पंचम पटल - मध्यसाधकलक्षणम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
मध्यम साधकाची लक्षणे अशी असतात असा साधक सामान्य बुद्धीचा, क्षमाशील, पुण्यफ़लप्राप्तीच्या इच्छेने शुभकर्म करणारा, प्रिय बोलणारा, सर्व कार्यात किंवा सर्व विषयात मध्यस्थ राहणारा म्हणजे एकांतिक मताचा त्याग करून नेहमी सुवर्णमध्य गाठणारा आणि सर्व स्थितीमध्ये समान भाव ठेवणारा म्हणजे हर्ष - शोक, सुख - दु:ख इत्यादि द्वंद्वांचा त्याग करणारा असतो. या सर्व लक्षणांनी युक्त असलेल्या साधकाला मध्यम साधक म्हणतात. अशा प्रकारच्या साधकाची ही लक्षणे जाणून सद्गुरूंनी लययोगाच्या साधनाचा उपदेश करावा; कारण लययोग हा मुक्तीचा मार्ग आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP