मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ३६ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ३६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३६ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगत । अश्वत्थामा द्रोणपुत्र ख्यात । प्रतापवंत तो असत । एकदा गेला उत्तमवनीं ॥१॥आपुल्या मामाच्या संगतीत । कृपाचार्यांच्या तो राहत । भारताचें सार जाणत । कृष्णमुखातून जें स्त्रवलें ॥२॥बुद्धीच्या परतर । ब्रह्म असत । त्याची लालसा त्याच्या मनांत । बुद्धिपति गणेशाचें स्वह्रदयांत । ज्ञान कैसें होईल ॥३॥परिपूर्ण तें होण्या ज्ञान । गौतमासी जात शरण । कृप त्यास करी वंदन । आपुल्या भाच्यासह तेव्हां ॥४॥एकदा योगिजनांसमवेत । होता गौतम संस्थित। तो त्यास योगशांतिप्रद सांगत । योगसेवेनें जो प्राप्त ॥५॥तेथ हर्षयुक्त अश्वत्थामा विचारित । विचारी कृपसान्निध्यांत । संशय मनिचा हरण्या इच्छित । प्रश्न त्या गौतम मुनीसी ॥६॥योगप्रप्तिस्तव मोदयुक्त । कोणाची उपासना असे प्रशस्त । योगरूपाचें योगीशा सांप्रत । वर्णन सर्वंज्ञा सांगावें ॥७॥गौतम म्हणे तयास । गणेश उपासना मुख्य सर्वांस । पूर्ण शांतिप्रद जीवांस । योगाकार जाणावी ॥८॥योगाकार तो वेदांत । गजमय तत्त्व नरदेहांत । पंचचित्तात्ममोहें जगत । विमोहित हें सारें ॥९॥त्यायोगें परम भाव न जाणत । गणनायक त्यास अज्ञात । परी मोहयुक्त चित्त त्यागित । तेव्हां ज्ञान उपजेल ॥१०॥तें प्राप्त होतां गणेशज्ञान । स्वयं चिंतामणि होत महान । म्हणून विकट भक्तीनें प्रसन्न । विकटाचा लाभ होई ॥११॥पंचचित्तमय जें जें असत । तें तें विकटभावें व्यकत । भ्रम त्यागून स्वचित्तस्थ । भज त्या गजानना श्रद्धेने ॥१२॥तें ऐकून विस्मित । सर्व मुनि तयास वंदित । आपापल्या आश्रमांत । परतून विकटाचें भजन करिती ॥१३॥अश्वत्थासा कृपासहित । आपुल्या आश्रमीं उपासना करित । विकटभजनीं तोही रत । विकटचरित्र खंड वाची ॥१४॥महाभक्तीनें मुद्गलस्थ । तो खंड वाची श्रद्धायुत । नित्य गणेश्वरास पूजित । संतुष्ट त्यायोगें विकट ॥१५॥स्वल्पकाळानंतर देत । पूर्ण शांतियोग तयाप्रत । तथापि ते नित्य वाचित । तदनंतरही हा विकटखंड ॥१६॥ते दोघे हा खंड वाचित । नित्य नेमें आश्रमांत । तेथ एक श्वान येऊन बसत । कृपाचार्यांच्य पुढयांत ॥१७॥अश्वत्थाम्याच्या समीप बसत । मांजर एक तेंही ऐकत । त्यायोगें रोगविहीन होत । उभयही कुत्रा मांजर तें ॥१८॥न जाणतां जरित ते ऐकत । श्रवणमात्रें उण्यवंत । होऊन स्वानंद लोकीं जात । त्याहून महिमा काय सांगू ॥१९॥अश्वत्थामा कृप स्वांशांत । आनंदानें होत संगत । अंतीं झालें योगयुक्त । विकटभजनीं मग्न ते ॥२०॥शौनक तें ऐकून विचारित । योगयुक्त ते स्वअंशांत । कैसे झाले तें आश्चर्य वाटत । गणेशांत एकाकार ॥२१॥सूत त्यास उत्तर देत । देव कलांशानें अवतरत । भूभारहरणार्थं होत । मानवादी ते स्वासमर्थ्यानें ॥२२॥येथ पाप करून जात । जेव्हां मानव यमसदनांत । तेव्हां ते पडती नरकांत । दशरथादींच्या प्रमाणें ॥२३॥ अथवा पुण्य उग्र करून । स्वर्गांत जाती प्रसन्न । भोगसंयुक्त होऊन । विलसती रामाप्रमाणें ॥२४॥ते योगयुक्त होती । स्वस्वअंशांत राहती । तदाकार ते कल्पांतीं । गणेशाकार सर्व होती ॥२५॥ऐसें विदूरादिक कौरव जात । पक्षीय यमलोकांत । यमाकारा गणेशाय भजत । भक्तिभावें तेथ ते ॥२६॥अंतीं योगसमायुक्त । यम परम पावन होत । गणेश्वराजवळीं जात । ब्रह्मभूत होत स्वभावें ॥२७॥ऐसें हें पूर्ण चरित । विकट खंड श्रवण माहात्म्ययुत । सर्व सिद्धिप्रद तुजप्रत । सांगितलें महा अद्भुत ॥२८॥ऐशियापरी नाना जन । ऐकून हा खंड महान । सुख भोगून पावन । ब्रह्मीभूत झाले शेवटीं ॥२९॥सूत हें माहात्म्य सांगत । शौनक प्रेमें ऐकत । विघ्नराज खंड श्रवणाचें असत । महिमा वर्णन पुढिलें अध्यायीं ॥३०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनपिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते दक्षमुद्गलसंवादे योगामृतार्थशास्त्रे विकटखंडमाहात्म्यवर्णनं नाम षटत्रिंशोऽध्यायः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP