मूळस्तंभ - अध्याय १८

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

आदिशक्ति म्हणे जी देवा ॥ या कलीचा इतुकाच कीं ठेवा ॥ आणिक कांही असेल तो सांगावा ॥ मजप्रती ॥१॥

मग म्हणे महादेव ॥ सांगतों कलिमाहात्म्यभाव ॥ तूं परियेसी सर्व ॥ अपूर्व असे जो ॥२॥

चतुर्दश विद्या असती ॥ चवसष्ट कळा निगुती ॥ आणि नवरस शोभती ॥ तैसींच नवरत्नें ॥३॥

आगम असती अठ्ठावीस ॥ सहा शास्त्रें पुराणें अष्टादश ॥ पांच काव्यें बहुसुरस ॥ आणि चार वेद ॥४॥

पांचवा वेद गुप्त जाण ॥ अष्ट सिद्वी चतुर्दश रत्नें ॥ नवनिधि नवरस पूर्ण ॥ असती पैं ॥५॥

मग बोले आदिशक्ति ॥ देवा नवरस कासया म्हणती ॥ तें सांगावेम मजप्रती ॥ कृपा करोन ॥६॥

ऐसें एकोनि शंभु बोलिले ॥ अहो जी त्रिभुवन भरिलें ॥ तरी तें ऐक वहिलें ॥ निरंजण ज्ञान ॥७॥

तें ज्ञान असे पूर्ण ॥ जेथें निरंजण आपण ॥ आलेख आनंद कारण ॥ सांगतों तुजप्रती ॥८॥

तें निर्विकल्प असद्दश ॥ रसभेदे निर्दोष ॥ तो भेद अविनाश ॥ रस सर्वाचा ॥९॥

तें बीजरुप निश्वित ॥ माजी ब्रह्यरुप सदोदित ॥ त्या रसें भरोनि समस्त ॥ राहिले असे ॥१०॥

ऐशिया बीजाचा अंकुर ॥ तें बीजचि त्याचा प्रकार ॥ आनि त्या अंकुराचा विस्तार ॥ तेचि माया बोलिजे ॥११॥

ते मायेची कल्पना ॥ तेचि अविद्या ऐसे जाणा ॥ तिचा प्रंपच मी तूंपणा ॥ दारुण जाहला ॥१२॥

तो प्रपंच आणि ब्रह्य दोनी ॥ उभारलीं नवरसें करोनी ॥ त्या रसाची केली करणी ॥ व्यासऋषींनें ॥१३॥

रसभरित बहुत बोलणें ॥ ऐसीं केली अठरा पुराणें ॥ परी ब्रह्य एक ऐसें बोलणें ॥ कवितांमाजी ॥१४॥

त्या रसांची भरोवरी ॥ एक रसी भेद चारी ॥ ऐसी केली बहुत कुसरी ॥ कवीश्वरी ॥१५॥

ते आतां नवरस तुजलागुनी ॥ सांगतों ऐक चित्त देउनी ॥ प्रथन तो श्रुंगाररस जाणी ॥ पार्वती वो ॥१६॥

त्या रसामाजी जाण ॥ बाळशक्ति वसे आपण ॥ भोगित असे रसपूर्ण ॥ निरंतर ॥१७॥

चार भेद त्याभीतरीं ॥ कोण कोण ते अवधारीं ॥ तयांची नामें वो सुंदरी ॥ सांगतों आतां ॥१८॥

रेखा , रुप , रंग , भाव चारी ॥ ऐसीं भेदनामें असतीं सुंदरी ॥ आतां द्वितीय रसाची परी ॥ सांगतों ॥१९॥

दुस -याचे नाम हास्यरस ॥ तेथें शक्ति शामळा तिचा रहिवास ॥ तयाचे चार भेद असती खास ॥ स्नेह , सुख , चिदा , प्रीति ऐसे ॥२०॥

आतां तिसर रस सांगेन ॥ त्याचें नाम करुणा जाण ॥ तेथें शक्ति त्रिपुरारी आपण ॥ राहात असे ॥२१॥

त्या रसाचे भेद चारी ॥ जिहीं कविता नानापरी ॥ ते भेद तुजसी सुंदरी ॥ कोण कोण ते सांगतों ॥२२॥

वर्णित , मणित , कृपा , मोह ॥ या चहूं प्रकारांचा भाव ॥ यासींच करुणा ऐसें नांव ॥ असे पैं ॥२३॥

आतां चौथा रस तो रौद्र ॥ आदिशक्ति अधिकार ॥ त्याचेही भेद जाण चार ॥ असती पैं ॥२४॥

काहकार आणि विकार ॥ सिद्वार आणि सीकार ॥ ऐसा हा चहूं प्रकारांचा विस्तार ॥ रौद्र रसाचा ॥२५॥

पांचवा वीररस जाण ॥ तेथें देवता ममता आपण ॥ राहत असे सदा संपन्न ॥ आणि याचे चार भेद ॥२६॥

क्षेत्र , मारु , पैजा , पुरुषार्थ ॥ याचा अर्थ तो यथार्थ ॥ कवि वर्णिती कीं समर्थ ॥ निरंतर ॥२७॥

आतां तो सहावा रस ॥ तयाचें नांव बीभत्स ॥ तेथें देवताप्रणित रहस्य ॥ राहे पैं ॥२८॥

मुकुटीं न्यान , उत्साह , आन ॥ निंदा चवथा भेद जाण ॥ ऐसे सांगितले तुजकारण ॥ भेद चारी ॥२९॥

आतां सातव्या रसाचे कथन ॥ त्यासी अद्वेत ऐसे नाम जाण ॥ तेथें मूळशक्तीचे प्रवेशन ॥ असे पैं ॥३०॥

प्रथम विद्या द्वितीय भय ॥ तैसीच अविद्या तृतीय ॥ आणि चतुर्थ विस्मय ॥ हे चार भेद तयाचे ॥३१॥

यांचे असे कीं लक्षण ॥ मंत्र , पीठ , ब्रह्यांड जाण ॥ आणिक तैसे तेरा वर्ण ॥ देहीं माझे ॥३२॥

ऐसी माझी द्दष्टि जाण ॥ निवृत्ति नाम मुनिजण ॥ तें मज शिवाचें शिवज्ञान ॥ जाण देवीं ॥३३॥

आतां जो भयानक नामें रस ॥ तो आठ्वा बोलिजे सुरस ॥ तेथें मूळशक्तिचा प्रवेश ॥ आणि भेद चार ॥३४॥

शंकित आणि कंपित ॥ स्वरित आणि नादभरित ॥ हे चार भेद वर्णिजेत ॥ वेदांतशास्त्रीं ॥३५॥

तयापासुनी ब्रह्यज्ञान ॥ हें देहद्दष्टांते ऐक्य लक्षण ॥ वेदांत शास्त्र आणि पुराण ॥ रचना व्यासाची ॥३६॥

आतां सांगतों नववा रस ॥ जया नाम शांति सुरस ॥ तेथें ज्ञान शक्तिचा रहिवास ॥ भेद चारी असती ॥३७॥

ज्ञान , ध्यान , क्रिया , आचार चारी ॥ या भेदांचे लक्षण गौरी ॥ संत वर्णिती आलेख अभेद अंतरी ॥ सच्चिदानंद ॥३८॥

ऐसे हें ह्रदय लक्ष ॥ तें अगोचर अलक्ष ॥ तें ध्यान म्हणिजे साक्ष ॥ जाण देवी ॥३९॥

जें विर्विकल्प सद्दश ॥ रस भेद परमहंस ॥ वेदादिरुप सद्दश ॥ तें माझें ज्ञान ॥४०॥

त्याचि क्रियाधर्मे वर्तिजे ॥ त्या नाम क्रिया म्हणिजे ॥ त्या आचारें आचरिजे ॥ तोचि आचार ॥४१॥

त्या बीजाचा तो अंकुरु ॥ तेंचि परब्रह्य निर्धारु ॥ त्याचाही बीजाकारु ॥ त्याची माया बोलिजे ॥४२॥

ती जाणावी कल्पना ॥ बीज प्रपंचादि मी तूंपणा ॥ तीच अविद्या जाण ॥ नामरुप ॥४३॥

यामाजीं प्रपंच मी आत्मा ॥ तोचि कैवल्य परमात्मा ॥ त्याचा कोणा नकळे महिमा ॥ जाण देवी ॥४४॥

हे रस संचले मजपासुनी ॥ आणि चतुर्दश विद्यांची करणी ॥ चौसष्ट कळा त्यांपासुनी ॥ कलियुगीं जाहल्या ॥४५॥

मग पार्वती देवासी म्हणे ॥ चौदा विद्या मज सांगणें ॥ आणि विद्या कासया म्हणणें ॥ देवराया ॥४६॥

आत्मज्ञान वेदपठण ॥ धनुर्बाणधारण लिहिणें ॥ गणित करणें पोहणें विणणे ॥ शस्त्र धरणें तैसेंचि ॥४७॥

वैद्यक आणि ज्योतिषशास्त्र ॥ रमलविद्या सूपशास्त्र ॥ गायन आणि गारुड विचित्र ॥ ह्या जाण चौदा विद्या ॥४८॥

सर्व हस्तगत लघुकरण ॥ हेंचि चौदा विद्यांचे साधन ॥ देवी म्यां रचिलें ज्ञान ॥ सर्व जनांसी ॥४९॥

तंव उमा म्हणे जी जगन्नाथा ॥ चौसष्ट कळा सांगा समस्ता ॥ मग शंकर झाला बोलता ॥ नामें सर्व कळांची॥५०॥

वेद १ , वेदांग , २ , स्मृति ३ , अक्षर ४ , नाटक ५ , भारत ६ , धनुर्विद्या ७ , संधिविग्रह ८ , लक्षता ९ , युद्व १० , निरोध ११ , संधी

१२ भटसमय १३ , सत्व १४ , ब्रह्ययोग १५ , ह्योतिष १६ , शिल्पशास्त्र १७ , पान १८ , मृट १९ , चावन २० , लैभेविष्ट २१ , अष्टमा

२२ , आकाशगमन २३ , धुर्गमन २४ , परकायाप्रवेश २५ , संग्रामविजय २६ , अपेक्षा २७ , अतिहास्य २८ , नीतिशास्र

२९ , कनकपरिक्षा ३० , सामुद्रिक ३१ , स्तंभन ३२ , मोहन ३३ , उच्चाटन ३४ , धुसयण ३५ , मधुर ३६ , रंभाशयन

३७ , वाक्साहाण ३८ , देशप्रवेश ३९ , चित्रलेखन ४० , मंत्रवेद ४१ , नानावेश ४२ , वाद्यवादन ४३ , त्रीमिर ४४ , वाहन

४५ , रसवाद्य ४६ , वीसाग्दीमंत्र ४७ , प्रत्यक्षाकार ४८ , विधित्व ४९ , अग्निसंभन ५० , शूलस्तंभन ५१ , अकोचन

५२ , मईद्रक ५३ , सूपशास्त्र ५४ , रतिशास्त्र ५५ , ओंवीबंध ५६ , चक्षुलक्षण ५७ , रत्नपरीक्षा ५८ , अश्वपरिक्षा ५९ , नारीपरीक्षा

६० , पुरुषपरीक्षा ६१ , संगीतलक्षण ६२ , वायुस्तंभन ६३ , इंद्रजाळ ६४ , ॥ एंव चौसष्ट कळा देवी जाण ॥ हे चौदा विद्यांचे

व्यंजन ॥ तुज सांगितलें संपूर्ण ॥ येणें सर्व कर्मे जळती ॥५१॥

चालवितां भरले अहंमती ॥ तेणें ब्रह्यविद्या गेली परती ॥ मातें नेणती ते पडिले पंथी ॥ नानाकर्माचे ॥५२॥

एक विद्या चिंतिती सार ॥ एकासी पुराणें आवडती फार ॥ परी त्यांसी न कळे निर्धार ॥ तेणें मज वंचिलें ॥५३॥

तंव बोले पार्वती ॥ पुराणें सांगा मजप्रती ॥ मग मानवाची स्थिति ॥ कळेल मज ॥५४॥

मग म्हणे शूलपाणी ॥ जीं अठरा पुराणें भवानी ॥ त्यांची नामें तुजलागुनी ॥ सांगतों ऐक ॥५५॥

ब्रह्यपुराण १ , पद्मपुराण २ , शिवपुराण ३ , विष्णुपुराण ४ , भागवत ५ , नारदपुराण ६ , मार्कडेयपुराण ७ , अग्निपुराण

८ , भविष्योत्तरपुराण ९ , ब्रह्यवैवर्तपुराण १० , वामनपुराण ११ , वराहपुराण १२ , मत्स्यपुराण १३ , ब्रह्यांडपुराण १४ , कर्मपुराण

१५ , गरुडपुराण १६ , स्कंदपुराण १७ , लिंगपुराण १८ , ॥ ऐसी हीं अठरा पुराणें ॥ लोक घेवोनि राहिले मनें ॥ यांचिया

जागतेपणें ॥ दुरावती मज ॥५६॥

आणि अठरापकड जाती ॥ अठरापुराणेम धरिती हाती ॥ त्यांनी सर्वासी होय भ्रांती ॥ ऐसी स्थिती कलीची ॥५७॥

तंव शक्ति म्हणे जी देवा ॥ कोणे पुराणी कोणाचा ठेवा ॥ तो विवरण करुनी सांगावा ॥ मजलागी ॥५८॥

मग म्हणे शूलपाणी ॥ ह्या अष्टादशपुराणीं ॥ कोण देवाची कैसी मांडणी ॥ ती ऐक आतां ॥ ५९॥

दहा पुराणीं शिव वर्णिल ॥ चार पुराणी विष्णु स्तविला ॥ पुराणद्वयी ब्रह्या गाइला ॥ आणि दोहोंत अग्निसुर्य ॥६०॥

ऐसीं ही अठरा पुराणें ॥ आहे नाहीं पुरें अपुरेपणें ॥ अपुरें तें पुरे करणें ॥ वादविवाद करोनिंया ॥६१॥

आतां सांगतों ऐक उमे ॥ सहा शास्त्रें अतिउत्तमें ॥ तयांची कोण कोण नामें ॥ पृथक् पृथक् ॥६२॥

पूर्व उत्तर मीमांसा दोनी ॥ ज्योतिर्निबंध चिंतामणी ॥ तर्कशास्त्र वेदांत जाणी ॥ सहा शास्त्रें ॥६३॥

प्रथम अमरसिंहकाव्य ॥ निघोटकाव्य रघुबंशकाव्य ॥ सारस्वत कुमारसंभवकाव्य ॥ ऐसीं ही पाच काव्यें ॥६४॥

आतां सांगेन वेद चारी ॥ जे वर्तती सर्व चराचरी ॥ ते वेद ऐके गौरी ॥ स्वस्थचित्तें ॥६५॥

ऋग्वेद आणि यजुर्वेद ॥ सामवेद आणि अथर्ववेद ॥ पांचवा असे सूक्ष्मवेद ॥ ऐसे वेद पांच हे ॥६६॥

पार्वतीसी म्हणे त्रिनयन ॥ नवनिधि तुजकारण ॥ आणि अष्टमहासिद्वि सांगेन ॥ ऐक आतां ॥६७॥

घोडा हत्ति आणि रत्न ॥ गड दुर्ग स्त्री सुवर्ण ॥ सर्व रथ आणि धान्य ॥ ऐसे हे नवविधि ॥६८॥

बहुतरुपता दूरश्रवणी गरिमा ॥ प्रकाशरुपता दूरदर्शिता लघिमा ॥ परकायाप्रवेश आणि अणिमा ॥ ह्या अष्टसिद्वि ॥६९॥

आतां नवरत्नहार ॥ जो तुझा होई शृंगार ॥ त्या नवरत्नाचां प्रकार ॥ परिस देवी ॥७०॥

श्र्लोक ॥ मणिमुक्तप्रवालंचपाचुपैरोजवज्रंच ॥ नीलगोमेदवैदूर्यनवरत्नान्यमूनिही ॥१॥

टीका ॥ मणी पांच पोवळें ॥ पैरोज वज्र मुक्ताफळें ॥ वैडूर्य गोमेद नीळ ॥ ऐसी जाण नवरत्नें ॥७१॥

तंव पार्वती म्हणे जी देवा ॥ नवग्रह कासया नांवा ॥ आणि अष्ट नद्यांची शांभवा ॥ नामें सांगा मज ॥७२॥

मग बोले शूळपाणी ॥ नवग्रह ऐक भवानी ॥ आणि अष्टनद्या कोण कोणी ॥ सांगतों ऐक देवी ॥७३॥

प्रथम अर्क दुसरा सोम ॥ कुज सौम्य जीव पंचम ॥ भृगु सौरि राहु अष्टम ॥ आणि नवम केतु होय ॥७४॥

ऐसे नवग्रह परियेसा ॥ आठ फिरती अष्टदिशा ॥ नववा तो दिशा ॥ मनुष्य भोगित असे ॥७५॥

आतां शुभाशुभासी ॥ बोलिले ते परियेसीं ॥ मनुष्यीं पहावें प्रयाणासी ॥ पार्वती वो ॥७६॥

श्र्लोक ॥ शनिसोमौचपूर्वेतुह्युत्तरेबुधमंगलौ ॥ रविशुक्रौपश्चिमेचजीवस्तिष्ठतिदक्षिणे ॥१॥

टीका ॥

शनि सोमवारी वर्ज पूर्वेसी ॥ बुध मंगळवारी वर्ज उत्तरेसी ॥ रवि शुक्रवारी वर्ज पश्चिमेसी ॥ गुरुवारी दक्षिणेसी गमन बर्ज ॥७७॥

आतां अष्ट नद्यांची नामें ॥ जीं सर्व तीर्थामाजी उत्तमें ॥ तीं सांगतों सर्वोत्तमे ॥ तुजलागी ॥७८॥

गंगा यमुना सरस्वती ॥ तुंगभद्रा नर्मदा भागीरथी ॥ कावेरी तापी ऐसी पार्वती ॥ आठ नामे नद्यांची ॥७९॥

आतां नऊ आनंदांची नावें ॥ सांगतों त्वां परिसावें ॥ जेणें महादोष स्वभावे ॥ जाती उच्चारितां ॥८०॥

शिवानंद वेदानंद ॥ सहजानंद बीजानंद ॥ महानंद भावानंद ॥ धर्मानंद सातवा ॥८१॥

आनंदानंद तो अष्टम ॥ प्रेमानंद असे नवम ॥ आतां सहा उपशास्त्रांची नामें ॥ सांगतों ऐक ॥८२॥

शिल्प , भेद , पंडुर ॥ महाभाष्य , सूपशास्त्र ॥ शिव सहावें जाण सुंदर ॥ पार्वती वो ॥८३॥

पुनः प्रश्न करी पार्वती ॥ देवा चौदा रत्नें कासया म्हणती ॥ मग बोले तो पशुपती ॥ नामें चौदा रत्नांची ॥८४॥

श्र्लोक ॥

लक्ष्मीःकौस्तुभपारिजातकसुराधन्वंतरिश्वंद्रमागा वःकामदुधासुरेश्वरगजोरंभादि देवांगनाः ॥

अश्वःसप्तमुखोविषंहरिधनुःशंखोऽमृत्तंचांबुधेरत्नानीहचतुर्दशप्रतिदिनंकुर्वतुवोर्मगलम् ॥

॥ टीका ॥ लक्ष्मी , कौस्तुभ , सुरा पारिजातक ॥ धन्वंतरी , चंद्रमा , कामधेनु , शंख ॥ ऐरावत , रंभा . उच्चैःश्रवा , विख ॥ धनुष्य अमृत ऐसी चौदा ॥८५॥

परी ह्या सर्वाचा कर्ता ॥ मी शंकर असें सर्वथा ॥ ऐसें जयाच्या कळेल चित्ता ॥ तोचि ज्ञानी ॥८६॥

तंव दुर्गा म्हणे चंद्रमौळी ॥ आतां कळली तुमची कुळी ॥ त्यानें माझी भ्रांति सकळी ॥ दुरावली ॥८७॥

परी देवा एक आहे पुसणें ॥ हे भोग मी सर्वथा नेंणें ॥ तरी हें ज्ञान मजकारणें ॥ करावे जी ॥८८॥

मग सांगे त्रिनयन ॥ सुंगध स्त्री गायन ॥ वस्त्र तांबूल भोजन ॥ मार्जन आणि निद्रा ॥८९॥

हे अष्टभोग बोलिले ॥ ते देवी तुज सांगितले ॥ तंव पार्वतीनें पुशिलें ॥ शिवाप्रति ॥९०॥

म्हणे देवा चंद्रमौळी ॥ तूं अवतरलासी तिहीं काळीं ॥ ते अवतार भूंमंडळीं ॥ असती कवण ॥९१॥

पुढें आतां देव शक्तिप्रती ॥ बारा ज्योतिलिंगे सांगती ॥ ती स्मरण केल्या होती ॥ पापें भस्म ॥९२॥

तें शिवाचें अवतरन ॥ श्रोती कीजे भक्तिश्रवण ॥ तयाचे चुकेल जन्ममरण ॥ म्हणे महादेव ॥९३॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे शिवपुराणे महाशास्त्रे ईश्वरपार्वतीसंवादे अष्टादशोऽध्यायः॥१८॥

॥ श्रीशिवासदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP