मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| शनिवार निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - शनिवार समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ शनिवार Translation - भाषांतर ॥ अभंग ॥ बाप माझा ब्रह्मचारी । मातेपरी अवघा नारी ॥१॥उपजतां बाळपणीं । गिळूं पाहे वासरमणी ॥२॥अंगीं सिंदुराची उटी । जया सोन्याची कासोटी ॥३॥रामकृपेची साउली । रामदासाची माउली ॥४॥॥ भजन ॥ सीताशोक विनाशन चंद्रा । जय बलभीमा महारुद्रा ॥॥ पद ॥ मारुतीचें ॥ मारुती सख्या बलभीमा हो ॥धृ०॥ अंजनीचें वचनांजन लेऊनि । दाखविशी बलसीमारे ॥१॥वज्रतनु बलभीमपराक्रम । संगितगायनसीमारे ॥ मा० ॥२॥दास म्हणे हो रक्षी आम्हां । त्रिभुवनपालनसीमारे ॥ मा० ॥३॥॥ भजन ॥ मारुतिराया बलभीमा । शरण आलों मज द्या प्रेमा ॥ ॥ पद ॥ सामर्थ्याचा गाभा । अहो भीम भयानक उभा । पाहतां सुंदर शोभा । लांचावे मन लोभा ॥१॥हुंकारे भुभु:कारे । काळ म्हणे अरे बारे । विघ्र तगेना थारे । धन्य हनुमंतारे ॥२॥दा्स म्हणे वीर गाढा । घसरित घनसर दाढ । अभिनव हा़चि पवाडा । न दिसे जोडा ॥३॥॥ पद ॥ कैंपक्षी भीमराया । निगमांतर विवराया । ब्रह्मानंद वराया । चंचळ मन आदराया ॥१॥संकट विघ्र हराया । मारकुमार कराया । गुरुपदरेणु धराया । भाविकजन उद्धराया ॥२॥रघुपतिचा कैवारी । संकट विघ्र निवारि । भजन पूजन मंदवारीं । कल्याण जनहितकारी ॥३॥॥ आरती मारुतीची ॥ जयदेव जयदेव जय महारुद्रा । आरत भेटीचें दीजे कपींद्रा ॥ जय० ॥धृ०॥कडकडित ज्वाळा भडका विशाळ । भुभु: करेंकरुनी भोंवडि लांगूळ । थोर हलकल्लोळ पळती सकळ । वोढवला वाटे प्रळयकाळ ॥ जय० ॥४॥तृतीय भाग लंका होळी पैं केली । जानकीची शुद्धी श्रीरामा नेली । देखोनी आनंदें सेना गजजली । रामीं रामदासा निजभेटी झाली ॥ जय० ॥५॥ही आरती भजनाच्या आधीं किंवा धुपारती-नंतर म्हणावी.॥ अभंग ॥ मुकुट किरीट कुंडलें । तेज रत्नांचें फांकलें ॥१॥ऐसा राम माझे मनीं । सदा आठवे चिंतनीं ॥२॥कीर्तिमुखें बाहुवटे । दंडी शोभती गोमटे ॥३॥जडितरत्नांचीं भूषणें । दशांगुलीं वीरकंकणें ॥४॥कासे शोभे सोनसळा । कटीं सुवर्णमेखळा ॥५॥पायीं नूपरांचे मेळे । वांकी गर्जती खळाळें ॥६॥राम सर्वांगीं सुंदर । चरणीं ब्रीदाचा तोडर ॥७॥सुगंधपरिमळ धूसर । झेपावती मधूकर ॥८॥गळां पुष्पांचिया माळा । वामे शोभे भूमीबाळ ॥९॥स्वयंभ सुवर्णाची कास । पुढें उभा रामदास ॥१०॥ ॥२८॥ ॥ एकूण वार - गीतें गीतसंख्या ॥१३३॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP