श्रीगुरूदत्त योगः - महावेध

श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.


महावेध
महावेध --
महावेधस्थितो योमी कृत्वा पूरकमेकधी: ।
वायूनां गतिमावृत्य निभृतं कंठमुद्रया ॥
समहस्तयुगो भूमौ स्फि़चौ संताडयेच्छनै: ।
पुटद्वयमतिक्रम्य वायु: स्फुरति मध्यग: ॥
महावेधोऽयमभ्यासान्महासिद्धिप्रदायक: ।
वलीपलितवेपदभ्य: सेव्यते साधकोत्तमै: ॥
एतत्त्रयं महागुहयं जरामृत्यु विनाशनम् ।
वहिनवृद्धिकरं चैव हयाणिमादिगुणप्रदम् ॥ (ह. प्र.)
रूपयौवनलावण्यं नारीनां पुरुषंविना ।
भूलबन्धमहाबन्धौ महावेधं विना तथा ॥
महाबन्धं समासाद्य उड्डानकुम्भकं चरेत् ।
महावेध: समाख्यातो योगिनां सिद्धिदायक: ॥
महाबन्धमूलबन्धौ महावेधसमन्वितौ ।
प्रत्यहं कुरुते यस्तु स योगी योगवित्तम: ॥
न मृत्युतो भयं तस्य न जरा तस्य विद्यते ।
गोपनीय: प्रयत्नेन वेधोयं योगिपुङ्गवै: ॥

महाबंधस्थित होऊन, पूरक करुन जालबंध करावा. नंतर तळहात भुईवर टेकून हातांवर भार देऊन, दोन्ही कुल्ले वर उचलून भुईवर हळूहळू आपटावे. म्हणजे वायु इडा व पिंगला यांचा त्याग करून सुशुम्नेमध्यें प्रवेश करितो. नंतर कांहीं कुंभक करुन पुन: रेचक करावे. इडा, पिंगला व सुषम्ना यांचें ऐक्य झाल्यानें योगी अमर होतो. त्याला आणिमादि सिद्धि प्राप्त होतात. जरेमुळें शरीरास वळया पडल्या असतील, अंगाला कंप सुटत असेल तर हे सर्व दोष महावेधाच्या अभ्यासानें दूर होतात. दिवसांतून आठ वेळां तरी हया बंधाचा अभ्यास करावा. त्यामुळें पुण्यसंचय होतो. साधकानें महामुद्रा, महाबंध व महावेध हे विशेष गुप्त ठेवावे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-12-23T02:59:20.7430000