मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय १८ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय १८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १८ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणे सूतासी । धन्य तूं ज्ञानराशी अससी । आम्हां सर्वांहून तुजसी । अधिक श्रेष्ठ ज्ञान असे ॥१॥तुझ्यासम या त्रिभुवनांत । नसे संशयनाशक ज्ञानवंत । सर्वसंशयहीन मी असत । धन्य मज तूं केलेंस ॥२॥आतां मुनिसमन्वित । कृतकृत्य मीं झालों निश्चित । यामुद्गलासम अश्रुत । परात्पर श्रेष्ठ या जगीं ॥३॥त्या मुद्गलानें सांगितलें । म्हणून मौद्गल हें भलें । कर्त्यासम हें झालें । अनन्यतम श्रेष्ठ जगीं ॥४॥वेदशास्त्रपुराणांत । जी नाना मतमतांतरें वर्तत । त्यांचें निकूंतन करित । मौद्गल मुद्गलाकार हें ॥५॥हें सर्वसारप्रकाशक । मुद्गल योगी मान्य एक । त्रैलोक्यांत ज्ञात योगींद्र पावक । अभिमानहीन यथार्थकारी ॥६॥मुद्गलानें पुराण रचिलें । मुद्गलाकृति तें झालें । त्याचा अवमान करिती ते सगळे । नरकांत जातील दुष्ट नर ॥७॥मुद्गल हातांत धरून । यमदूत त्यांना करितील ताडन । मुद्गलासम वक्ता महान । योगींद्र अन्यत्र न दिसेल ॥८॥ऐसा न झाला न पुढें होणार । सांप्रतही ऐसा नसत नर । निरहंकारयुक्त सुंदर । भाषणशैली मुद्गलाची ॥९॥पुराणें सर्व स्वस्वब्रह्मपर । स्वदोष दडविती अभिमानपर । यथार्थ भाषण करिती सर्व । पुराणें मुनी देवताही ॥१०॥त्यायोगें भिन्नमतांचा विलसत । प्रकाश त्यांत उपजत । मौद्गल सर्वमान्य असत । यथार्थ भाषण हें माझें ॥११॥निरहंकार मुद्गलाचा थोर । अभिमान असे महाघोर । देवयोग्यासही अजेय दुर्धर । चूर्ण केलें मुद्गलाणें ॥१२॥त्या अभिमानास करित । मुद्गल हा जीववर्जित । म्हणून हा एक मुद्गल ख्यात । ह्यासम श्रेष्ठ हाच असे ॥१३॥ऐसें महर्षींचें मत । यांत कांहींच आश्चर्य नसत । सूता सर्वमान्य तत्त्व सांगत । मुद्गल सदा श्रोत्यांसी ॥१४॥अही गणेशाच्या हातून पडत । भूमीवरी मुद्गल करस्थित । तो मनुष्याकार रूप घेत । अंगिरसानें पाळिला ॥१५॥तोच हा मुद्गलयोगी महान । योगरूपाचें करी प्रकाशन । त्यांत काय आश्चर्य कारण । अभिमानवर्जित तो मुनींद्र ॥१६॥मुद्गल दक्षांचा संवादयुक्त । पुराण अंगिरानें वर्णित । शांतिप्रद ऐकिलें समस्त । शौनक म्हणे सूतासी ॥१७॥आतां सविस्तर सांग जमसी । या पुराणाच्या महिम्यासी । याच्या श्रवणाच्या रीतीसी । सांग विधी कोणता ॥१८॥कोणत्या विधीनें श्रवण करावें । पूर्वी कोणी केलें तें सांगावें । कोण कोण सिद्धि लाभले । मानदा याच्या श्रवणानें ॥१९॥या पुराणाचें पारायण । कैसें करावें सांग संपूर्ण । भिन्नभिन्न खंडाचें श्रवण । कोणी केलें तेंही सांगा ॥२०॥गणेशाचीं चार पुराणें असत । त्यांच्या श्रवणमात्रें कोणतें फळ लाभत । तें फळ सारखें वा भिन्न असत । तें सर्व सांगून संशय हरा ॥२१॥तेव्हां सूत सांगत । एकवीस भेदांनी तो ब्रह्मनायक खेळत । गणेश प्रणवाकार ख्यात । ब्रह्मांड पुराणांत हें वर्णन ॥२२॥ब्राह्म पुराणीं बारा भेदांत । बुद्धिचालक तो खेळत निर्गुंण सगुणाधार वर्तंत । प्रणवाचा प्रचालक ॥२३॥गणेश पुराणीं मुर्तिमंत । मुख्य द्वंद्वभावें खेळत । बुद्धिस्थ तैसा प्रणवस्थ । ती त्यांची योगात्मक कृती ॥२४॥प्रणवात्मक भावपर । उपासना कां असे थोर । ह्रदयांत तो क्रीडाकर । त्याचें क्रीडाकांड गणेशपुराणी ॥२५॥मौद्गल पुरानांत वर्णित । अष्टविध तो योगधारक ज्ञात । संयोग अयोगांचा योगरूप वर्तत । पुर्ण सुशांतिप्रद ॥२६॥त्यांची फळें सांगेन । गणेश ज्ञानकारक पावन । संशयवर्जित तें ऐंकून । मुनिजन जाहले सारे ॥२७॥त्रिगुणात्मक देव पांच ख्यात । ब्रह्मा विण्षु शिव ज्ञात । सूर्य शक्ति सर्वत्र लोकांत । परी पूजाविधिमतीं भिन्नता ॥२८॥विधि म्हणजे ब्रह्मदेव जगांत । पूज्य ऐसें एक म्हणत । मध्यस्थ जे नर असत । ते ब्रह्मलोकीं जाती शास्त्रमतें ॥२९॥अन्य शिवादि चारांच्या भजनीं सक्त । ते जन भक्तीनें जात । त्या त्या देवतेच्या लोकांत । सगुणोपासक शिवादींचें ॥३०॥गुणात्म शिवादींचे भक्त । त्या त्या लोकीं जाऊन भोनित । परम श्रेष्ठी भोग परी पडत । पुनरपि भाग्यें भूमीवरी ॥३१॥त्या देवांच्या कृपेनें होत । प्रणवांत रुचियुक्त । तदनंतर ते भजत । प्रणवाकार गणराजासी ॥३२॥ब्रह्मप्राप्तिस्तव यत्न करिती । आनंदानें तें जगतीं । त्या गणेशाच्या कृपेनें होती । ज्ञानयुक्त ते साधक ॥३३॥प्रणवसंस्थाच्या अतीत । जो असे बुद्धिधारक उदात्त । त्या बुद्धिपतीस ह्रदयांत । पूर्णरूपास यत्नें भजती ॥३४॥शमदमपर असत । नानाभावविवर्जित । बुद्धिस्थास त्या समाराधित । त्यांची कृपा ते लाभती ॥३५॥तेव्हां ते गणनाथास भजती । शुंडादंडें विराजत तो जगतीं । एकनिष्ठ स्वभावें होती । तत्पर नित्य आदरानें ॥३६॥योगप्राप्त्यर्थ यत्न करित । आनंदानें ते भक्त । गणेश उपासनायुक्त । मंत्रध्यानपरायण ॥३७॥गाणपत्य अभिमान धरिती । गणेशाहून परम भाव न मानिती । कुठेंही केव्हाही जगतीं । वेदशास्त्रपुराणाधारें ॥३८॥तदनंतर त्याच्या कृपायोगें भजत । मौद्गलस्थ एकदन्त । योगशांति लाभून होत । योगीश जे गणेशभक्त ॥३९॥ऐशा क्रमें तें होती । विपेंद्रा गणपप्रिय जगतीं । विभिन्न फळ लाभती । पुराणीपासक ख्यात ॥४०॥प्रणवोपासक जें असत । मानिती ते सर्वं सामान्य भावांत । गजाननासी देहयुक्त । त्यांचें करितों विवेचन ॥४१॥जरी सत्यत्वें गणेश प्रणवरूप वर्तत । तरी देहधारी कैसा असत । अवयवादि संयुक्त । गणनाथ कैसा संभवेल ॥४२॥सर्वं हें विश्व ओंकार असत । तेथ भिन्न कांहीं नसत । या विधीनें भावयुक्त । भजन त्याचें होत असे ॥४३॥त्याच्या परता बुद्धिसंस्थ । ऐशा गणेशास जे भजत । ते सर्वरूप त्यास मानित । यांत संशय कांहीं नसे ॥४४॥बुद्धीच्या पर बुद्धिसंस्थ । बुद्धीचा प्रकाशदाता वर्तत । ब्रह्म तेथ कोठून विलसत । प्रणव तो अर्थसंयुक्त ॥४५॥मनोवाणीविहीने जें ब्रह्म । त्या ब्रह्माहून परम । गणेश्वरास मानिती मनोरम । ते भ्रांतिज कुठें ॥४६॥ऐसा भजती गणेशभक्त । विघ्नेश प्रणवर्जित । ब्रह्म पुराणीं स्थित । जाण ते भक्त मुनिसत्तमा ॥४७॥त्याच्याहून पर गणेशानास । भजती जे गाणेशस्थास । गणेशार्थंवरहस्य जाणून विश्वास । दृढ होतसे तयांचा ॥४८॥प्रणव प्रणवाकार । गणेश सगुण स्मृत थोर । ओंकारवर्जित हा पर । बुद्धिस्थ निर्गुण ज्ञात होतय ॥४९॥प्रणव तो बुद्धिसंस्थ । तत्पर ब्रह्मद वर्तत । त्यांच्या प्रीत्यर्थ होत देहधारी गजानन ॥५०॥गकार प्रणवाकार ख्यात । णकार बुद्धीचा चालक वर्तत । त्यांचा स्वामी हा गणेश असत । गजमुखादि चिन्हयुक्त ॥५१॥गाणपत्य स्बभावें भजती । निरंतर त्यासी एकमती । एकनिष्ठ ते होती । विप्रा सर्वही गणेशयोगी ॥५२॥तदनंतर ते भक्तिसंयुक्त । मौद्गलीं पूर्णरूप सेवित । त्रयाचा द्योतकपूर्ण वतंत । त्यांच्या योगें गजानन ॥५३॥योगरूप हा गणेश । त्रिरूपधर विशेष । कार्यांर्थ क्रीडासंयुक्त ईश । मायाद्वय योगें होई ॥५४॥प्रणव हा जगदाकार । चिकाकार बुद्धिस्थित थोर । त्यांचा आत्मा हा उदार । गजवक्रादि चिन्हयुक्त ॥५५॥ऐसें जाणून गणेशास भजत । तीन भावांत स्थित । मौद्गलस्था सदा उपासत । विप्रा योगज्ञ योगरूपीसी ॥५६॥तेथ भजन पंचधा ज्ञात । तें जाणतां भक्तेंद्रनृप जगांत । होशोल महामुने निश्चित । म्हणोनि चित्त दे येथ ॥५७॥मूर्तिसंस्थ गणेशास भजती । पूजादि मार्गे भावभक्ती । मंत्रस्तवनादींनी आराधिती । देहधारी सुखप्रदांनीं ॥५८॥जगदाकार जीवमय प्रभूस । भजती सर्वत्र प्रणवास । सर्वत्र गणेशभक्त संस्थास । सर्वांचें हित वांछिती ॥५९॥ऐसा नरोत्तम न करित । अशुभ कोणाचेंही जगांत । या विधीनेंही तोषवित । गणनायकासी ते भक्त ॥६०॥द्वंद्वभाव अवलोकून । साक्षिवद् भाववर्जित होऊन । बुद्धिस्थ देवास तोषवून । भक्ति करी भक्तवत्सल विघ्नेशाची ॥६१॥धर्माधर्मादिक भ्रम त्यागित । महामति बुद्धिभाव सोडित । निःसंग तो राही सतत । म्हणे मी कर्ता करविता नसे ॥६२॥न मी देहस्थ बुद्धिस्थ । आनंदयोगें ब्रह्म मीं निर्मळ सतत । निर्लिप्त लिप्तही न वर्तत । ती अवस्था भक्ति म्हणती ॥६३॥त्या भक्तीनें सुप्रीत । गणेश्वर सदा निर्मल आत्मा होत । गणेशाहून मीं भिन्न नसत । केवळ देहधर्म चाले ॥६४॥गणेशभक्तिसंयुक्त । मौद्गलस्थ परतत्त्व भजत । स्वयं गणेश्वर होऊन त्रिविधस्थ । तीन मार्गांनी नित्य भजे ॥६५॥शांतिभक्तिसमन्वित । तिघांच्या योगभावें त्रिविध ज्ञात । स्वतःस त्रिविध जाणून भजत । अनन्यमनें साधक ॥६६॥तीन भावांनी या युक्त । महायश योगी भजत । गणेशास गणपाकार ख्यात । मौद्गलज्ञ विचक्षण ॥६७॥ऐसें गणेश्वराचें भजन । मानदा तूं करी एकमन । त्यायोगें योगींद्रवंद्य तूं पावन । गाणपत्य तूं होशील ॥६८॥प्रथम देहधारक शंभु मुख्यास । सेवून वर आवाहित । जीव स्वरूपस्थास त्या अतीत । प्रणवाकृति धारकांस ॥६९॥तदनंतर बुद्धिगतांस पूजित । त्यायोगें भक्तिदरा लाभत । गणेशास देहगासी सेवित । तोही भक्त अनन्यभावें ॥७०॥तदनंतर मौद्गलस्थ योगरूप जाणत । योगी योगपरायण होत । त्रिविधसंस्थ गणेशास पूजित । गणपप्रिय या क्रमानें ॥७१॥हें सारें तुज सांगितलें । भजन गणपाचें सगळें । स्वरूप त्रिविध झालें । त्रिमार्गद्योतक संपूर्ण ॥७२॥हें ऐकून शौनक म्हणत । अठरा पुरानें विख्यात । अन्य उपपुराणेंही सांगत । अमितबुद्धी व्यासमहर्षि ॥७३॥जैसे वेद तैसे उपवेद । ख्यात असती विशद । ते वेदसम नसती सर्वद । ऐसें विप्र मानिती ॥७४॥तैसेंचि उपपुराणांत । गाणेश्वर पुराण अंतर्भूत । मौद्गल हें तरी अधिक फलयुक्त । कैसें विप्रें सांगितलें ॥७५॥सूत सांगे शौनकाप्रत । जैसा देवपति इंद्रास म्हणत । सर्वत्र विप्र जगांत । उपेंद्र विष्णु विनायक आम्हां ॥७६॥इंद्राहून अधिक भावें युक्त । विष्णु विनायक वर्तंत । तैशीच उपपुराणें होत । ब्रह्म सायुज्यप्रदायक ॥७७॥आधीं पुराणें ऐकून । तदनंतर साधन करून । पात्र होत भक्तजन । उपपुराणांच्या अभ्यासांती ॥७८॥ऐसें जाण सर्वत्र पुराणांत । वेदोपवेदासम जेथ नसत । ब्रह्मयाचा निश्चय हेतुयुक्त । मोहनार्थं लोकांसी ॥७९॥भ्रांतिभावप्रकाशनें होत । गणेशरूप गूढ वर्णित । म्हणून गणेश्वरभक्ति ज्ञात । सुदुर्लभ पुराणीं ॥८०॥पुर्वपुण्यबळयुक्त । ऐसे योगीही गणेशभक्ति लाभत । मौद्गल पुराण साहाय्यें ज्ञात । गणेशस्वरूप जनांसी ॥८१॥परिपूर्ण ह्या पुराणें होत । अन्यथा भ्रांति निर्माण होत । गणेशरूपासम ख्यात । अठरावा अध्याय गोड हा ॥८२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे योगामृतार्थशास्त्रे नवमे खंडे दक्षमुद्गलसंवादे गणेशस्वरूपक्रमवर्णनं नाम अष्टादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP