खंड ९ - अध्याय २१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.

॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत म्हणती सांप्रती । कामनायुक्त जे श्रवण करित । त्यांचें फळ सांगतों सर्वसिद्धियुत । संक्षेपें शौनका परम भका ॥१॥
अत्रिगोत्रोद्‍भव कोणी ब्राह्मण । यथार्थ कोविद पावन । स्वधर्मज कर्मं सोडून । पापकर्म आचरीतसे ॥२॥
त्यांचें तें दुराचरण । पाहून दुःखित मातापिता सुजाण । सुशीला सुमुख संत्रस्तमन । दुर्मती पुत्रास पाहून ॥३॥
सुबुद्धी त्या पुत्रास शिकवित । परी तो त्यांचें न ऐकत । दुष्ट त्यांना दूखवित । विपरीत आचार करोनियां ॥४॥
तदनंतर ती मात पिता राहत । आपुल्या आश्रमीं दुःखित । तेव्हां भराद्वाज मुनिवर येत । त्यांच्या आश्रमीं सौभाग्यें ॥५॥
तीं उभयतां त्यांस पूजिती । मुनिशार्दूंलास विचारिती । पुत्रास सुशील कोणत्या रीती । करावें सांगा सुखोपाय ॥६॥
तेव्हां तो करूणायुक्त । महामति त्याम्स म्हणत । हा पुत्र मुद्‍गल पुराण ऐकत । तरी सुशील होईल ॥७॥
ऐसें सांगून स्वस्थानाप्रत । भरद्वाज परतून जात । सुमुख तो पुत्रसंयुक्त । स्त्रीसह गेला अत्रीकडे ॥८॥
त्यास प्रणाम करून म्हणत । योगींद्र योगप्रद मजप्रत । ऐसें मुद्‍गल पुराण जगांत । कोठें मजला मिळेल ॥९॥
त्यांचें तें ऐकून वचन । हर्षयुक्त मनीं होऊन । अत्रि त्या ब्राह्मणास संमानू न । म्हणे वचन हितावह ॥१०॥
चिंता करू नको तुझा सुत । राहूं दे या आश्रमात । मीच पारायण करीन निश्चित । भाद्रपद मासीं आदरें ॥११॥
तेव्हां तूंही मौद्‍गल ऐकून । नंतर जा स्वाश्रमीं परतून । तें स्वमुखें मान्य करून । आनंदानें प्रमाम केला ॥१२॥
नंतर स्वल्पकाळाने लागला । भाद्रपद मास भला । तेव्हां मुनिगन सारा जमला । मुद्‍गल पुराण श्रवणार्थ ॥१३॥
क्षत्रिय वैश्य शूद्रही जमत । त्यांस पाहून हर्षयुक्त । सुमुख ऐके विधियुक्त । हें मुद्‍गल पुराण ॥१४॥
उपोषणपर राहून । पंचमीस पारणा करी एकमन । ब्राह्मणांसहित भोजन । केलें त्यानें भक्तिभावें ॥१५॥
तेव्हां त्याचा सुत होत । शीलयुक्त धर्मासक्त । आपुला आचार पाळीत । महामति तो श्रद्धेने ॥१६॥
तें पाहून परम आश्चर्य । स्त्रीपुत्रासह तो ब्राह्मण सदय । गणेशभजनीं पावला लय । योगिवंद्य मग जाहला ॥१७॥
अंतीं गणेश्वराप्रत जात । त्यास पाहून ब्रह्मीभूत । ऐसें हें आश्चर्य तुजप्रत । कथिलें अद्‍भुत उत्तम ॥१८॥
त्या पारायणकाळीं असत । एक बैल भक्तियुक्त तेथ । अशक्त क्षीण तेथेंच स्थित । दुरून ऐके तो अल्पांश ॥१९॥
तदनंतर तो वृषभ मृत । होता गाणपत्यदूत नेत । त्याला गणेश लोकांत । विस्मित सर्व त्यास पाहुनी ॥२०॥
विप्रादि त्या गणेशद्‍तांस विचारिती । या वुषभावें कोणतें पुण्य जगतीं । केलें म्हणोनी नेता प्रती । स्वानंद लोकांत सांगा गाणपवरही ॥२१॥
गणेशदूत तैं सांगत । हा तुमच्या सान्निध्यांत । उभा राहून श्रवण करित । मौद्‍गल पारायण महर्षीनो ॥२२॥
परी मध्यंतरीं मृत्यु पावत । दुःखपीडेनें त्रस्त । आतां त्यास ब्रह्मभूत । करूं आम्हीं निःसंशय ॥२३॥
मौद्‍गलाचे शब्द ऐक्त । त्या अवस्थेत जरी होत मृत । त्यास पुनर्जन्म न लाभत । स्वानंदवास सदैव तया ॥२४॥
त्या गणेशदूतांचें वचन । ऐकून महर्षी हर्षयुक्त मन । पुनरपि त्यांसी नमून । विचारिती आपुला संशय ॥२५॥
हा वृषभ अन्ययोनिस्थ । आम्ही मानवदेहधारी समस्त । आम्हीं जें वचन बोलत । ते या वृषभास कैसे समजे ॥२६॥
वृषभाची वाणी न ज्ञात । आम्हां मानवासी गूढार्थ । तरी हा पारायण कैसें समजत । माहात्म्य फळ यास कैसे मिळालें ॥२७॥
तेव्हां गाणेस दूत सांगती । हया बैलाने श्रवण निश्चिती । केलें ज्ञानाविवर्जित जगतीं । हें सर्वथैव सत्य असे ॥२८॥
ज्यासी ज्ञानश्रद्धा नसत । त्यास अन्यवाणी प्रमाणभूत । कैसे न कळत वा कळत । वन्हिकणास स्पर्श होतां ॥२९॥
तो जैसा जाळील निश्चित । तैसेंचि हें मुद्‍गल वर्तत । तें ज्ञानयुत वा अज्ञानयुत । ऐकता केवळ फळ लाभे ॥३०॥
योगामृतमय सर्व संमत । मौद्‍गल पुराण सर्व सिद्धिप्रद ज्ञात । संपूर्णरूप हें ब्रह्मीभूतकर असत । ऐसें गणेशदूत सांगती ॥३१॥
तदनंतर ते गणेशदूत । वृषभास घेऊन गणपालयाप्रत । गेले तेव्हां आश्चर्यमुग्ध होत । विप्र तेथें जमलेले ॥३२॥
ऐसें मौद्‍गल पुराणाचें महिमान । त्याचें तेज अपरिमित जाण । करण्या संपूर्ण वर्णन । तयाचें कोण समर्थ असे ॥३३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे पारायणवर्णनं नामैकविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP