मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ३४ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ३४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३४ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगतो महात्म्य अद्गल पुरान श्रवणाचें साद्यंत । आश्वलायनवंशीय वसत । ब्राह्मण एक सुरुचि नाम ॥१॥स्वधर्मनिष्ठ तो ब्रह्मज्ञानपर । नाना योग धुरंधर । शमदमादि साधनपर । योगचर्या पालन करी ॥२॥अंतीं सहज योगस्थित । तेथ स्वाधीनता पाहत । त्यायोगें होत विस्मित । म्हणोनि गेला स्वगुरूकडे ॥३॥प्रणाम करून त्यास म्हणत । महायोग्या सांग मजप्रत । शांतिप्रद योग सर्वभावें सांप्रत । आमुचा तूं वंशगुरु ॥४॥ज्ञानाची पराकाष्ठा तूं वाटत । आश्वलायन तें ऐकून म्हणत । पैलानें जो कथिला मजप्रत । तो योग मीं तुज सांगेन ॥५॥चित्त पंचविध त्यागून । अहंब्रह्म हा बोध जाणून । सरस जेणें शांतिस्थ होऊन । स्वानंद प्राप्त करशील ॥६॥सरस चित्त ज्यापासून । संभवतें तन्मय तें असून । अंतीं ज्याच्यांत लय पावे प्रसन्न ॥ तें तत्त्व गज जानावें ॥७॥तेंच आनन त्याचें भजन । करी पाळून सर्व विधान । ऐसा पूजितां गजानन । सुशांतिस्थ तूं होशील मुने ॥८॥ऐसें बोलून तो थांबात । तेव्हां त्यास नमून जात । आपुल्या आश्रमीं मुदितचित्त । सुरुचि ब्राह्मण निश्चयें ॥९॥गजाननपर होऊन भजत । नित्यनेमें त्यास आदरयुक्त । गजानन चरिताचा खंड वाचित । मुद्गल पुराणीं जो असे ॥१०॥त्यायोगें होऊन मुदित । गणाधीश प्रकट होत । प्रशांतिद योग तयाप्रत । दिला गणेश प्रभूनें ॥११॥भक्ताची वांछा पूर्ण । करितसे गजानन । भक्त सुरुचि जाणे ज्ञान । चार वेदस्थ रहस्थ जें ॥१२॥गजाननाख्य परब्रह्मांत । जे सर्वदा असे स्थित । जेथ विश्वें ब्रह्में पावत । लीनत्व योगरूपांत ॥१३॥ऋग्वेदांत जें ख्यात । सर्वग ब्रह्म निश्चित । तेंच ‘ग’ अक्षरें ज्ञात । गजाननाच्या नांवांत ॥१४॥विविध विश्वें निर्माण होत । तैसीच ब्रह्में शाश्वत । म्हणून ‘ज’ अक्षर ख्यात । द्वितीयात्मक एक जें ॥१५॥आदिमध्यान्त भावांत । ज्या स्वरूपें तें असत । यजुर्वेवांत ब्रह्म प्रख्यात । तोच अज गजानन हा ॥१६॥पंचचित्तमय जें असत । तें नाशिवंत समस्त । नष्ट होत हें दर्शवित । ‘न’ अक्षर हें रहस्य जाण ॥१७॥नष्ट भावांत जें राहत । आसमंतीं तेंच ब्रह्म असत । सामवेदांत ख्यात । आन शब्द गजाननीं ॥१८॥पंचचित्तमय सर्व नष्ट । होतसे तेच योगभावें कीर्तित । ब्रह्मरूप कीर्तित । तें अथर्वणांत निःसंशय ॥१९॥मीच आत्म्या ऐसें ज्ञात । अज्ञानें परी न होय स्मृत । गजाननांत तें न ज्ञात । ऐसा हा शब्द गजानन ॥२०॥चार वेदांचें सार ख्यात । गजानन या एका शब्दांत । ऐशा गजानना जाणून भजत । सुरुचि तो सर्वदा ॥२१॥त्याचें माहात्म्य वाचित । तेथ एक आश्चर्य घडत । एक कबुतर वृक्षस्थित । ऐकतसे गजानन खंड ॥२२॥तें कबूतर रोगी पापयुक्त । श्रवणमात्रें रोगहीन होत । पापापासून विमुक्त । अंतीं गजानन लोकीं गेलें ॥२३॥तेथ गजाननास पाहून । ब्रह्मीभूत तें होत तत्क्षण । नकळत करी पुराण श्रवण । त्याचें फळ एवढें जरी ॥२४॥तरी हेतु धरून मनांत । जे नाना जहा हा खंड ऐकत । त्या पाठाच्या वाचका जें लाभत । तें फळ वर्णनातीत ॥२५॥ऐहिक भोग भोगून । ते अंतीं मुक्त होऊन । स्वानंदलोकीं करिती गमन । ब्रह्मभूत तेथ होती ॥२६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे मुद्गलदक्ष संवादे गजाननचरितश्रवणपठनमाहात्म्यवर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP