मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय २ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय २ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्गल म्हणती दक्षा सांप्रत । निवृत्त रूपधर गणेशाचें चरित । ब्रह्मभूतप्रद ऐक विनत । चित्त एकाप्र करूनिया ॥१॥स्वानंद सकलांचा आधार । नाना ब्रह्मांत करी विहार । जगांत गोगभावें संयोगकर । मदात्मक सर्वत्र ॥२॥तो स्वानंद नानामायायुक्त । नानाभावपरायण पुनीत । भावाभावादिहीन शोभत । नित्यचि यांत न संशय ॥३॥अनंतकल्पकालें संपोष प्राप्त । निवृत्ति वांछित । मयाहीनकारणें भजत । जगद्ब्रह्मांसह तो गणेशासी ॥४॥संयोगभावनाशास्तव पूजित । एकाक्षर विधानानें भक्तियुक्त । मंत्र जपून विभूस ध्यात । स्वह्रदयांत गजाननासी ॥५॥द्क्ष विचारी मुद्लाप्रद । स्वसंवेद्यात्मक मंत्र ज्ञात । एकाक्षर जो महत्त्वयुक्त । अयोग गणनाथासस प्रिय कसा ॥६॥मुद्गल सांगती तयाप्रत । शब्दशब्दार्थसंयुक्त । मंत्र गणपतीचा ख्यात । स्वसंवेद्यात्मक संमत सर्वशास्त्रीं ॥७॥नाम एकदेशमात्रें असत । तोच अयोगवाचक जगांत । तेथ शब्दशब्दार्थ नसत । तैसाचि त्यांचा योगादिकही ॥८॥वर्षशत जातां गणनायक प्रसन्न । आला स्वानंदास देण्या वरदान । निजभक्त सुखप्रदा महान । त्यास पाहून आल्हादित ॥९॥स्वानंद प्रणाम करून पूजित । गजाननास भक्तिसंयुत । दक्ष विचारी संशय मुद्गलाप्रत । देह गजाननाचा सगुण ॥१०॥मस्तक त्याचें निर्गुण पर । त्यांचा अभेद होतां थोर । गजानन मूर्ति शोभे उदार । निजात्मक हें ज्ञान असे ॥११॥अयोगांत ना सगुण निर्गुण । त्यांचा संयोग अशक्य जाण । तरी अयोगांत वाचक गजानन । हा संशय दूर करावा ॥१२॥मुद्गल म्हणती तयास । सिद्धि देहमयी माया त्याची सुरस । नाना भ्रम त्यागून एकरस । लीन झाली शरीरीं ॥१३॥नानाज्ञानप्रभाव सोडून । बुद्धिशिर गणेशाचें शोभन । भ्रंतिधारक भाव होऊन । तल्लीन ती जाहली ॥१४॥त्यांच्या योगें स्वसंवेद्य । ब्रह्म संयोगधारक ह्रद्य । गजानन आकृतींत आद्य । लीन भावें तें शोभें ॥१५॥सिद्धिबुद्धिविहीन । हा अयोगवाचक होऊन । गजवक्त्रादि चिन्ह । गणेशाचें ख्यात होई ॥१६॥शब्दशब्दार्थसंयोगें गजानन । या तिघांहून भिन्न । अयोगांत सदैव शोभन । उभयमायावर्जित सदा ॥१७॥आतां ऐक चरित्र प्रकृत । शांतिदायक हें पुनीत । स्वसंवेद्य स्तवन करित । गणेशाचें हर्षभरें ॥१८॥सर्व स्वानंद स्तुति गात । अजपुराणपर अव्यय असत । निवृत्तिमात्र समाधिस्थित । अयोगरूप आद्य गणनाथ ॥१९॥त्या निर्मायिकास प्रमेयास वंदन । करितों मीं भक्तिभावें नमन । जो जारज नसे स्वेदज न । अंडज वा उद्भिद नसे ॥२०॥ना स्थावर जंगम । अनादिमध्यांतरूप मनोरम । अमोघरूपा करितों नमन । निर्मायिका अप्रमेयासी ॥२१॥न भूस्वरूप न जल । न प्रकाश न वायुरूप उज्ज्वल । न आकाश न राजस तामसमल । निर्मायिका नमन अप्रमेयासी ॥२२॥न जागृत न स्वप्नगत । नदेव न सुषुप्तींत रत । न तुरीयसंस्थ न बिंदुस्थित । नमन त्या निर्मायिक अप्रमेयासी ॥२३॥न सोऽहं न बोध न विबोध । न मोहयुक्त न मोहविशुद्ध । न निर्गुण न सगुण प्रबोध । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२४॥न कर्मरूप न ज्ञानरूप । न सम न अधीनतम न सरूप । न स्वात्मग सर्वविकाररहित रूप । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२५॥न असत्स्वरूप न सत्स्वरूप । न समानरूप न नेतिरूप । विविधांत निजात्मरूप । नमन निर्मायिका अप्रमेयासी ॥२६॥न अनंतरूप न एकरूप । न सम न तुर्यं न पंचम एक । सदा गणेशाकृतिरूपधारक । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२७॥न आगत न गत । गणेश अयोगरूप ख्यात । सदा निवृत्तिमय आसंमतांत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२८॥वाणीनें वर्णन करण्या अशक्य । अयोगभावें मनन अशक्य । कैसें त्याचें वर्णन करूं मीं समायिक । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥२९॥न सिद्धियुक्त न बुद्धियुक्त । न मायिक ब्रह्ममय गजवक्त्र । अनंतपार परेश वर्तत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३०॥त्रिनेत्रधरासी गजमुखासी । चतुर्भुजधरासी एकरदासी । महोदरासी वाहनहीनगासी । नमन निर्मायिक अप्रमेया त्या ॥३१॥जो न योगनिष्ठ न विहारयुक्त । निजात्मनामनगरींत स्थित । निजसमुद्रीं न विहार करित । नमन निर्मायिक अप्रमेया त्या ॥३२॥न भक्तभक्तिप्रिय । तथापि योगें निवृत्तिद अभय । अपार मायामयपाशहार अप्रमेय । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३३॥अहं विकारें विमोहित । म्हणून गणेशाधिपते भ्रान्त । भटकत जगांत नानाविध मीं ह्रदयांत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३४॥समाधिरूप मी अचिंत्यभाव । सर्वात्मक सर्वविवर्जित सदैव । भ्रमण करितों निवृत्तिदात्या रक्ष सर्वथैव । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३५॥सुसिद्धिबुद्धिप्रद मोहयुक्त । नानाविध आत्मरूप विमागगत । चतुर्विध पदार्थांत भ्रांतीनें भ्मरत । नमन निर्मायिका अप्रमेयासी ॥३६॥शोभन खेलयुक्त मी असत । सुखेतर योगानें तदात्म पावत । शांतिद सौख्य अणुहि न जाणत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३७॥अनंतभावें विमोहित । मज रक्ष तुझे चरण प्रिय मजप्रत । निवृत्ति देई परार्थभूत । नमन निर्मायिक अप्रमेयासी ॥३८॥गणेशासी निवृत्तिधारकासी । परेशासी सुखसागरनिवासीसी । हेरंबासी महोदरासी । ब्रह्मपतीसी सुशांतासी नमन ॥३९॥अयोगरूप गणनायक । प्रवेशहीनत्वें कैसें शोधूं साशंक । ढुंढे दयापरा स्तवितो तारक । विघ्नपते तुज नमो नमः ॥४०॥मुद्गल वृत्तान्त सांगत । ऐसें स्तवून स्वानंद नमित । गणेशानासी हर्षयुक्त । भक्तियुक्त तो नमन करी ॥४१॥श्रीगणेश तयास म्हणत । वर माग महाभागा सांप्रत । देईन सारें ह्रदयवांछित । मायामायिक मोहें दुःक तुजसी ॥४२॥तूं रचिलेलें हें स्तोत्र सर्वशांतिद । मायासंभव दुःख नाशकर सुखद । वाचका श्रोत्यांस सर्वद । जें जें इच्छी तें तें मिळे ॥४३॥असाध्यही साध्य होत । मर्त्यास श्रवणें निजप्रद वर्तत । ऐसें ऐकून गणेशवचन उदात्त । स्वस्वरूपक म्हणे तयासी ॥४४॥प्रथम करून वंदन । नंतर करपुट जोडून । ससर्वस्वानंद बोले वचन । विघ्नेशा जरी तूं संतुष्ट ॥४५॥तरी निवृत्तिज सुख देई । अन्य सुखाची इच्छा न ठेवी । भ्रांतिपद माया निवारी ही । हाच वर मी मागतसे ॥४६॥तथाऽस्तु ऐसें बोलून । गणेश पावले अन्तर्धान । स्वानंद स्वस्थानीं ख्निन्नमन । तेथेंच बसून राहिला ॥४७॥अयोगनाथा त्या स्मरत । ब्रह्ममुख्य विश्वें लय पावत । त्यासमयीं स्वानंदांत । निजानंद स्वयं नष्ट तैं ॥४८॥मायाहीनप्रभावें अयोगस्थ । मोदें ती तेथ शोभत । संयोगमायेनें हीन असत । कांहीं न त्यास दिसे तैं ॥४९॥आपुला आत्मा वा अपर । मुख्य अयोग गणनायक थोर । कांहींच न दिसे तयास सत्वर । सर्व बंधविनिर्मुक्त झाला ॥५०॥स्वस्वरूप तो होत । हें सर्व तुज कथिलें सांप्रत । अयोगाचें थोर चरित । अयोगांत कांहींच नुरे ॥५१॥तूं मी हें ब्रह्म शाश्वत । न गणेश स्वसंवेद्य असत । त्यायोगे निवृत्ति लाभत । ऐसा प्रभाव अयोगाचा ॥५२॥जो हें अयोग चरित वाचील । अथवा भक्तीनें ऐकेल । तो प्रथम ऐहिक भोग भोगील । अंतीं निवृत्ति लाभेल ॥५३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते अयोगचरितकथनं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP