पंचम पटल - योग प्रकरण
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
श्रीभगवतीदेवी पार्वती म्हणाली की, हे ईश्वरा ! हे प्रिय शंकरा ! ! योगाभ्यासी साधकांना योगाभ्यास करताना संसारात जी जी विघ्ने उपस्थित होतात ती ती तुम्ही मला सांगा. याचा अर्थ असा की, योगाभ्यास करणार्या साधकाला साधनकालात अनेक प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागतो. ही विघ्ने कोणकोणती आहेत हे समजले म्हणजे ती टाळून साधन करता येणे सुलभ व्हावे व साधकभक्तांवर उपकार व्हावेत या उद्देशाने पार्वतीने या विघ्नांबद्दल जिज्ञासा प्रकट केली आहे.
श्रीशिवशंकर म्हणाले की, हे देवी पार्वती ! योगसाधनामध्ये जी विघ्ने किंवा बंधन उपस्थित होतात ती मी तुला सांगतो. तू ती लक्षणे ऐक. मनुष्याला मोक्षामध्ये आड येणारे भोग हे परमबंधन आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP