वारांची गीते - सोमवार

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


दंडडमरूमंडित पिनाकपाणी ॥ धृ० ॥ पांच मुखें पंधरा डोळे । गळा साजूक सिसाळें ॥ दंड० ॥१॥
हिमालयाचा जामात । हातीं शोभे सरळ गात । दंड० ॥२॥
मस्तकीं वाहे गंगाजळ । कंठीं शोभे हळाहळ ॥दंड०॥३॥
माथां मोठा जटाभार । अंगीं फुंकती विखार ॥ दंड० ॥४॥
रामीं रामदास स्वामी । चिंतितसे अंतर्यामीं ॥५॥

॥ आरती सांबाची ॥ लवथवती विक्राळा ब्रह्मांडमाळा । विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । लावण्य सुंदर मस्तकीं बाळा । तेथूनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां । जयदेव जयदेव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज विश्वभरा ॥ जय० ॥१॥
कर्पुरगौर भोळा नयनीं वीशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा । भस्माचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय० ॥२॥
व्यांघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मुनिजनमनमोहन सुखकारी । शतकोटीचें बीज वाचें उच्चारी । रविकुळटीळक रामदासा अंतरीं ॥ जय देव० ॥३॥  ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP