पंचम पटल - मृदुसाधकलक्षणम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
मृदुसाधकाची लक्षणे अशी असतात. असा साधक मंदोत्साही, मूढचित, व्याधींनी ग्रासलेला, गुरूची निंदा करणारा, लोभी, पापबुद्धीने यक्त, खूप भोजन करणारा, स्त्रीच्या ताब्यात राहणारा, चंचल, घाबरट, रोगी, पराधीन, अत्यंत निष्ठुर, मंद आचरण असणारा व मंद वीर्याचा म्हणजे पराक्रमशून्य असतो. या लक्षणांनी युक्त असलेल्या पुरुषसाधकाला मृदुमानव असे म्हणतात. असा साधक मंत्रयोगाचा अधिकारी असतो. गुरूची कृपा प्राप्त केल्यावर जर अशा साधकाने प्रयत्नपूर्वक निरंतर साधन केले; तर त्याला बारा वर्षात सिद्धी म्हणजे शिवसामरस्यात्मक अंतिम अवस्था प्राप्त होते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP