मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ४१ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ४१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ४१ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणती सूताप्रत । महाभागा ऐकून पुराणें बहुत । मीं होतीं संशयभ्रंत । खेदपूर्ण स्थितींत ॥१॥अन्य पुराणांचें करितां श्रवण । माझे संशय होतील हरण । ऐसा विचार करून । मीं आशा धरिली होती ॥२॥आंत्या मुद्गल पुराण । ऐकिलें तुमच्या मुखांतून । त्यानें संशय दूर होऊन । सूता तूं मज कृताथ केलें ॥३॥परी अद्यापि ह्रदयांत । एक संशय माझ्या असत तो दूर करून स्वस्थानाप्रत । जाई शांतिप्रदा झणीं ॥४॥गणेशाचें रहस्य ज्ञात । होतें त्यासादि बुद्धिमतप्रित । सर्वतिग तें मौद् गलांत । महान आश्चर्य परात्पर ॥५॥तदनंतर व्यासें रचिलें । भारत महाकाव्य भलें । धर्माधर्माचें जेथ झालें । ब्रह्मासायुज्यप्रद व्याख्यान ॥६॥तेथ प्रथम गणनाथाचें पूजन । तैसेंचि केलें त्यानें स्मरण । परी गणेश्वराचें संपूर्णं वर्णन । ग्रंथांत त्यानें न केलें ॥७॥भारत ग्रंथ संपूर्ण होत । महामुनि तैं कृतकृत्य स्थित । हें सारें संदेहातीत । काय हें कौतुक सांग मजला ॥८॥शौनकाचा ऐकून प्रश्न । सूतें स्मरिला आपुला गुरु महान । तत्क्षणीं केलें आगमन । योगीश व्यासानें तेथें ॥९॥त्यास पाहून हर्षसंयुक्त । शौन कादि मुनि तैसा सूत । उठून त्यांचें स्वागत करित । पूजा करून नमिती तयासी ॥१०॥ते हात जोडून उभे राहती । तयांस जवळी बैसविती । व्यास अन्तर्ज्ञानें जाणती । सूत शौनकांचें मनोगत ॥११॥म्हणोनी शौनकाचा प्रश्न । मनीं ठेवून सांगती वचन । विप्रा मी रचिलें भारत महान । यांत संशय कांहीं नसे ॥१२॥त्यांत हा बुद्धिग ब्रह्मसंज्ञित । वर्णिला असे साक्षात । सिद्धिप्रद ब्रह्मरूप असत । मुख्य हाच संमत असे ॥१३॥विकुंठादि लोक समस्त । कथिले मीं नाशिवंत । परी गणेशवर्णन विस्मरत । सिद्धिबुद्धिवरबळे मोहमग्न ॥१४॥तेव्हां मीं अन्य ग्रंथार्थ उद्यत । तैं आकाशवाणी होत । ती मजला उद्देशून म्हणत । गणेशवर्णन पूर्ण करू नको ॥१५॥गणेशानें जनांस मोहविण्यास । रचिली ही माया खास । प्रशस्त करूं नको संपूर्ण रूपास । व्यासा हे वचन स्मरावें ॥१६॥मुद्गल मुनि मुख्यावांचून । अन्य मुनी असमर्थ करण्या वर्णन । गणपतीचें रूप स्पष्ट पूर्ण । ह्यांत कांहीं संशय नसे ॥१७॥हें ऐकून मीं आकाशवाणीस नमित । मुद्गल पुराणीं झालों रत । म्हणून संशयहीन तूं सतत । मौद्गल पुराण भज भक्तीनें ॥१८॥अन्य पुराणांत गणेशरूप वर्णित । ब्रह्यणस्पति बोधदायक उचित । तथापि विप्रादी होती मोहित । न जाणती गजाननासी ॥१९॥सिद्धिबुद्धींचा वर मोहवित । त्या विप्रांसी जगतांत । परी मौद्गल पुराण जो वाचित । गणेश वरदानानें ॥२०॥भक्तीनें मौद्गल पुराण वाचिती । अथवा जे प्रेमें ऐकती । तेच गणेश्वरास पाहती । पूर्णंरूपें जाणती तया ॥२१॥अन्यथा हें शक्य नसत । म्हणून मौदगल भज तूं सतत । आवरें तैं कविदोषविरहित । सर्व पर वस्तु लाभशील ॥२२॥ऐसें बोलून महापति । व्यास जेव्हां थांबती । तेव्हां धूम्रवर्ण तेथ अतिप्रीती । करिती अवचित आगमन ॥२३॥त्यास पाहून ते समस्त । नमिती गणेशास भक्तियुक्त । पूजोनियां स्तवन करित । गाणेश सारे गणपप्रिय ॥२४॥धूम्रवर्ण होऊन संतुष्ट म्हणत । स्वभक्तांसी हास्ययुक्त । सुखकारक वचन मोदयुक्त । माझ्या भक्तांनो ऐका ॥२५॥कलियुगाचा प्रभाव समस्त । खंडिला संपूर्ण मीं सांप्रत । आतां निर्भय फिरा जगांत । मुनिमुख्यहो यापुढें ॥२६॥ऐसें बोलून गणाधीश स्थापित । धरणी तळावर पुनीत । त्यांस धर्मयुक्त करित । मानवांसी कृपेनें ॥२७॥त्या मुनिमुख्यांस आज्ञापित । मौद्गल माझें रहस्यद सतत । जपावें आनंदानें तैं त्वरित । तुमच्या वरा मीं होईन ॥२८॥शित । असे मुद्गल पुराणांत । त्या पुराणाच्या पठणें ज्ञात । होईल अर्थ सविशेष ॥३०॥जेथ मौद्गल पुराण वाचिती । अथवा भक्तीनें जन ऐकती । तेथ माझी नित्य वसती । भक्तिग्रहण लोलुपत्वें ॥३१॥ब्रह्मपुराणांत वर्णित । बुद्धिस्थित रूप अंशतः असत । तेथ मीं निर्गुणाकृति संस्थित । ऐसें रहस्य जाणावें ॥३२॥ब्रह्मांडपुराणीं प्रणवाकार । नानाविध क्रीडाकर । तेथ अंशें विश्वाकार । प्रभावें मीं असे ॥३३॥गाणेशपुराणांत मी मूर्तिमंत । गजवक्त्रादि चिन्हयुक्त । त्यांचा ज्ञानप्रकाशक ज्ञात । सर्वदा प्रसन्न कृपाळू ॥३४॥अन्य पुराणांत मीं वर्तत । शिव विष्णु आदि रूपांत । त्या कलांशे नानाभेदयुक्त । विहार करी स्वेच्छेनें ॥३५॥मौद्गल पुराणीं मीं रत । योगरूप उपनिषदांत । माझ्या सर्व रूपांचा योग कीर्तित । विशेषें या पुराणीं ॥३६॥त्याचें प्रकाशक पूर्ण । योगप्रकाशक संपूर्ण । म्हणोनि मौद्गल प्रिय जाण । त्या सम अन्य पुराण नसे ॥३७॥सृष्टि प्रारंभी मज प्रार्थिती । मुनिअसत्तमहो भावभक्ती । तेव्हां मी वर दिला तयांप्रती । भक्तिविवर्धक भक्तिपूर्ण ॥३८॥म्हणोनि मीं पूर्वी रचिलें । मौद्गल पुराण संपूर्ण भलें । मुद्गलाच्या ह्रदयीं स्फुरविलें । सर्वसौख्यप्रदायक ॥३९॥मीं त्या योग्यास प्रेरणा देत । तैं तो हें दक्षप्रजापती सांगत संपूर्ण पुराण मोदयुक्त । तेव्हांपासून हें पुराण श्रेष्ठ ॥४०॥तदनंतर शिवादि देव सेवित । मरीची आदि महर्षि भावयुत । शेषादिक नर समस्त । सेविती या पुराणासी ॥४१॥मौद्गल पुराणावांचून । माझें यथार्थ रूप ज्ञान । अन्य कोणत्याही साधनें अपूर्ण यानेंच संपूर्ण सर्वप्रकाशक ॥४२॥अन्यत्र माझें स्वरूप वर्णित । पूर्णभावें परी होत । मोह सिद्धिबुद्धिकृत भक्तिप्रत । ऐसें भय तेथ असे ॥४३॥सृष्टिप्रारंभी मज प्रार्थिती । सिद्धिबुद्धि मज भावभक्ती । जगता मोहविण्याची शक्ती । ब्रह्मक्रीडार्थ आम्हां द्यावी ॥४४॥तेव्हां मी तयांस वर देत । मौद्गल पुराण विरहित । मज न जाणतील निश्चित । विश्वें जैसीं ब्रह्में हीं ॥४५॥म्हणून मज मुद्गलस्थित । भजा तुम्हीं एकचित्त । त्यायोगें भक्तिसंयुक्त । संचार करा हो निरंतर ॥४६॥हयाहून अन्य न साधन । माझ्या प्राप्तिस्तव महान । सर्व सिद्धिलाभार्य पावन । द्विजसत्तम हें ऐका ॥४७॥याच्या श्रयणमात्रें होत । नर कृतकृत्य जगांत । यांचें फळ वर्णनातीत । अपार असे मुनिजनही ॥४८॥मुद्गलश्रवणें मीं संतुष्ट । महर्षींनो देईन सकल अभीष्ट । आतां वर मागा जो इष्ट । शंका सारी सोडोनियां ॥४९॥शौनकादि तेव्हं प्रार्थिती । तुमची भक्ति आम्हांप्रती । द्यावी शांतिप्रद जी जगती । जें जें इच्छिलें तें तें प्राप्त होवो ॥५०॥आम्हांसी गाणपत्य करी । सर्वांसी तूं उद्धरी । हाचि द्यावा वर जरी । प्रसन्न तूं आम्हांवरी ॥५१॥तथाऽस्तु ऐसें म्हणत । गणेश ब्रह्मनायक तैं विचारित । व्यासादी सर्वांस ह्रदयावांछित । तोही सांगें तैसेंची ॥५२॥ते सर्वही व्यक्तिगत । गणाध्यक्षास प्रार्थित । त्यांचे पुरवून मनोरथ समस्त । सूतासी म्हणे विघ्नप ॥५३॥नंतर गणेश सूताप्रत । म्हणे सूता महाभागा सांप्रत । वर माग जो इच्छित । महापुण्य तूं केलें ॥५४॥हया द्विजांस मुद्गल पुराण । तूं कथिलें हें महान । आतां तुझ्या भक्तिभावें प्रसन्न । पुरवीन तुझे मनोरथ ॥५५॥त्यानें सांगितलें ईप्सित । गणेश तथाऽस्तु त्यास म्हणत । तदनंतर धूम्रवर्ण अंतर्धान पावत । गजानन स्वानंदस्थ ॥५६॥ते संतुष्टचित्त समस्त । आपापल्य स्थानीं जात । मौद्गल पुराणाचा आश्रय घेत । गणेशासी भजती नेमें ॥५७॥ही मुद्गलोक्तसंहिता असत । वेदप्रशस्त सर्वस्तुत । तेवीस हजार श्लोकयुक्त । तैसीच अर्ध शताधिक ॥५८॥चारशे अठ्ठावीस अध्यास । नव खंडात्मक ही अमेय । सर्व सिद्धिमयी ख्यात ज्ञेत । गणेशभक्तांसी सर्वदा ॥५९॥मुद्गलें ही संहिता कथिली सर्वांच्या हितास्तव भली । शब्दब्रह्म रह्स्ययुक्त झाली । साक्षात ब्रह्मप्रदायिनी ॥६०॥आतां संपूर्ण ग्रंथाची । अवतरणिका वर्णितों साची । प्रथमखंडीं वक्रतुंडाची । कथा चौपन्न अध्यायांत ॥६१॥पहिल्या अध्यायांत । शौनकसूतसंवाद ख्यात । दक्षनंदिविवाद उक्त । असे दुसर्या अध्यायीं ॥६२॥तिसर्या अध्यायीं पार्वतीदेहत्याग । चवथ्यात दक्षचरित सुभग । पार्वतीप्रश्न विचार चांग असे पांचव्या अध्यायीं ॥६३॥सहाव्यांत प्रकृतिपुरुषवरप्रदान । सातव्यांत तत्त्वकृतस्तुति वर्णंन । गुणेशवरप्रदान । आठव्यांत वाचावें ॥६४॥नवव्यांत अष्टधा प्रकृतिवर्णन । दहाव्यांत नाना ब्रह्मांडवर्णन । पंचदेव वरप्रदान । अकराव्यांत वर्णिलें असे ॥६५॥बाराव्यांत ब्रह्माविष्णुविवाद । तेराव्यांत पंचदेवविवाद । गणेशप्रादुर्भाव सुखद । चवदाव्यांत कथिला असे ॥६६॥पंधराव्यांत गणेशप्रसन्नभाव । सोळाव्यांत असे अपूर्व । गणेशगीतासार गौरव । महत्त्वपूर्ण गणेशभक्तांत ॥६७॥शिवपार्वती संवाद समाप्ती । सतराव्यांत त्याची उक्ती । मुद्गल देवदूत करिती । संवाद अठराव्या अध्यायीं ॥६८॥एकोणिसाव्या अध्यायांत । अंगिरा मुद्गलसंवाद ख्यात । गणेशमुद्गलसमागम वर्णित । विसाव्यांत बोधप्रद ॥६९॥एकविसाव्या अध्यायांत । गणेशस्तोत्रोत्तम वर्णन शोभत । मुद्गलवरप्रदान कथित । बाविसाव्या अध्यायीं ॥७०॥तेविसाव्यांत शोभन । मत्सरासुरतपोवर्णन । मत्सरासुरसमागम मोहन । चोविसाव्या अथ्यायीं ॥७१॥त्याच्या सेनेचें वर्णंन । पंचविसाव्या अध्यायीं असून । पाताळविजय त्याचा महान । सविसाव्यांत वर्णिलासे ॥७२॥सत्ताविसाव्यांत इंद्र पराजय । मत्सरासुराचा विजय । अठ्ठाविसाव्यांत अजेय । मत्सरासुराचें चेष्टित ॥७३॥शिवमत्सरासुरसमागम । एकोणतिसाव्यांत शोभन । शिवादींचा पराजय कथन । तिसाव्यांत वर्णिलें असे ॥७४॥दत्तात्रेयसंगम एकतिसाव्यांत । वक्रतुंडप्रादुर्भाव नंतर होत । बत्तिसाव्या अध्यायांत । सुरस असे कथानक ॥७५॥मत्सरासुरविचारवर्णन । तेहेतिसाव्यांत असून । देवासुरयुद्धवर्णन । चवतिसाव्या अध्यायीं ॥७६॥शिवविजयाची कथा अद्भुत । वाचावी पस्तिसाव्यांत । सुंदरप्रियविषयप्रियवध होत । छत्तिसाव्यांत ती कथा ॥७७॥सदतिसाव्यांत मनोरम । मत्सरासुराचा समागम । वक्रतुंडविनय अभिराम । अडतिसाव्या अध्यायांत ॥७८॥तदनंतर वक्रतुंड अंतर्धान । पावले त्याचें वर्णन । एकोणचाळिसाव्यांत मनमोहन । ब्रह्मतपश्चरण चाळिसव्यांत ॥७९॥दंभासुरराज्याभिषेक । एकेचालिसाव्या अध्यायीं वर्णन सुरेख । दंभासुरविजय विवेक बेचाळिसाव्या अध्यायीं ॥८०॥दंभासुरदूतसंवाद । त्रेचाळिसाव्यांत श्रुतिसुखद । दंभासुरविचार बोधप्रद । चव्वेचाळिसाव्यात वर्णिलासे ॥८१॥पंचेचाळिसाव्या अध्यायांत । दंभासुराची शांति होत । वामनवरप्रदान असे वर्णित । सेहेचाळीसाव्या अध्यायीं ॥८२॥वामनचरिताचें वर्णन । सत्तेचाळिसाव्यांत प्रसन्न । ऋचीकगृहस्थाश्रम वर्णन । अठ्ठेचाळिसाव्यांत वाचावें ॥८३॥याज्ञवल्क्य विश्वामित्रसमागम । एकूणपन्नासाव्यांत मनोरम । दिवोदासमहिमा अभिराम । पन्नासाव्यांत वर्णिलासे ॥८४॥काशीशिववरप्रदान । एकावन्नाव्यांत त्याचें कथन । याज्ञवल्क्यनारायणसंप्रश्न । बावन्नाव्या अध्यायीं ॥८५॥नारायणयाज्ञवल्क्यसंवाद । त्रेपन्नाव्यांत कर्णसुखद । वक्रतुंडचरित्र बोधप्रद । चौपन्नाव्यांत समाप्ति त्याची ॥८६॥ऐसा हा प्रथम खंड । जेथ स्तविला वक्रतुंड । तदनंतर एकदंतकथा उदंड । दुसर्या खंडीं शोभली ॥८७॥ब्रह्मसृष्टिप्रारंभ पहिल्या अध्यायांत । नारदशापानिवर्तन दुसर्यांत । तिसर्यांत नारदभक्तिवर्णन ख्यात । मधुकैटकवध चवथ्यांत ॥८८॥पाचव्यांत स्वायंभुववरप्रदान । सहाव्यांत दक्ष कन्यावंश कथन । सातव्यांत भोगमोक्षवर्णन । दत्तचरित्र आठव्यांत ॥८९॥प्रियव्रतराज्यप्राप्तिकथा । नवव्या अध्यायांत गाथा । दहाव्यांत द्वीपवर्णन तत्त्वता । भूगोलवर्णन अकराव्यांत ॥९०॥सूर्यमंडळाचें वर्णन । नवग्रहरथादींचें कथन । ऊर्ध्वस्थ लोकांचें निरूपण । बारा ते चवदाव्यांत ॥९१॥पंधराव्यांत सप्तपाताळ वर्णन । ऋषभ चरित सोळाव्यांत पावन । सतराव्यांत पुलह उपदेश असून । अठराव्यांत भरतमृगदेहत्याग ॥९२॥चौरवध एकोणिसाव्यांत । विसाव्यांत जडभरतरहूगण भेटत । रहूगणांच्या सिद्धिप्राप्तीचें असत । वर्णन एकविसाव्यांत ॥९३॥जडभरतचरित ध्रुवचरित । अक्रनुमें बावीस तेविसाव्यांत । पृथुयशोवर्णन पृथचरित । चोविस-पंचविसाव्यांत ॥९४॥सव्विसाव्यांत प्राचीन ब्रर्हिषचरित । सत्ताविसाव्यांत प्रचेतसचरित । कश्यप सृष्टीचेम वर्णन ख्यात । अठ्ठाविसाव्या अध्यायांत ॥९५॥एकोणतिसाव्यांत वसिष्ठतपवर्णन । तिसाव्यांत पराशरवरप्रदान । पराशरसुतोत्पत्ति कथन । एकतिसाव्या अध्यायांत ॥९६॥गजासुरसैन्याचा वध । बत्तिसाव्यांत असे विशद । गजासुराचा करी वध । त्याचें वर्णन तेहेतिसाव्यांत ॥९७॥चौतिसाव्यांत व्यासमहिमान । पस्तिसाव्यांत शुकोपाख्यान । छत्तिसाव्यांत गौतमचरितवर्णन । नृसिंहमाहात्म्य सदतिसाव्यांत ॥९८॥वराहमाहात्म्या अडतिसाव्यांत । एकोणचाळीसाव्यांत वनोत्पत्ति कथित । अग्निमाहात्म्य चाळिसाव्यांत । च्यवनतपोवर्णन एक्केचाळिसीं ॥९९॥बेचाळिसाव्यांत भृगुचरित । च्यवन माहात्म्य त्रेचाळिसाव्यांत । महासुर-राज्याभिषेक वर्णन ज्ञात । चव्वेचाळिसाव्या अध्यायीं ॥१००॥पंचेचाळिसाव्यांत असे ख्यात । मदासुरस्वर्गविजय वृत्तान्त । तारकासुरसामवर्णन असत । सेहेचाळिसाव्या अध्यायीं ॥१०१॥इंद्रतारकसमागमाचें वर्णन । सत्तेचाळिसाव्यांत असून । इंद्रपराजयकथन । अठ्ठेचाळिसावे अध्यायीं ॥१०२॥शिवादि देव पराजय । मदासुराचा होत विजय । याचें वर्णन असे ज्ञेय । एकूणपन्नास-पन्नासांत ॥१०३॥एक्कावन्नाव्यांत वृत्तान्त । सनत्कुमारदेवसमागमाचा असत । एकदंत प्रसन्नभाव वर्णित । बावन्नाव्या अध्यायीं ॥१०४॥मदासुरपराजय त्रेपन्नाव्यांत । मदासुरशाअंतिप्राप्ति चौपन्नाव्यांत । मदासुरचरितसमाप्ति होत । पंचावन्नाव्या अध्यायीं ॥१०५॥छप्पन्नाव्यांत विनायकाचा होत । प्रवेश काशीनगरींत । भ्रुशुंडीभक्तिवर्णन ख्यात सत्तावन्नाव्या अध्यायीं ॥१०६॥यमशाप वर्णन अठ्ठावन्नाव्यांत । एकोणसाठांत कुंडसंभवचरित । भ्रुशुंडीब्राह्मणत्व वर्णन असत । साठावें अध्यायीं ॥१०७॥एकसष्टाव्यात भ्रुशुंडी बासष्टाव्यांत विनायक चरित । त्रेसष्टाव्यांत शनिसमागम ख्यात । विष्णु दैत्यवर्णन चौसष्टाव्यांत । पासष्टीं पुष्टिपतिउपाख्यान ॥१०८॥तेथे अगस्त्याचा द्रव्यप्रयत्न । सहासष्टाव्यांत कृष्णराधा शापवर्णन । राधाकृष्ण गोलोक प्राप्तिकथन । वाचा सदुष्टाच्या अध्यायांत ॥१०९॥अडुसष्टाव्यांत पुष्टिपति चरित । देवहूतिकर्दम शांति लाभत । त्याचें वर्णन पुढें असत । एकूणसत्तराव्या अध्यायीं ॥११०॥सत्तराव्यांत चिंतामणिहरण । एक्काहत्तरीं कपिलवर प्रदान । ब्राहत्तराव्यांत गणासुरवधवर्णन । गणेश सत्तेचें प्रत्यंतर तें ॥१११॥गृत्समदप्रल्हादांचा संवाद । समाप्त होई सुखप्रद । त्र्याहत्तरांत तें विशद । वृत्त असे द्वितीय खंडीं ॥११२॥चौर्याहत्तराव्या अध्यायांत । चरित्रमाहात्म्य वर्णिलें असत । ऐशापरी देव एकदंत । स्तविला प्रामुख्यें दुसर्या खंडीं ॥११३॥आतां तिसर्या खंडाची । अवतरणिका महोदरचरिताची । चर्चा रवि वालखिल्य प्रश्नाची । प्रथमाध्यायीं तृतीय खंडांत ॥११४॥दुसर्या अध्यायांत । सूर्यास शांतिप्रदान लाभत । सूर्यवरप्रदान वृत्त तिसर्या अध्यायीं ही कथा ॥११५॥चौथ्यांत कामचरित । पाचव्यात स्कंदमाहात्म्य वर्णित । मोहासुरराज्याभिषेक वृत्तान्त । वाचावा सहावे अध्यायीं ॥११६॥मोहासुरविजय वर्णन । सातव्यांत असे त्याचें कथन । आठव्यांत देवर्षिवरप्रदान । मोहासुरज्ञानप्रदान नवव्यांत ॥११७॥दहाव्यांत मोहासुरशांति । अकराव्यांत महोदर अंतर्धान पावती । नरनाराय विष्णु संवाद करिती । वर्णंन त्याचें बाराव्यांत ॥११८॥नरनारायणमार्कंडेय समागम । तेराव्य अध्यायांत अभिराम । चौदाव्यांत मायावर्णन सकाम । पंधराव्यात कालगति वृत्त ॥११९॥सोळाव्यांत युगधर्म वर्णन । सतराव्यांत कलियुग आख्यान । ब्रह्मचर्याश्रम वर्णन । अठराध्या अध्यायांत ॥१२०॥आश्रमधर्म वर्णन एकोणिसाव्यांत । वर्णधर्मप्रकाश विसाव्यांत । देवपितृधर्म वर्णन ख्यात । एकविसाव्या अध्यायीं ॥१२१॥बाविसाध्यांत मांधात्याचें चरित । अंबरीष चरित्र तेराव्यांत । चोविसाव्यांत असे वृत्त । मुचुकुंदचरिताचें ॥१२२॥सगरभगीरथाचें चरित । पंचविसाव्यांत असे वर्णित । सव्विसाव्यांत रामचंद्र चरित । रामायण कथांश हा ॥१२३॥सूर्यं वालाखल्पसंवाद समाप्ती । सत्ताविसाव्यांत त्याची उक्ती । अठ्ठाविसाव्यांत बुधोत्पत्ती । एकोणतिसाव्यांत चरित्र पुरूरव्याचें ॥१२४॥तिसाव्यांतनहुषरित । एकतिसाव्यांत ययातिवृत्तान्त । बत्तिसाव्यांत धनकास व्रत । उपदेशिलें त्याची कथा ॥१२५॥तेहेतिसाव्यांत वर्णन । कृतवीर्यव्रत प्राप्तीचें शोभन । कृतवीर्यचरित पावन । चौतिसाव्या अध्यायीं ॥१२६॥सहस्त्रार्जुनास । निमंत्रण । पस्तिसाव्यांत त्याचें वर्णन । रेणुकाजमदग्निसंजीवनकरण । छत्तिसाव्या अध्यायीं ॥१२७॥सदतिसाव्य आध्यायांत । परशुरामचरित प्रख्यात । हरिवंशाचें वर्णन वर्तत । अडतिसाव्या अध्यायीं ॥१२८॥एकूणचाळिसाव्या अध्यायांत । विष्णुदेहधारणाचें वृत्त । चाळिसाव्यांत पांडवचरित । अपूर्ण असे कथिलेलें ॥१२९॥युधिष्ठिरकृष्ण समागम । एकेचाळिसाव्यांत अभिराम । लक्ष्मीनारायणसंवाद परम । शोभनीय वेचाळिसाव्यांत ॥१३०॥महालक्ष्मीस वरप्रदान । त्रेचाळिसाव्यांत त्याचें वर्णन । ज्ञानादि वरप्राप्तिकथनं । चव्वेचाळिसाव्या अध्यायीं ॥१३१॥पूर्णानन्दावतारवर्णन । पंचेचाळिसाव्यांत त्याचें कथन । सेहेचाळिसाव्यांत कथन । असे ब्रह्मयज्ञाचें ॥१३२॥ब्रह्मयज्ञांत वेदनिर्णय होत । त्याचें कथन सत्तेचाळिसाव्यांत । शुक्रशिष्यसुबोधसंवाद ख्यात । अठ्ठेंचाळिसाव्या अध्यायीं ॥१३३॥एकूणपन्नासाव्या अध्यायांत । सुबोधभक्ति असे वर्णित । पन्नासाव्यांत युघिष्ठिरचरित । श्रवणफल एकावन्नाव्या अध्यायीं ॥१३४॥चौथ्या खंडांत असे प्रख्यात । चतुर्थीव्र्ताचें माहात्म्य अद्भुत । प्रत्येक चतुर्थीची कथा पुनीत । सविस्तर वर्णिली असे ॥१३५॥गजाननाचें हें चरित । वर्णन त्याचें चौथ्या खंडांत । अवतरणिका संक्षेपांत । आतां चतुर्थं थंडांची ॥१३६॥चतुर्थी तिथी तप करित । पहिल्या अध्यायीं त्याचें वृत्त । शुक्ल कृष्ण चतुर्थी लाभत । वरदान दुसर्या अध्यायीं ॥१३७॥प्रतिपदादिव्रतवर्णन तिसर्यांत । दशरथव्रतोपदेश चौथ्यांत । चतुर्थीविवेक वर्णन ख्यात । पांचव्या अध्यायीं चतुर्थ खंडीं ॥१३८॥चन्द्रदर्शनदोषहरण । सहाव्यांत त्याचें वर्णन । सातव्यांत असे कथन । भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रताचें ॥१३९॥आश्विन कार्तिक शुक्ल चतुर्थी । आठव्या नवव्यांत या व्रताची उक्तीं । मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीं । व्रत हें दहाव्या अकराव्यांत ॥१४०॥माघ फाल्गुन चैत्रांत । वैशाख ज्येष्ठ आषाढांत । शुक्ल चतुर्थीचें व्रत । तेराव्या ते सतराव्या अध्यायीं ॥१४१॥श्रावण शुक्ल चतुर्थी व्रत । तैसेंचि मलमास शुक्ल चतुर्थी व्रत । वर्णिलें असे अठराव्यांत । एकोणिसाव्यांत अनुक्रमें ॥१४२॥माघ फाल्गुन चैत्रांत कृष्ण चतुर्थीचें व्रत । त्याचें माहात्म्य विसाव्यांत । एकवीस वाविसाव्या अध्यायीं ॥१४३॥वैशाख ज्येष्ठ आषाढांत । श्रावण भाद्रपद आश्वित कृष्ण पक्षांत । चतुर्थी तिथीव्रत आख्यात । चोविसापासून अठ्ठाविसाव्यांत ॥१४४॥कार्तिक मार्गशीर्ष पौषांत । कृष्ण चतुर्थी मलमासांत । एकोणतिसाव्यापासून असत । वर्णन बत्तिसाव्यापर्यंत त्याचें ॥१४५॥शमीमूळ चतुर्थी व्रताचरण । तेहेतिसाव्यांत त्याचें वर्णन । वसिष्ठ दशरथ संवाद कथन । चौतिसाव्यांत समाप्ति त्याची ॥१४६॥चतुर्थी उद्यापन निरूपण । पस्तिसाव्यांत त्याचें कथन । लोभासुरवप्राप्ति वर्णन । कथा ही छत्तिसाव्यांत ॥१४७॥सदतिसाव्यांत शोभन । लोभासुरास इन्द्रपदप्राप्तीचें वर्णन । विष्णुपराजयाचें कथन । अडतिसाव्या अघ्यायांत ॥१४८॥एकोणचाळिसाव्या अध्यायांत । लोभासुर ब्रह्मांड जिंकित । गजाननाचा प्रादुर्भाव होत । चाळिसाव्या अघ्यायीं ॥१४९॥एकेचाळिसाव्यांत शुक्रोपदेश वर्णंन । आहे अत्यंत सुजाण । लोभासुर शांतिकथन । बेचाळिसाव्या अघ्यायीं ॥१५०॥त्रेचाळिसाव्या अघ्यायांत । देवकृत स्तुतिवर्णन पुनीत । सिंदूरशिवाचा समागम होत । चव्वेचाळिसाव्या अघ्यायीं ॥१५१॥शिवविचारवर्णन । पंचेचाळिसाध्यांत शोभन । शाक्ति मलमाहात्म्य महान । सेहेचाळिसाव्या अघ्यायीं ॥१५२॥गणेशभक्ताधीनत्वाचें वर्णन । सत्तेचाळिसाव्यांत शोभन । शक्ति मलमाहात्म्य महान । सेहेचाळिसाव्या वाचावा ॥१५३॥गणेश निर्माल्य माहात्म्य वर्णन । एकूणपन्नासाव्यांत शोभन । विघ्नासुराचें आश्रमगमन । असे पन्नासाव्या अघ्यायीं ॥१५४॥एकावन्नाव्या अध्यायांत । गजाननचरिताचें महिमान असत । गजाननाचें संपूर्ण चरित । चवथ्या खंडी शब्दबद्ध ॥१५५॥पाचव्या खंडांत विलसत । लंबोदराचें चरित । त्याची अवतरणिका सांप्रतपरिसावी सज्जनहो ॥१५६॥असित नैध्रुव संवादीं तप वर्णन । पहिल्या अध्यायांत पावन । दुसर्यांत भस्मासुरवध कथन । तिसर्यांत क्रोधासुरास राज्यप्राप्ति ॥१५७॥क्रोधासुरब्रह्माण्डविजय चौथ्यांत । देवर्षिवरप्रदान पाचव्यांत । सहाव्यांत देवासुर युद्धवर्णन असत । सातव्यांत क्रोधासुरसमागम ॥१५८॥आठव्यांत क्रोधासुर शांति । नवव्यांत लंबोदर देवर्षिकृत स्तुती । वत्सरा सूरशांति । दहाव्या अघ्यायीं वर्णिली ॥१५९॥अकराव्यांत लंबोदरब्रह्मवर्णन । शक्तस्वरूपावतार वर्णन । बाराघ्या अध्यायांत शोभन । तेराव्यांत शक्तिवरप्रदान ॥१६०॥चौदाव्यांत शिवविष्णुगर्वहरण । वाचावें नंतर पावन । शक्तिविनायक माहात्म्य शोभन । शेषातिदुःख वर्णन सोळाव्यांत ॥१६१॥सतराव्यांत शेषयोगोपदेश । अठराव्यांत शेषाख्यान वर्णन विशेष । मूषकदेवसमागम खास । एकोणिसाव्या अध्यायीं ॥१६२॥मूषकगमायाकरासुरसमागम । विसाव्यात अभिराम । मूषकग अवतार चरित शोभन । असे एकविसाव्या अध्यायीं ॥१६३॥बाविसाव्यांत शक्तिपुत्रचरित । गाणपत्यदीक्षा तेविसाव्यांत । गाणपत्यस्वरूप वर्णन असत । चोविसाव्या अध्यायीं ॥१६४॥पंचविसाव्यांत शमीदंदार । वर लाभति त्याचें वर्णन सुंदर । शमीमंदार स्पर्शमहिमा उदार । सव्विसाव्यांत वर्णिलासे ॥१६५॥सत्ताविसाव्यांत दूर्वोत्पत्ति कथा । तदनंतर दूर्वापत्रस्पर्शमहिमा सर्वथा । एकोणतिसाव्यांत वार्ता । त्रिशिरम चरित्राची ॥१६६॥तिसाव्यांत दूर्वामाहात्म्य वर्णन । एकतिसाव्यांत तुळसीवर्जनकारण । बत्तिसाव्यांत तुलसीवरप्रदान । आकर्षंक जी कथा ॥१६७॥तुलसी समर्पण वर्णंन तेहेतिसाव्यांत । चौतिसाव्यांत रुक्मांगद चरित । गृत्समद गणेश समागम होत । पस्तिसाव्या अध्यायीं ॥१६८॥गृत्समदवरप्रदान । छत्तिसाव्यांत त्याचें वर्णन । गृत्समद नित्यकर्म वर्णन । सदतिसाव्यांत वाचावें ॥१६९॥गृत्समदप्रोक्तमनसपूजा कथन । अडतिसाव्यांत मनमोहन । गृत्समदप्रोक्त ब्राह्मपूजा वर्णन । एकोणचाळिसाव्या अध्यायीं ॥१७०॥चाळिसाव्या अध्यायांत । स्वानंदलोक वर्णन असत । स्वानंदस्थितीचें अद्भुत । वर्णन एकेचाळिसाव्यांत ॥१७१॥बेचाळिसाव्या अध्यायांत । चिंतामणि अन्तर्धान पावत । भक्तिमार्ग वर्णन उक्त । त्रेचाळिसाव्या अध्यायीं ॥१७२॥ध्यानदूर्वादिपूजा विधि वर्णन । चव्वेचाळिसाव्यांत असून । लंबोदर चरिताचें महिमान । पंचेचाळिसाव्या अध्यायीं ॥१७३॥ऐसें हें लंबोदर चरित । पांचव्या खंडीं असे वर्णित । तें वाचितां लाभत । स्वानंद गणेश भक्तांसी ॥१७४॥आतां ऐका अवतरणिका । सहाव्या खंडाची प्रवेशिका । विकट चरिताची प्रेरका । कथा असे हया खंडांत ॥१७५॥प्रथमाध्यायीं शक्तिध्यान । दुसर्यांत शिवविष्णूंस वरप्रदान । कामासुर राज्यप्राप्ति वर्णन । तिसर्या अध्यायीं वाचावें ॥१७६॥चवथ्यांत कामासुर विजय वर्णन । पांचव्यांत मुद्गल देव भेटीचें कथन । भ्रूशुंडी पंचदेव समागम पावन । कथिला महत्त्वें अध्यायीं ॥१७७॥सातव्यांत स्वानंद क्षेत्रस्वरूप वर्णन । नंतर नाना क्षेत्र देवोत्पत्तिवर्णन । आठव्या अध्यायांत शोभन । वाचून आनंद गणेशभक्तां ॥१७८॥मयूरेशद्वारयात्राविधि वर्णन । नवव्या अध्यायीं असून । दहाव्यांत द्वाररहस्य कथन । अकराव्यांत क्षेत्र प्रमाण वृत्त ॥१७९॥मयूरेश क्षेत्रवास करित । त्याचें शुभाशुभ उक्त । बाराव्या अध्यायांत । कथा त्याची वर्णिली असे ॥१८०॥मयूरेश दंडकारण्याप्रत । वरप्रदान अपूर्व देत । तेराव्यांत त्याचा वृत्तान्त । चौदाव्यांत द्वारयात्रा ॥१८१॥देवागारद्वारयात्रा महिमान । पंधराव्यांत त्यांचें वर्णन । गर्भागार यात्रा माहात्म्य वर्णन । सोळाव्या अध्यायांत ॥१८२॥मयूरेश क्षेत्रीं मरणप्राप्ती । सतराव्यांत त्याची ख्याती । गर्भगाराचें प्रमाण वर्णिती । मुद्गल अठराव्या अध्यायीं ॥१८३॥एकोणिसाव्यांत क्षेत्रवासी चरित । मलत्यागयातनावृत्त कथित । यात्रार्थ प्रर्वश फलादि ख्यात । एकविसाव्या अध्यायीं ॥१८४॥बाविसाव्यांत क्षेत्रसंन्यास वर्णन । गणेशकुंडचरित्र नंतर पावन । तेविसाव्यांत त्याचें कथन । नंतर ब्रह्मकमंडलु उत्पत्ति कथा ॥१८५॥चोविसाव्या अध्यायांत । ब्रह्मकमंडलु तीर्थ चरित । असे वृत्त पंचविसाव्यांत । सविसाव्यांत वर्णन सप्ततीर्थाचे ॥१८६॥ब्रह्मकमंडलूंत जीं तीर्थें वसत । त्यांचें वर्णन सत्ताविसाव्यांत । नग्न भैरव प्रशंसा वर्णित । अठ्ठाविसाव्या अध्यायीं ॥१८७॥भ्रुशुंडीदेवेंद्रसंवाद । समाप्त होत । एकोणतिसाव्यांत विशद । मयूरेशक्षेत्रमाहात्म्य सुखद । सामाप्ति तिसाव्या अध्यायांत ॥१८८॥एकतिसांव्यात विकट प्रादुर्भाव । देवदैत्यसमागम अपूर्व । बत्तिसाव्यांत विशेषभव । कामासुरपुत्राचा वध नंतर ॥१८९॥तेहेतिसाव्यांत ती कथा असत । कामासुरविचार चौतिसाव्यात । कामासुर शांत होत । पस्तिसाव्या अध्यायीं ॥१९०॥विकटावतार समाप्त । छत्तिसाव्या अध्यायांत । गुणेशावतार वृत्तान्त । सदतिसाव्यांत वर्णिलासे ॥१९१॥अडतिसाव्या अध्यायांत । बालक्रीडा दर्णन असत । कमलासराचा वध वृत्तान्त । एकोणचाळिसाव्या अध्यायीं ॥१९२॥विष्णु आदींची पराधीनता । चाळिसाव्यांत तत्त्वता । मयूरेशचरित वार्ता । एकेचाळिसाव्या अध्यायीं ॥१९३॥बेचाळिसाव्या अध्यायांत । सूर्यावताराचें चरित । भानुविनायक चरित । त्रेचाळिसाव्यांत कथिलें असे ॥१९४॥विकट वरद चरित । चव्वेचाळिसाव्यांत वर्णित । विकट चरित होत समाप्त । पंचेचाळिसाव्या अध्यायीं ॥१९५॥विकट चरित असे पावन । सहाव्या खंडीं संपूर्ण । सातब्या खंडीं असे वर्णंन । विघ्नराज चरिताचें ॥१९६॥त्यांत पहिल्या खंडांत । दितिशोकाचें वर्णन असत । शिवपार्वतीसमागम कथन । चौथ्या अध्यायीं शोभतसे ॥१९८॥पाचव्यांत ममासुर राज्यभोग वर्णन । तदनंतर विघ्नराजप्रादुर्भाव ज्ञान । सहाव्या अध्यायांत वृत्त शोभन । सातव्यांत गर्वहरण ममासुराचें ॥१९९॥ममासुराची शांति होत । विघ्नेशचरितक्षेत्र युक्त । वर्णन तें नवव्यांत । दहाव्यांत विष्णूचे अवतार ॥२००॥अकराव्यांत असे वर्णन । लक्ष्मीविनायकाचें शोभन । शूर्पकर्णावतार वर्णंन । बाराव्यांत वाचावें ॥२०१॥तेराव्या अध्यायांत । दत्तगीता असे प्रख्यात । चौदाव्यांत दितिवरप्रदान वर्णित । गणेशभक्तां सुखदायक ॥२०२॥पंधराव्यात वर्णन । चतुर्भुजावतार विक्रमाचें शोभन । विघ्नराजचरित महिमान । सोळाव्यांत कथिलें असे ॥२०३॥विघ्नराजाचें ऐसें चरित । सातवा खंड त्यानें शोभत । आठव्या खंडीं धूम्रवर्णं वृत्तान्त । परमादरें वाचावा ॥२०४॥प्रथमाध्यायीं अहंची उत्पत्ति । तदनंतर त्यास राज्यप्राप्ति । ब्रह्मांडविजयाची ख्याति । द्वितीय तृतीय अध्यायांत ॥२०५॥चवथ्यांत मुनिवार प्रदान । पाचव्यांत अहंकाराचें दमन । अहंकारासुरास ज्ञान । उपदेश सहाव्या अध्यायीं ॥२०६॥अहंकार शांतिरूप वर्णंन । सातव्यांत वाचा पावन । धूम्रवर्णावतार समाप्ति कथन । असे आठव्या अध्यायीं ॥२०७॥नवव्यांत धूम्रवर्णं महिमान । दहाव्यांत शिवात्मकावतार वर्णंन । अकराव्यांत पार्वतीगणेशचरित्र शोभन । गुणेशावतार बाराव्यांत ॥२०८॥बाणासुरवरप्रदान तेराव्यांत । त्यापुढें बानासुरवर्णंसंभव चरित । बुद्धावतार पंधराव्यांत । मुद्गलपुराणीं सुरस असे ॥२०९॥सोळाव्या अध्यायांत । धूम्रवर्णं कलीसी जिंकित । युगवरप्रदान ख्यात । सतराव्या अध्यायंत ॥२१०॥युगप्रभावकर्मसिद्धिवर्णंन । अठराव्यांत प्रधान । समासवत्सरचरित कथन । एकोणिसाव्या अध्यायीं ॥२११॥विसाव्यांत मलमासादिव्रत । वरप्रदान लाभत । धूम्रमहिमावर्णन असत । एकविसाव्या अध्यायीं ॥२१२॥कार्तिकमास माहात्म्य ख्यात । असे बाविसाव्या अध्यायांत । वज्रपंजरकथन असत । तेविसाव्या अध्यायीं ॥२१३॥मार्गशीर्षमाहात्म्य साधुचरित । चोविसाव्यांत असे वर्णित । विरोचनवधाचें वृत्त । पंचविसाव्या अध्यायीं ॥२१४॥नाना जनांचें उद्धरण । सव्विसाव्यांत त्याचें वर्णन । शिवदत्तबोध महान । सत्ताविसाव्यांत वाचावा ॥२१५॥अठ्ठाविसाव्यांत कथन । शुकगीतेचें शोभन । शिवभक्तिप्रदान वर्णन । असे एकोणतिसाव्या अध्यायीं ॥२१६॥पुनरपि नानाजप उद्धरण । तिसाव्यांत असून । जालंधरवध कथन । एकतिसाव्या अध्यायांत ॥२१७॥गालवसंशय दूर होत । बत्तिसाव्या अध्यायांत । श्रावाणमासाचें महिमान उदात्त । तेहेतिसाव्या अध्यायीं ॥२१८॥दधीचिधौम्यसंवाद सुखद । पस्तिसाव्यांत बोधप्रद । मलमासमाहात्म्य सौख्यद । पस्तिसाव्यांत वर्णिले असे ॥२१९॥संवत्सरव्रतमाहात्म्यवर्णन । छत्तिसाव्यांत शोभन । विभांडव्रतोपदेश कथन । सदतिसाव्या अध्यायीं ॥२२०॥कल्याणाची दुर्घती । अडतिव्यांत त्याची उक्ती । बल्लाळेश्वराची महती । एकूनचाळिसाव्या अध्यायीं ॥२२१॥चातुर्मास्यव्रतमहिमान । चाळिसाव्यांत पावन । कौंडिण्यब्रह्मसमागम शोभन । एकेचाळिसाव्यांत वर्णित ॥२२२॥बेचाळिसाव्या अध्यायांत । गणेशनाम महिमा ख्यात । चतुर्थीरहस्य असे वर्णित । त्रेचाळिसाव्या ती कथा ॥२२४॥सेहेचाळिसाव्या अध्यायांत । ब्राह्मणस्पत्ययज्ञमहिमाख्यात । त्रिविधजगदाधार निरूपित सत्तेचाळिसाव्या अध्यायीं ॥२२५॥मासांचें माहात्म्य अठ्ठेचाळिसाव्यांत । तदनंतर गणेशह्रदय वृत्तान्त । एकूणपन्नासाव्या अध्यायांत । शेवटीं फलश्रुति वर्णन ॥२२६॥ऐशी पन्नास अध्यायांत । धूम्रवर्णकथा आठव्या खंडांत । नवव्या खंडीं योगचरित । योगगीता यांत असे ॥२२७॥प्रथमाध्यायीं स्वसंवेद्यरूपवर्णन । दुसर्यांत अयोगचरित कथन । तिसर्यांत गणेश स्वरूपवर्णन । चौथ्यांत पूर्णयोगचरित असे ॥२२८॥चित्तभूमिनिरोधे सार्वभौमयोग । पाचव्यांत त्याचें वर्णन सुयोग । योगगीतेंत अंतरंग । प्रथमाध्याय हा अंसे ॥२२९॥सहाव्या अध्यायांत । योगचित्तानुभव सुखशांतियुक्त । योगगीतेत हा असत । दुसरा अध्याय अंतर्गत ॥२३०॥सातव्यांत योगास्थितिवर्णण । योगगीतेचा तृतीय अध्याय शोभन । आठव्यांत योग भ्रष्ठांचें निरूपण । चौथा अध्याय योगगीतेचा ॥२३१॥नवव्या अध्यायांत वर्णंन । अज्ञान्यांचा क्रमयोगकथन । योगगीतेचा अध्याय पांचवा शोभन तदनंतर विभूतियोग ॥२३२॥दहाव्यांत विभूतियोग वृत्त । सहावा अध्याय योगगीतेंत । अकराव्यांत तत्त्वविचार ख्यात । योगगीतेंत अध्याय सातवा हा ॥२३३॥बाराव्यांत शुक्लकृष्णगति । योगगीतेंत आठव्यांत ती । क्षेत्रक्षेत्रज्ञ योगाची महती । तेराव्या अध्यायांत ॥२३४॥योगगीतेच्या नवमाघ्यायांत । हा क्षेत्रक्षेत्रज्ञयोगयुक्त । चौदाव्या अध्यायीं प्रख्यात । नानामतांचा ऐक्ययो ॥२३५॥तो योगगीतेंत दहाव्या अध्यायांत । वर्णिला असे महत्त्वयुक्त । पंधराव्यांत गणेशयोग वर्तत । योगगीतेंत अकरावा अध्याय ॥२३६॥सोळाव्यांत भक्तिरहस्य वर्णन । योगगीतेचा अध्याय बारावा हा पावन । दक्षसिद्धिप्राप्तिवर्णंन । सतराव्या अध्यायीं असे ॥२३७॥बारा अध्याय योगगीतेंत । असती नवमखंडातर्गंत । संस्कृत ९८९ श्लोकांत । ९६७ ओव्यांची योगगीता ॥२३८॥अठराव्यांत गणेशस्वरूपवर्णंत । पुराणश्रवणादि विधिवर्णंन । एकोणिसाव्यांत असून । विसाव्यांत पुराणप्रशस्ति महिमा ॥२३९॥एकविसाव्यात पारायणवर्णन । बाविसाव्यांत माघपारायण । तेविसाव्यांत ज्येष्ठमास पारायण । चोविसाव्यांत विकल्पविजय ॥२४०॥पंचविसाव्यांत विकल्पप्रताप खंडन । सव्विसाव्यांत असे कथन । मुद्गलपुराणश्रवण महिमान । माघादिअर्ध मासांत ॥२४१॥सत्ताविसाव्यांत श्रवणमहिमान । भाद्रपदासार्धैकमासांत पावन । अठ्ठाविसाव्यांत शोभन महोदरचरित माहात्म्य ॥२४२॥वार्षिक मौद्गलश्रवण महिमान । एकोणतिसाव्यांत त्याचें वर्णन । मौद्गल नित्यश्रवण माहात्म्य कथन । तिसाव्या तें अध्यायीं ॥२४३॥वक्रतुंडचरित श्रवणमहिमान । एकतिसाव्यांत परम पावन । एकदंतचरित माहात्म्य कथन । असे बत्तिसाव्या अध्यायीं ॥२४४॥महोदरचरितमाहात्म्य वर्णन । तेहेतिसाव्यांत पावन । गजाननचरित्र श्रवणपठणमहिमान । चौतिसाव्या अध्यायांत ॥२४५॥पस्तिसाव्यांत लंबोदरचरित । विकटखंड माहात्म्य छत्तिसाव्यांत । विघ्नराजखंड श्रवण माहात्म्य ख्यात । सदतिसाव्या अध्यायीं ॥२४६॥धूम्रवर्णचरित अडतिसाव्यांत । नवमखंड माहात्म्य ख्यात । तें वाचा एकोणचाळिसाव्या अध्यायांत । चाळिसाव्यांत तेंच वर्णन असे ॥२४७॥ या एकेचाळिसाव्या अध्यायांत । पुराणसमाप्ति वर्णन असत । ऐशीं ही अवतरणिका समाप्त । श्रीगणेश प्रसन्न होवो ॥२४८॥पंधरा मे एकोणिसशें एकूणसत्तर । वैशाख कृष्ण चतुर्थी थोर । अंगारकी संकष्टी पावनकर । एकोणीसशे एक शके ॥२४९॥मंगळवारीं गणेशसुत । सरस्वतीचा तनय अर्पित सीताराम देसाईकुल जात । अनुवादपूजा श्रीगणेशचरणीं ॥२५०॥जैसी जमली तैसी सेवा केली । श्रीगजाननचरणीं वाहिली । श्री विनायक अप्पांनी दिली । जोशी यांनी प्रेरणा ॥२५१॥तैसीच स्फूर्ति आणि संयोजन । श्री अनिरुद्ध साबाजी राजाध्यक्ष यांनी करून । मजला उत्साह देऊन । करविली ही श्रीगणेशसेवा ॥२५२॥मूळ संस्कृत मुद्गल पुराण । पुनरपि त्याचें मुद्रण । करण्या झटले रात्रंदिन । अप्पाशास्त्री जोशी सदा ॥२५३॥तैसेचि अविरत प्रयत्न । केले राजाध्याक्षांनीं महान । उभयता झाले स्वानंदांत विलीन पूर्णहुति देण्यापूर्वी ॥२५४॥परी तदनंतर श्री विनायकसुत । प्रत्यक्ष गणेश धीर देत । जोशी कुलोत्पन्न तो वाहत । धुरा कार्यवाहपदाची ॥२५५॥श्री अमरेंद्र गाडगीळ कुलजात । अध्यक्षपद भूषवित । श्रीमुद्गल प्रकाशनांत । मंडळ प्रयत्नशील झालें ॥२५६॥डाँ. त्र्यंबक ताम्हनकर, श्री . विजय देवधर । श्री. विनायक अनिरुद्ध पुत्र । तैसेचि श्री. माधव केळकर । प्राध्यापिका तोरसकर प्रयत्नशील ॥२५७॥मंडळाचे सद्स्य गणेशभक्त । श्री. भा. मं. जोशी मोरगावस्थ । तैसेचि प्राध्यापक महाशब्दे मोरेश्वर व्याकरण पंडित । श्री. नेरूरकर साहाय्य देती ॥२५८॥तैसेचि पेंडसेशास्त्री करिती । प्रचार गणेशभक्तीचा भावभक्ती । श्रीशंकरराव दाते साहाय्य होती । पुराणाच्या मुद्रणीं ॥२५९॥श्री. पारखे श्रद्धायुक्त । कागद पुरविती मुद्गलपुराणकार्यार्थ । त्यांचें साहाय्य वर्णनातीत । तैसेंचि चिंचवड मोरया संस्थानाचें ॥२६०॥श्रीमुद्गलेश्वर महाराज आले । मुद्गलमाहात्म्य सांगितलें । आर्थिक साहाय्यही केलें । या मराठी अनुवादास्तव ॥२६१॥श्रीम, पेंडुरकर तैसे श्री. दादा पुराणिक । श्री. बेडेकर बाठिया सहायक । श्री. रावदसकर श्री. रायकर कार्यप्रेरक । द्रव्यसाहाय्य करोनियां ॥२६२॥श्री. छेडा सौ. नाईक । श्री. बेडेकर बाठिया सहायक । श्री. रावदसकर श्री. रायकर कार्यप्रेरक । द्रव्यसाहाय्य करोनियां ॥२६३॥भारत सरकारें साहाय्य केलें । संस्कृत ग्रंथ पुनः प्रकाशनार्थ भलें । श्री. ढवळे प्रकाशकांनी केलें । ग्रंथविक्रीस साहाय्य ॥२६४॥तैसेचि असंख्य उदार हात गणेशप्रसादद्वारें साहाय्य करित । गणेशभक्तांनीं मुद्रणप्रत लेखनांत । स्वयंस्फूर्त मदत केली ॥२६५॥ऐश्या रीती हा अधिकृत ग्रंथ । श्रीगणेश सांप्रदायांत । अनुवादिला प्राकृतांत । श्रीगुरुकृपेमुळें ॥२६६॥मीं केवळ निमित्तामत्र । कर्ता करविता तो गणेश सर्वत्र । तयाच्या चरणीं भावार्त । शब्ददूर्वा या बाहिल्या ॥२६७॥कवित्याची प्रौढी नसत । केवळ भक्तिभाव मनांव । गणेशभक्त गोड मानोत । मायबोलीत हा अनुवाद ॥२६८॥वाचून हा ग्रंथ प्राकृत । इच्छा होवो मूळ संस्कृत । वाचीन ऐशी ह्रदयांत । समस्त वाचक भक्तांच्या ॥२६९॥मूळ ग्रंथाचा प्रसाद । यांत कैसा यावा विशद । तरीही भावबळें सुखप्रद । होवो मराठी अनुवाद हा ॥२७०॥या मुद्गल पुराणाचें वाचन । करून व्हावें गणेशज्ञान । योगगीता वाचून । योगानंद प्राप्त व्हावा ॥२७१॥लाभोत ऐहिक पारलौकिक । सुख सारें येथ भाविक । सर्वत्रांस आनंददायक । होवो हा ग्रंथ सर्वदा ॥२७२॥पाठका वाचका लाभावें इच्छित । या गणेशपुत्रास आत्मज्ञान उदात्त । लाभूनिया गणेशसेवेंत । जीवन सारें धन्य हावें ॥२७३॥सारे होवोत सुखी निरोगी । सर्वांस लाभो भद्र जगीं । कोणीही नसो दुर्भांगी । विश्वामाजी गणेशकृपेनें ॥२७४॥या ग्रंथाची पारायण पद्धत । अन्यत्र दिली असे ग्रंथांत । ती वाचून भाविक लाभोत । आत्मशांति सुखस्वानंद ॥२७५॥श्रीगजानन जय गजानन । ऐंसा जप अविरत करून । हा अनुवाद रामनवमी दिनीं समर्पण । करितों श्रीमयूरेश्वरासी ॥२७६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले नवमे खण्डे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्गलसंवादे पुराणसमाप्तिवर्णनं नामैक चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।॥ इति श्रीमुद्गलपुराणे नवमः खंडः समाप्तः ॥॥ समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP