नामदेवाचें चरित्र - विठ्ठल रुक्माई भक्त नामदे...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
विठ्ठल रुक्माई भक्त नामदेव । नित्यानि सद्भाव जेवितसे ॥१॥
सेवा करितां बहु दिवस क्रमिले । नातवन आलें फार दिवसे ॥२॥
कांहीं नाहीं घरीं द्रव्य आणि धन । राजाई ते म्हणे गोणाईसी ॥३॥
काय खावें आतां असो कोणे परी । लाविलें दारोदारीं विठ्ठलानें ॥४॥
उपवास सोसूं किती आतां दिवस । घालूं या पोरास काय आतां ॥५॥
विठ्ठलानें कांहीं बरें नाहीं केलें । नामया वेडें केलें पांडुरंगें ॥६॥
वेडें करूनि आम्हां जाच तूं करिसी । पोट मारविसी मायबापा ॥७॥
किती दु:ख सोसूं आतां या शरीरीं । करीन निर्धारीं जीवघात ॥८॥
चौपोरांसहित घालीन भीमे उडी । लागेन पैलथडी गोंदा म्हणे ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2015
TOP