मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ९| अध्याय २३ खंड ९ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ खंड ९ - अध्याय २३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २३ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशा नमः । सूत सांगती महिमान । मुद्गलपुराण श्रवणाचें पावन । सुमति नाम एक ब्राह्मण । गालववंशी जन्मला ॥१॥त्यास कुष्ठ रोग होत । त्यायोगें पीडा दारूण लाभत । सर्वांगीं किडे त्याच्या पडत । दुर्गंधयुक्त शरीर ॥२॥पूरक्त घामादींनीं वाप्त । तो विप्र झाला संत्रस्त । तेव्हां स्वदेहघातार्थ उद्यत । तो स्मरण करी गणेशाचें ॥३॥विघ्न नष्ट व्हावें म्हणून । आदरें करी भजन । एवढयांत तेथ आगमन । धौम्य मुनींचें जाहलें ॥४॥ते सर्वार्थवेत्ते साक्षात । दुसरा जातवेद वाटत । तेजानें अग्निसम ज्वलंत । त्यास सुमति प्रणाम करी ॥५॥त्यांच्यापुढें दुःखयुक्त । तो अत्यंत विलाप करित । त्यास पाहून एवढा व्यथित । धौम्य म्हणे दयार्द ॥६॥चिंता करूं नको मनांत । नको करूं देहाचा घात । मौद्गल पुराण ऐक एकचित्त । होशील त्यानें रोगमुक्त ॥७॥सर्वसिद्धिकर पूर्ण । ब्रह्मभूतत्वदायक संपूर्ण । मौद्गलश्रवणार्थ करी गमन । माझ्यासह शीघ्र तूं ॥८॥ऐसें बोळ्लून मुनींसहित । धौम्य त्यास धरून नेत । पुलहाच्या आश्रमांत । तेथ होतें पारायण ॥९॥ज्येष्ठमास लागतां हर्षित । पुलह मुद्गलपारायण करित । होऊनियां हर्षभरित । शुक्त प्रतिपदा तिथीला ॥१०॥नाना जनांच्या समवेत । उपोषणपर तो प्रारंभ करित । श्रवण तत्पर सारे असत । मुद्गल वाची आनंदानें ॥११॥सुमति धौम्यमुनींसहित । तेथ तें पुराण ऐकत । गणेशास मनीं ध्यात । चार दिवसपर्यंत ॥१२॥चार दिवसांनीं समाप्त । तें पारायण होत । पंचमीस पारणा करित । पुलह सर्वांसहित तैं ॥१३॥सुमति जाहला कुष्ठहीन । तत्क्षणीं हें आश्चर्य महान । पाहून हर्षभरित मन । विस्मित सारे जाहले ॥१४॥पुलहास प्रणास करित । धौम्य स्वाश्रमीं परतत । तेथ धौम्यस पूजून म्हणत । सुमति तो ऐसें वचन ॥१५॥या देहाचा कर्ता पिता । महामुने तूंचि माता । यंत संदेह नसे चित्ता । काय करूं मीं तुम्हांसाठीं ॥१६॥हा माझा देह स्वाधीन । केला असे मीं विनीतमन । रक्षण कर माझें दया वाटून । उपदेश मजला करावा ॥१७॥त्यापरी मी वागेत । धौम्य हें ऐकून वचन । म्हणे गणेशाचें करी भजन । मौद्गल पुराण वाचोनियां ॥१८॥त्यायोगें कृतकृत्य विमल । मज तूं प्रिय होशील । ऐसा उपदेश करून निर्मल । धौम्य परतला आश्रमीं आपुल्या ॥१९॥महायोगी तो परत जात । त्यानंतर सुमति सतत । मौद्गल पुराण साहाय्यें भजत । तया गणनाथासी ॥२०॥अंतीं तो ब्रह्ममय होत । इहलोकीं सर्व भोग भोगित । ऐसें हें ज्येष्ठ पारायण फळ ख्यात । ऐक आणखी एकवृत्त ॥२१॥पुलह हर्षसंयुक्त । मुद्गल पारायण करित । तेथ । चांडाळ कोणी येत । अवचित तो दूर उभा ॥२२॥तेथून पाहे तें स्थान । म्हणे हें कौतुक काय महान । दुरून ऐके पुराण । एका श्लोकाचें एक पद ॥२३॥तदनंतर तो विस्मित । गेला स्वेच्छेनें प्रेरित । पापकर्मा पुनः पाप करित । विविध प्रकारें शौनकमुने ॥२४॥तो मरता यमदूत । त्यास नेती त्वरान्वित । यमराजाच्या पुढयांत ठेवित । वंदूनिया यमधर्मास ॥२५॥तेव्हां महाबुद्धि चित्रगुप्त । यमास हिशोव सांगत । महापापी हा चांडाळ असत । महाभागा हा विशेषें ॥२६॥न पुण्याचा लवलेश । त्यानें केला कधीं विशेष । परी मौद्गल पुराणाचें पद एक शेष । यानें ऐकिलें असे पूर्वीं ॥२७॥याचें सर्व पूर्व चरित । पापपूर्ण असे दुश्चित्त । आतां धर्मसंयुक्त । दंड यास सांगावा ॥२८॥चित्रगुप्ताचें ऐकून वचन । महामति धर्म स्मरे एकमन । ध्याऊनिया गजानन । विचार करी मनांत ॥२९॥आतां काय करावें सुखप्रद । तोंच सत्यवाणी सांगत विशद । त्या चांडाळास नरक दुःखद । दाखवी केवळ यमधर्मा ॥३०॥तदनंतर करून तर्जन । यांस स्वर्गभूमीत स्थापन । यथासुख त्यास ठेवून । आनंदवी या चांडाळाला ॥३१॥धर्मराज प्रतापवंत । हर्षभरें तैसें करित । स्वस्थनीं भोगयुक्त । करून स्थापिलें त्या चांडाळा ॥३२॥परी सूर्यपुत्रास वाटे मनांत । आश्चर्यकारक तें वृत्त । तेवढयांत आश्चर्य घडत । परम अद्भुत त्या वेळीं ॥३३॥गणेशदूत तेथ येत । त्या चांडाळास घेऊन जात । स्वानंदलोकांत त्वरित । धर्मादि सर्व विस्मित झाले ॥३४॥ऐसें फळ एकच पद ऐकत । मुद्गल पुराणाचें पुनीत । त्याचें एवढें फळ लाभत । संपूर्ण श्रवणाचें फळ केवढें ॥३५॥तें वर्णनातीत असत । ज्येष्ठ मासांत पारायण करित । ते नर या लोकांत । भोगिती अखिल सुखभोग ॥३६॥अंतीं स्वानंदलोकीं जात । स्वानंदपद लाभत । ऐसें माहात्म्य अद्भुत । वर्णन अशक्य अयुत वर्षांतही ॥३७॥ऐसे मुद्गल पारायण महिमान । सूतांनीं केलें कथन । सौनक मुनि तें ऐकून । धन्य कृतकृत्य झाले ॥३८॥ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खंडे योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्गलसंवादे ज्येष्ठमासपारायणमाहात्म्यवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP