नामदेवाचें चरित्र - नामदेवा कैसा हा रे नफा के...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
नामदेवा कैसा हा रे नफा केला । नैवेद्य तो नेला विठ्ठलासी ॥१॥
नैवेद्य नेऊनि ठेवियेला पुढें । प्रेमें बोले गोड नामदेव ॥२॥
नामदेव म्हणे जेवावें विठ्ठला । माथा ठेवियेला चरणांवरी ॥३॥
नामदेव माथा ठेवी चरणांवरी । न जेवीच परी पांडुरंग ॥४॥
न जेवी म्हणोनी नामा शोक करी । मुख पाहे हरि प्रीति करोनी ॥५॥
प्रेमें नामा काय म्हणे विठ्ठलासी । कांरे न जेविसी पांडुरंगा ॥६॥
माझे पितयाचे हातें तूं जेविसी । मज दुजें पाहसी पांडुरंगा ॥७॥
घरासी मी आतां बोणें नेऊं काई । मारील गोणाई मज आतां ॥८॥
काय करूं आतां देवा हो श्रीहरी । नामा विनंति करी गोंदा म्हणे ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP