मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| श्लोक प्रार्थनेचे निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - श्लोक प्रार्थनेचे समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ श्लोक प्रार्थनेचे Translation - भाषांतर कृपाळूपणें भेटि दे रामराया । वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया । जनामाजिं लौकीक हाही न सूटे । उदासीन हा काळ कोटें न कंठे ॥१॥सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांड जीवी करावी । देहदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपीं भजावें ॥२॥सदा चक्रवाकासि मार्तंद जैसा । उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३॥भवाच्या भयें काय भीतोसि लंडी । धरींरे मना धैर्य धाकासि सांडीं । रघूनायकासारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥४॥स्वधामासि जातां महाराजराजा । हनुमंत तो ठेविला याचि काजा । सदा सर्वदा रामदासासि पावे । खळें गांजिल्या ध्यान सोडोनि धांवे ॥५॥राम राम राम राम सितारम सिताराम । नंतर जयजयकार ॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP