मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| मंगळवार निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - मंगळवार समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ मंगळवार Translation - भाषांतर ॥ अभंग ॥ सदां आनंदभरीत । रंगसाहित्यसंगीत ॥१॥जगन्माता जगदीश्वरी । जगज्जननी जगदुद्धारी ॥२॥त्रिभुवनींच्या वनिता । बाळ तारुण्य समस्तां ॥३॥बसे आकाशीं पाताळीं । सर्वकाळ तिन्हीकाळीं ॥४॥जिच्या वैभवाचे लोक । हरिहर ब्रह्मादिक ॥५॥सर्व देहा हालविते । चालविते बोलविते ॥६॥मूळमाया विस्तारली । सिद्ध साधकाची बोली ॥७॥भक्ति मुक्ति योगस्थिति । आदि मुक्ति सहजस्थिति ॥८॥मुळीं राम वरदायिनी । रामदास ध्याता ध्यानीं ॥९॥॥ पद ॥ सुंदर रामाबाई । सबराभरित सर्वांठायीं हो । निगमा पार नाहीं । ते म्यां वर्णावी ते काई हो । सुंदर रामाबाई ॥धृ०॥शरयूतीरवासिनी वेधक मुनिमानसमोहिनी हो । सुरवर संजीवनी कैसी शोभत पद्मासनीं हो । उदार एकवचनी दुर्लभ तापसी तपसाधनीं हो । दशरथनृपनंदिनी प्रगटे ऋषिवचनालागुनी हो ॥ सुंदर० ॥१॥निजमस्तकीं वीरजगुंठी त्रिपुंड्र रेखिला लल्लाटीं हो । सुरेख सदटा । भ्रुकटी तेणें सतेज नासापुटी हो । नव वानर गोमटी श्रवणीं कुंडलांची थाटी हो । लावण्याची पेटी उपमे न पुरे मन्मथकोटी हो ॥ सुंदर ॥२॥कटितटीं सोनसळा माजीं सौदामिनीचा मेळा हो । सुवास नाभीकमळा तेणें पडे मधुकरपाळा हो । वामे धरणीबाळा वनितामंडित ते वेल्हाळा हो । चरणस्पर्शें शिळा अहिल्या उद्धरिली अवलीला हो ॥ सुंदर० ॥३॥विशाळ वक्षस्थळीं विराजित उटी चंदन पातळी हो । कंठीं एकावळी माजीं कौस्तभमणी झळफळी हो । अधरीं प्रवाळपाळी मध्येंशोभे दंतावळी हो । रसना रसकल्लोळीं वाचा बोलत मंजुळी हो ॥ सुंदर० ॥४॥आजानुबाह सरळ सुनीळ गगनाहुनी कोमळ हो । सुपाणि रम्य स्थळ देखुनि रवितेज सोज्ज्वळ हो । मुद्रिका फांकती कीळ सतेज ग्रहमंडळ हो । शरकार्मूक सह मेळे शोधित असुर तरुचीं मुळें हो ॥ सुंदर० ॥५॥ चिद्गगनाचा गाभा तैसी सुनीळ अंगप्रभा हो । देखोनि चिद्घनशोभा जैसी कांति चढली नभा हो । रतिनायकवल्लभा देखुनि नागर सांडी दंभा हो । प्रथमारंभ स्तंभाभरणें भूषित शामल शोमा हो ॥ सुंदर० ॥६॥भरत बिभीषण पृष्ठीं सविता गुण मानित उत्कंठीं हो । जोडोनि करसंपुष्टी ध्यानीं मारुतीगानवेष्टी हो । देखुनियां सुखपुष्टी झाली प्रेमरसाची वृष्टी हो । सुख संतुष्टें हर्षें परमेष्टी कोंदे कमळा सृष्टि हो ॥ सुंदर० ॥७॥नव पंकजलोचनी विस्मित करुणामृतसिंचनी हो । शिवसंकटमोचनी दुर्धर रजनीचरभंजनी हो । भवभयसंकोचनी भक्तां निर्भयपदसूचनी हो । रघुकुळउल्हासिनी भोजें विलसत चंद्राननी हो ॥ सुंदर० ॥८॥अव्यक्त पार जीचा विचार खुंटे सहा अठरांचा हो । सुकाळ स्वानंदाचा याचा अंतरला दु:खाचा हो । जगदुद्धार मातेचा उत्तीर्ण नव्हे मी हे वाचा हो । रामदासीं भेदतरंग तुटोनि गेला साचा हो ॥ सुंदर० ॥९॥॥ चाल भुत्याची ॥ ब्रह्मीं माया उदो । त्रिगुण काया उदो । तत्त्वच्छाया उदो । चारी खाणी उदो ॥१॥चारी वाणी उदो । अनंत योगी उदो । विद्या बुद्धि उदो । नाना विधि उदो ॥२॥कारण सिद्धि उदो । आगम निगम उदो । साधन सुगम उदो । ज्ञान संगम उदो ॥३॥देवां भक्तां उदो । योगी मुक्तां उदो । अनंत सिद्धां उदो । उदो दासा उदो ॥४॥॥ आरती ॥ अजरामर पन्नगधर वैश्वानर भाळीं । रसाळवदनें विशाळ नयनांजन भाळीं । शूळी वेष्टित सुरवर किन्नर ते कालीं । हाटक करुणाटक करुणाकल्लोळीं । जयदेवी जयदेवी जय वेदमाते । आरती ओवाळूं तुळजे गुणसरिते ॥ जय० ॥१॥ हंसासन जगजीवन मनमोहन माता । पवनाशन चतुरानन थक्कित गुण गातां । अमृतसंजीवनी अंतसुखसरिता । दासा पालन करितां त्वरिता गुनभरिता ॥ जय० ॥२॥रामाबाई माझे आई । करुणा तुला येऊं दे ॥ ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP