्हणजे सामर्थ्ययुक्त राहते आणि ही विद्या प्रकट केली; तर ती निर्वीर्य म्हणजे सामर्थ्यहीन होते. जो बुद्धिमान् साधक दररोज प्रथमपासून शेवटपर्यन्त या शिवसंहितेचा पाठ करतो त्याला क्रमाक्रमाने म्हणजे हळू हळू योगसिद्धी प्राप्त होते यात काहीही संशय नाही. जो विद्वान् साधक या शिवसंहितेचे पूजन करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते.सर्व मुमुक्षू पुरुषांना, साधूंना, हे शास्त्र ऐकणार्यांना व क्रियावान् साधकांना सिद्धी अवश्य प्राप्त होते; परंतु क्रियाहीन मनुष्याला हे कसे संभवनीय आहे ? अर्थात् क्रियाहीन मनुष्य काहीही करू शकत नाही व त्यामुळे त्याला सिद्धीही प्राप्त होऊ शकत नाही. यासाठी अंतरबाह्यपणे संगतीचा त्याग करून म्हणजे इंद्रियांमध्ये अर्थात् भोगात व लोकात आसक्त न होता सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे विधिविधानपूर्वक क्रियेचे म्हणजे योगासाधनेचे अनुष्ठान करणार्या साधकाल इच्छित लाभाची प्राप्ती झाल्याने संतोष होतो.जो गृहस्थसाधक इन्द्रियांमध्ये आसक्त न होता योगसाधन करतो तो मुक्त होतो. योगक्रियांमध्ये तत्पर असणार्या म्हणजे नियमित योगसाधन करणार्या गृहस्थसाधकाल जप केल्याने सिद्धी प्राप्त होते; या करिता गृहस्थसाधकाने योगसाधनासाठी प्रयत्न करणे उचित आहे. याच अर्थ असा की, बायको, मुले, धन, परिस्थिती इत्यादि कोणत्याही गोष्टी गृहस्थसाधकाच्या आड येत नाहीत किंवा त्या धोंड ठरत नाहीत.स्त्रीपुत्रादींनी पूर्ण असलेल्या घरात राहूनही जर गृहस्थसाधक संग सोडून देऊन म्हणजे मनातून त्यांच्या विषयीची आसक्ती काढून टाकून आन्तरिकरूपाने योगसाधनात प्रवृत्त होईल; तर त्यालाही सिद्धीची चिन्हे दिसू लागतात व साधना करता करता तो नेहमी आनंदात क्रीडा करतो. याचा अर्थ असा की, अंतरबाह्य संतत्याग करून साधनरत राहणारा साधक अतिम शिवसामरस्यात्मक सिद्धी प्राप्त करून सिद्ध होऊ शकतो.अशा प्रकारे श्रीशिवसंहितेतील हरगौरीसंवादयुक्त योगशास्त्राचे कथन करणारे पाचवे पटल समाप्त झाले. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP