मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय ३१ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय ३१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३१ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगत । कुत्स नामक विप्रवर असत । नाना तपपरायण वर्तत । सुद्धभाव तो ब्रह्मश्रद्ध ॥१॥शमदमयुक्त होऊन । जडोन्मत्तादिक अवस्थ लाभून । शाक्त ब्रह्मांत तन्मय होऊन । संचार करी इतस्ततः ॥२॥नामरूपात्मकांचें जें ब्रह्म ख्यात । असत्संज्ञक वर्तत । तें जाणून शांतिहीन होत । खेदयुक्त तो झाला ॥३॥तेथ याज्ञवल्क्य येत अवचित । कुत्स त्यास प्रणाम करित । यथाविधि त्यास पूजित । नंतर विचारी विनयनम्र ॥४॥म्हणे सांगा सांप्रत । योग शांतिप्रद मजप्रत । आपण महायोगी प्रख्यात । अनुग्रह एवढा करावा ॥५॥ याज्ञवल्क्य त्यास सांगत । पंचचित्तमय बुद्धि असत । संयोगअयोगरूप ज्ञात । भ्रांतिप्रदा सिद्धि असे ॥६॥नाना सिद्धिप्रदर्शक असत । तेथ गणेशाचें बिंब पडत । मोहधारक तें ज्ञात । बिंबभाव सोडित ब्रह्मभाव ॥७॥त्यास्तव वक्रतुंडास आराधून । करी तूं सर्वदा एकमन । त्यानें शांतियुक्त होऊन । उद्धार तुझा होईल ॥८॥बिंब मायायुक्त ख्यात । सिद्धिबुद्धिग उक्त । त्याचा भाव तोंडानें नष्ट करित । म्हणून हा देव वक्रतुंड ॥९॥मायामुख तदाकार । म्हणून परंमुख वक्र । त्या ब्रह्मसमायोगें थोर । वक्रतुंड हा ख्यात असे ॥१०॥कंठाखालीं मायायुक्त । मस्तक माया वर्जित । वक्राख्य त्यायोगें ज्ञात । म्हणोनी विप्रेशा हा वक्रतुंड ॥११॥या अर्थानें संयुक्त । वक्रतुंडास जरी तूं भजत । तरी होशील शांतियुक्त । गाणपत्य सदा जगांत ॥१२॥ऐसें सांगून याज्ञवल्क्य जात । परत आपल्या आश्रमाप्रत । कुत्स होऊन हर्षयुक्त । वक्रतुंडपूजक झाला ॥१३॥तदनंतर स्वल्प काळानंतर लाभत । महामुनीस त्या शांति सतत । गाणपत्य स्वभावें भजत । वक्रतुंडास भक्तिभावें ॥१४॥कुत्स महायोगी वाचित । वक्रतुंडाचें चरित्र सतत । मौद्गलपुराणीं प्रख्यात । वक्रतुंड खंड असे ॥१५॥एकदा कुत्साच्या दारीं येत । एक पापी भगंदर पीडित । त्या पीडा होती बहुत । आंतिरम कुलोद्भव तो होता ॥१६॥दुःखयुक्त तो नमित । कुत्सास योगश्रेष्ठाप्रत । स्नान करून तेथेंच राहत । त्याच्या सन्निध दुःखजर्जर ॥१७॥कुत्स गणेशास पूजून । बाची वक्रतुंड चरित महान । तो दुःख पीडित ब्राह्मण । मुद्गलपुराण श्रवण नित्य करी ॥१८॥ संपूर्ण मुद्गल पुराण । ऐकता झाला रोगहीन । आगिरस तो प्रणाम करून । नंतर गेला स्वस्थाना ॥१९॥विविध भोग ऐहिक भोगून । नंतर गेला गणेश्वरासमीप पावन । ऐसें हें आश्चर्यंकर वृत्त शोभन । शौंनका असे तुज नमन ॥२०॥ऐसें नानाजन सिद्धि पावले । मुद्गलस्थ वक्रतुंड चरित ऐकून तरले । त्या सर्वांचें वर्णन झाले । अशक्यप्राय तें जाणा ॥२१॥म्हनून संक्षेपें कथिलें तुजप्रत । वक्रतुंडचरित श्रवणाचें पुनीत । माहात्म्य जें अद्भुत । शब्दातीत सर्वदा ॥२२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे दक्षमुद्गलसंवादे वक्रतुंड वरितश्रवणमाहात्म्यवर्णंनं नामैकत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP