मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - शिजला तो सर्प काढिलें झां...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


शिजला तो सर्प काढिलें झांकण । पाहे तो सुवर्ण तोंडावरी ॥१॥
सुवर्ण देखोनी सुखी जाहाली मनीं । बाई हरिखोनी सांगे नाम्या ॥२॥
सांगितलें वर्तमान नाम्यापासीं । नामा म्हणे तिसी पाहूं सोनें ॥३॥
सुवर्ण आणुनी ठेवियेलें पुढें । काय केलें वेडे नामा म्हणे ॥४॥
कशासाठी माझ्या स्वामीसी पीडिलें । कांगे कष्टी केलें देवराया ॥५॥
मेळविलें द्विज तया नामयानें । वांटियलें सोनें ब्राम्हाणासी ॥६॥
तेव्हां राजईनें आकांत मांडिला । नामा वेडा केला पांडुरंगें ॥७॥
सुवर्णासारखी वस्तु ते वांटिली । भुली ते घातली नामयासी ॥८॥
नामदेवी तिनें बहु जाच केला । कृपाळु पावला गोंदा म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP