मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| रविवार निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - रविवार समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ रविवार Translation - भाषांतर ॥ अभंग ॥ धन्य सूर्ववंश पुण्यपरायण । सर्वही सगूण समुदाव ॥१॥समुदाव काय सांगूं श्रीरामाचा । अंतरीं कामाचा लेश नाहीं ॥२॥लेश नाहीं तया बंधू भरतासी । सर्वहि राज्यासी त्यागियेलें ॥३॥त्यागियेलें अन्न केलें उपोषण । धन्य लक्षूमण ब्रह्मचारी ॥४॥ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक । श्रीरामीं सार्थक जन्म केला ॥५॥जन्म केला धन्य वाल्मीक ऋषीनें । धन्य तीं वचनें भविष्याचीं ॥६॥भविष्य पाहतां धन्य बिभीषण । राघवीं शरण सर्व भावें ॥७॥सर्व भावें सर्व शरण वानर । धन्य ते अवतार विबुधांचे ॥८॥विबुधमंडण राम सर्वगुण । अनन्या शरण रामदास ॥९॥॥ भजन ॥ रामा रामा हो रामा ॥॥ अभंग ॥ दासाची संपत्ति राम सीतापती । जिवाचा सांगती राम एक ॥१॥राम एक माता राम एक पिता । राम एक भ्राता सहोदर ॥२॥सहोदर विद्या वैभव कांचन । सर्व हा स्वजन राम एक ॥३॥राम एक स्वामी राम हा कैवारी । लाभ या संसारीं राम एक ॥४॥राम एक ध्यान । राम समाधान रामदासीं ॥५॥॥ भजन ॥ तूं माय मी लेंकरूं । राघवा नको विसरूं रे नको विसरूं ॥आरत्या॥ आरती रामाची ॥ किरटि कुंडलें माला वीराजे । झळझळ गंडस्थळ घननीळ तेनू साजे । घंटा किंकिणी अंबर अभिनव गति साजे । अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे । जयदेव जयदेव जय रघुवीरेशा । आरती निर्जरवर ईशा जगदीशा । जय० ॥१॥राजिवलोचन मोचर सुरवर नरनारी । परतर पर अभयंकर शंकरवरधारी । भूषण मंडित उभा त्रिदशकैवारी । दासा मंडण खंडण भवभय अपहारी ॥२॥ जयदेव० ॥॥ आरती बहिरोबाची ॥ दक्षिणदेशामाजीं भैख तो देव । क्षेत्रपाळ वंदी लोकत्रय भाव । भक्तासी देखूनि चरणीं दे ठाव । देवाचा तारक भैरव देव । जयदेव जयदेव जय भैरव देवा । सद्भावें आरती करितों मी देवा । जय० ॥१॥वामांगीं जोगेश्वरि शोभे सुंदर । कासे पीतांबर वाद्यांचा गजर । भक्तासि देखोनि हरि कृपाकर । रामदास चरणीं त्या मागे थार । जयदेव० ॥२॥॥ आरती खंडोबाची ॥ पंचानन हयवाहन सुरभूषण लीला । खंडामंडित दंडित दानव अवलीळा । मणिमल्ल मर्दूनी धूसर जो पिंवळा । करिं कंकण बाशिंगें सुमनांच्या माळा । जयदेव जयदेव जय जय मल्हारी । वारी दुर्जन वारी निंदक अपहारी । जय० ॥१॥सुरवर सैवर दे मज नाना देवा । नाना नामें गाइन घडे तुझी सेवा । अगणित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर स्मरला जेथें नर पामर केवा । जय० ॥२॥रघुवीरस्मरणें शंकर हदयीं नीवाला । तो हा मदनांतक अवतार झाला । यालागीं आवडीं भावें वर्णीला । रामीं रामदासा जिवलग भेटला ॥ जयदेव० ॥३॥॥ आरती कृष्णाची ॥ करुणाकर गुणसागर गिरिवरधर देवें । लीलानाटक वेष धरिला स्वभावें । अगणितगुणलाधव हें कवणा ठावें । व्रजनायक सुखदायक काय वर्णावें । जयदेव जयदेव जय राधारमणा । आरती ओवाळूं तुज नारायणा ॥ धृ० ॥ जय० ॥१॥ वृंदावन हरिभुवन नूतन तनु शोभे । वक्रांगें श्रीरंगें यमुनातटिं शोभे । मुनिजनमानसहारी जगजीवन ऊभे । रविकुळटीळकदास पदरज त्या लाभे ॥ जय० ॥२॥॥ आरती केदाराची ॥ जयदेव जयदेव जयजी केदारा । दासा संकट वारा भवभय अपहारा ॥धृ०॥ भागीरथिमूळ शीतळ हिमाचळवासी । न लागत पळ दुर्जन खळ संहारी त्यासी । तो हा हिमकेदार करवीरापाशीं । रत्नागिरिवरि शोभे कैवल्यरासी ॥१॥जयदेव० ॥ उत्तरेचा देव दक्षिणे आला । दक्षिणकेदारसें नाम पावला । रत्नासुर मर्दुनि भक्तां पावला । दास म्हणे थोरा दैवें लाधला ॥२॥ जयदेव० ॥ ॥२५॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP