पंचम पटल - अधिमात्रसाधकलक्षणम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
अधिमात्र साधकांची लक्षणे अशी असतात. असा साधक स्थिर बुद्धीचा, लययोगात तत्पर किंवा समर्थ, स्वाधीन म्हणजे स्वतंत्र अर्थात् कोणाच्याही अधीन नसणारा, वीर्यवान् म्हणजे शक्तिशाली, महाशय म्हणजे विशाल किंवा विस्तृत दृष्टिकोन असलेला, दयावान्, क्षमावान्, सत्यवान्, म्हणजे असत्यापासून दूर राहणारा, शूर, समाधियोगात श्रद्धा ठेवणारा, गुरुचरणकमलांची पूजा करणारा आणि नेहमी योगाभ्यासात रत असणारा असा असतो. अशी लक्षणे किंवा गुण असणार्या साधकाला अधिमात्र साधक म्हणतात. अशा साधकाने सहा वर्षे निरंतर अभ्यास केल्यास त्यास सिद्धी प्राप्त होते. सद्गुरूने अशा साधकाची लक्षणे जाणून या प्रकारच्या धीट पुरुषसाधकाला सांग म्हणजे सर्व अंगांसहित हठयोगाचा उपदेश करावा.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP