मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - नैवेद्याचा नेम असे दामाजी...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


नैवेद्याचा नेम असे दामाजीसी । नित्य विठ्ठलासी न्यावें बोणें ॥१॥
बोणें दाखवावें मग अन्न ध्यांवें । ऐसा तो सद्भाव त्याचे मनीं ॥२॥
ऐसें करितां दिन कांहीं क्रमिले । दामाजी चालिले ग्रामांतरा ॥३॥
दामाशेटी काय म्हणे गोणाईसी । नित्य विठोबासी न्यावें बोणें ॥४॥
गोणाई बोलिली सांगा नामदेवा । करील तो सेवा विठ्ठलाची ॥५॥
दामाजीनें पुत्र नोलाविला नामा । करीं मेघ: श्यामा सेवा नित्य ॥६॥
नित्यानित्य न्यवें विठोबासी बोणें । मग अन्न घेणें आज्ञा केली ॥७॥
अवश्य म्हणोनी लागला चरणासी । धरिलें पोटासी नामदेवा ॥८॥
नामदेवी हातीं समर्पिलें बोणें । गेला तो तेथुनी गोंदा म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP