मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| वेडसरपंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - वेडसरपंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ वेडसरपंचक Translation - भाषांतर ॥१॥ पडसादासीं करी वाद ।खळाळाशीं तो विवाद ॥१॥तेथें चालेना मीपण ।शीण पावावा आपण ॥२॥सावधानासवें जावें ।प्रतिबिंबेंसीं भांडावें ॥३॥रामदास म्हणे भावें ।समुद्रासीं गडगडावें ॥४॥॥२॥ संत बोलले बहुविध ।तेथें कैंचें म्हणूं सिद्ध ॥१॥कोणें कोणासीं भाडावें ।कोण्या पंथासीं मोडावें ॥२॥बहु यात्रा पृथ्वीवरी ।बहु शब्द नानापरी ॥३॥नाना सैन्य नाना पुरें ।दास म्हणे ते उत्तरें ॥४॥॥३॥ मया अविद्येचें बंड ।नानाप्रकारीं थोंतांड ॥१॥अवघें सांडूनियां द्यावें ।एक भगवंता पहावें ॥२॥पंचभूतांचा मेळावा ।दृश्य पदार्थ अघवा ॥३॥म्हणे रामीं रामदास ।दृश्य भासे मनोभास ॥४॥॥४॥ आमचे वंशीं कैंचा राम ।एक पिंडींचें नि:काम ॥१॥रामदास्य आलें हातां ।अवघा वंश धन्य आतां ॥२॥बापें केली उपासना ।आम्ही लाधलों त्या धना ॥३॥बंधु अभिलावा टेंकला ।वाट घेउनि भिन्न झाला ॥४॥पोर सकळां संकोचलें ।एक सुखा उधळले ॥५॥रामीं रामदासीं स्थिति ।पाहिली वडिलांची रीति ॥६॥॥५॥ माजीं बांधावा भोंपळा ।तैशी बांधों नये शिळा ॥१॥सारासार निवडावें ।तैसें जाणोनियां ध्यावें ॥२॥रत्न खडे येर खडे ।सगट देतां प्राणी रडे ॥३॥एका ठायीं सोनें लाख ।लाख देता मारी हांक ॥४॥मनुष्य गोड घांस घेतें ।कडु अवघें सांडितें ॥५॥दास म्हणे भक्तिसारा ।नको अभक्ता गव्हारा ॥६॥॥६॥ गगन आडतचि नाहीं ।तैसें निरंजन पाहीं ॥१॥चंचल गुणें सगुणें ।विकार आड तो पावणें ॥२॥सारासारनिवड नाहीं ।प्रत्ययानें पाहें कांहीं ॥३॥कडु विख आणि वावडें ।तया लिगडोनि पडे वेडें ॥४॥तैसें संसाराचें सुख ।आदि अंतीं अवघें दु:ख ॥५॥सुखासारिखे दिसतें ।उदंड दु:ख आहे तेथें ॥६॥दास म्हणे हा वेळसा ।कोणें सोसावा गळसा ॥७॥॥७॥ भगवंताचे भक्तिसाठी ।थोर करावी आटाआटी ॥१॥स्वेदबिंदु आले जाण ।तेंचि भागिर्थीचें स्रान ॥२॥वोळंगता देवराव ।सहज होंतसे उपाव ॥३॥सकळ लोकांचें भाषण ।देवासाठीं संभाषण ॥४॥जें हरवलें सांडलें ।देवावीण कोठें गेलें ॥५॥जठराग्नीस अवदान ।लोक म्हणती भोजन ॥६॥एकवीस सहस्र जप ।होतो करितां साक्षेप ॥७॥दास म्हणे मोठें चोज ।देवीं सहजीं सहज ॥८॥॥८॥ माजीं बांधावा भोंपळा ।तैसी बांधों नये शिळा ॥१॥घेऊं नये तेंचि घ्यावें ।येर अवघेंचि सांडावें ॥२॥विषवल्ली अमरवल्ली ।अवघी देवेंचि निर्मिली ॥३॥अवघी सृष्टीची लगत ।करूं नये कीं झगट ॥४॥अवघेंची केलें देवें ।जें जें माने तेंचि घ्यावें ॥५॥अवघें सगत सारिखेंचि ।वाट मोडे साधनाची ॥६॥दास म्हणे हरिजन ।धन्य जाणे तो सज्जन ॥७॥॥९॥ वेधें भेदावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर ॥१॥मनासारिखें चालावें ।हेतु जाणोनी बोलावें ॥२॥जनीं आवडीचे जन ।तेचि होते हो सज्जन ॥३॥बरें परीक्षावें जना ।अवघे सगट पिटवेना ॥४॥दास म्हणे निवडावें ।लोक जाणोनियां घ्यावें ॥५॥॥१०॥ यथातथ्य आठवेना ।कांहीं हीत तें घडेना ॥१॥कांता ज्याचे बंदिखाना ।नव महिने पतना ॥२॥बारा वर्षे बाळपण ।आंगीं होतें मूर्खपण ॥३॥पुढें तारुण्याचे भरें ।आलें कामाचें विखारें ॥४॥पुढें आलें वृद्धपण ।सवें पातलें मरण ॥५॥दास म्हणे रात्रंदिवस ।नाही मराया अवकाश ॥६॥॥११॥ देवें जन्मासि घातलें ।नाना सुख दाखविलें ॥१॥त्यासि कैसें विसरावें ।पुढें कैसेनि तरावें ॥२॥कुळ समूळ सांभाळिलें ।नानाप्रकारीं पाळिलें ॥३॥दास म्हणे देवावीण ।दुजा सांभाळितो कोण ॥४॥॥१२॥ रात्रंदिवस दुश्चित ।चारी घटका सावचित्त ॥१॥होऊन कीतींनें बैसावें ।भावें भगवंतासि गावें ॥२॥सदा संप्तारकथन ।क्षण एक सावधान ॥३॥दास म्हणे वारंवार ।बहुसाल खबरदार ॥४॥॥१३॥ रात्रंदिवस गव्हार ।फिरतसे दारोदार ॥१॥आपलें मन आटोपावें ।नाहीं तरी फजित व्हावें ॥२॥कल्पनेचें भरोवरीं ।करूं नये तेंचि करी ॥३॥दास म्हणे हें वाढोळ ।आटोपिना तो चांडाळ ॥४॥॥१४॥ काय करितें हें मन ।साक्ष आपुला आपण ॥११॥हित आपुलें करावें ।नाहीं वीर्यलोका जावें ॥२॥काय वासना म्हणते ।आपणास साक्ष येते ॥३॥मन असे बरगळ ।केल्या होतसे होतसे विव्हळ ॥४॥सांडिना हें संसारिक ।कांहीं पाहावे विवेंक ॥५॥दास म्हणे सावधान ।पदरीं बांधलें मरण ॥६॥॥ अभंगसंख्या ॥७५॥ N/A References : N/A Last Updated : March 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP