मूळस्तंभ - अध्याय २
‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.
श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीशंकराय नमः ॥ ॥
यावरी शक्ति म्हणे आपण ॥ देवा तुम्हीं सांगितले संपूर्ण ॥ गायत्रीमंत्र उपासन ॥ जयापासून जन्म देवत्रयास ॥१॥
या तारजयुगीं इतुला ॥ ब्रह्ययासी गायत्रीमंत्र उपदेशिला ॥ त्या पासाव ब्रह्यज्ञान पावला ॥ सोहंबोधू ॥२॥
होय न होय चुकवुनी ॥ परमतत्वातें पावोनी ॥ ऐसा तीस संवत्सर उपासनी ॥ होता देवो ॥३॥
आता ब्रह्ययाचे आयुष्य ॥ शक्तितें सांगे महेश ॥ युगांची संख्या मुख्य ॥ संवत्सर प्रमाण ॥४॥
श्लोक ॥
चतुर्युगसहस्त्राणि दिनमेकं प्रजापतेः ॥ प्रजापतिसहस्त्रेण विष्णोर्यामार्ध-मेव च ॥१॥
विष्णोर्द्वादशलक्षाणि रुद्रस्य घटिकार्धकम् ॥ एकादशमी रुद्रैश्व निमेषार्ध शिवस्य तु ॥२॥
शिवस्य दिनमानेन भवेद्वर्षशतं यदा ॥ तदा मयं जगत्दर्व यात्येवमगम्यताम् ॥३॥
अवो देवी मी जांबळी देयी जे वेळीं ॥ तेव्हा बोटीं वाजवी चिपुळी ॥ त्या चिपुळ्या तीनशे साठ जे वेळी ॥ ती एक घटिका ॥५॥
ऐशा आठ घटिका ॥ तैं होय प्रहर निका ॥ ते आठ प्रहर होती देखा ॥ तैं एक दिनरात्र ॥६॥
ते रात्रदिन तीस ॥ तैं होय एक मास ॥ ऐसे लोटता बारा मास ॥ होय एक संवत्सर ॥७॥
हें संवत्सर काल प्रमाण ॥ दशशत म्हणजे सहस्त्र जाण ॥ आणि शतसहस्त्र म्हणजे लक्ष पूर्ण ॥ शतलक्ष म्हणजे एक कोटी ॥८॥
अकरा कोटी संवत्सरे ॥ आणि एकसष्ट लक्ष चौपन्न सहस्त्रें ॥ लोटंता होय आयुष्य पुरें ॥ इंद्राचे ॥९॥
ऐसे इंद्र चवदा लोटती ॥ तो ब्रह्ययाचा एक दिन बोलती ॥ ऐसे दिवस तीस म्हणती ॥ तो एक मास ॥१०॥
ऐसे लोटती बारा मास ॥ तै होय जाण एक वरुष ॥ ऐसी साठ वरुषें परिस ॥ तैं एक महासंवत्सर ॥११॥
ऐसी महासंवत्सरें एक शत ॥ लोटतां एक युग बोलत ॥ ऐसीं युगें अठरा जार ॥ तरी एक शंख होय ॥१२॥
ऐसे शंख सप्तशत ॥आणि एकविंशति सहस्त्र होत ॥ तेव्हां आयुष्याचा होय अंत ॥ ब्रह्ययाच्या ॥१३॥
ऐसे बारा ब्रह्ये मरती ॥ येरांची संख्या सांगों किती ॥ ते माझे अर्ध निमिष्यीं होती जाती ॥ ऐसा अखंड मी न खंडे ॥१४॥
मग देवासी म्हणे पार्वती ॥ ही तारजयुगाची केली गणती ॥ तुझ्या अर्ध निमिष्यांत होती जाती ॥ तरी तंच थोर कीं देवा ॥१५॥
देवां तुं श्रेष्ट कल्पवृक्षु ॥ अर्चितां फळ विशेष ॥ प्रतिरसीं रसिक सुरसु ॥ अमुल्य तैसाचि ॥१६॥
देवा हा सर्व साकारु ॥ तूचिं परम वस्तु अपरंपारु ॥ कथिले अव्यक्त निराकारु ॥ तुजपासोन ॥१७॥
आणि तुंचि सर्व कर्ता ॥ हें चराचर लपविता ॥ परी त्या अभिप्रायाच्या गुह्यार्था ॥ काहीं पुसतें स्वामी ॥१८॥
हा तारजयुग अकरा क्रोडी ॥ तुम्हीं सांगितली परवडी ॥ तरी तुझिया अर्धनिनिष्याची प्रौढी ॥ ते सांगा देवा ॥१९॥
यावरी ईश्वर बोलिले ॥ सर्व साकाररुप आटलें ॥ प्रपंच मात्र प्रगटलें ॥ सर्व रचनारस ॥२०॥
एकवटले अद्वैतमुसीं पाहीं ॥ नुरेचि पंचभूतांचे काहीं ॥ उत्पत्ति प्रळय माझ्या ठायीं ॥ जाणिजे देवी ॥२१॥
ते वेळीं मीच उरें एकला ॥ अविनाशरुप संचला ॥ सर्व मजमाजी हरपला ॥ आदि अंतू ॥२२॥
सर्वपणाचेनि सुरवाडें ॥ मजमाजी मी माझे पवाडॆ ॥ मी प्रळयाग्रीसी नातुडॆं ॥ मृत्युंजय मजमाजी ॥२३॥
श्लोक ॥
जाता ह्यसंख्या ब्रह्याणो विष्णुकोटिर्लयं गता ॥ गंगावालुसमा इंद्राः किंचिद्वयानस्थिते शिवे ॥१॥
तंव म्हणे त्रिपुरारी ॥ माझिया प्रळयाच्या कातरी ॥ पडिले कवण कवण अवधारीं ॥ आदिशक्ति तुं ॥ २४॥
अकरा कोटी चौसष्ट लाख ॥ आणि पन्नास सहस्त्र वर्षे देख ॥ इतुका वाचोनी अमरनायक ॥ शेवटी पावे लयाप्रती ॥२५॥
इतके आयुष्याची मिती ॥ प्रळय पावे सुरपती ॥ तंव सत्तावीस वेळां जाती ॥ ही चार युगे ॥२६॥
तैं चवदा वेळा इंद्र होत ॥ इतुके काळाचें गणित ॥ तों प्रहराचा घंटा वाजवित ॥ ब्रह्यदेव ॥२७॥
तों इंद्र सहस्त्र वेळां उपजे ॥ आणि सहस्त्र वेळां विसजें ॥ तंव आयुष्य पुरे सहजें ॥ ब्रह्ययाचें ॥२८॥
इतुक्या आयुष्याचा ब्रह्या ॥ पावे सहस्त्र वेळां जन्मा ॥ तो होय पुरुषोत्तमा ॥ अर्ध प्रहरु ॥२९॥
विष्णूच्या एका दिवसात ॥ सर्व भूतांसी पुरे अंत ॥ तैं साठ तीनशे संकेत ॥ वर्षाचा जाण ॥३०॥
ऐशिया वर्षाची संख्या ॥ होय अठ्ठावीस सहस्त्र सात लक्षा ॥ ते वेळी एक होय संख्या ॥ जळप्रळयाची ॥३१॥
ऐसे जळप्रळय होत ॥ आठ वेळां निभ्रांत ॥ तों पुरे आयुष्याचा अंत ॥ महाविष्णूच्या ॥३२॥
ऐसे महाविष्णूचें प्रमाण ॥ बारा लक्ष संख्या जाण ॥ तैं रुद्राचे होय परिपूर्ण यामार्घ ॥३३॥
सोळा अर्धयामीं दिवस गणती ॥ ते साठ तीनशें दिवस भरती ॥ तैं होय संख्या निगुती ॥ एक वर्षाची ॥३४॥
ऐसी शतकोटी वर्ष होती ॥ तैं रुद्रप्रळय वो सती ॥ ते अकरा रुद्र सामावती ॥ माझ्या स्वरुपीं ॥३५॥
ऐसे अकरा रुद्र मुख्य ॥ प्रळय पावती असंख्य ॥ त्यावेळी अर्ध निमिष्य ॥ होय माझॆं ॥३६॥
माझ्या तिजा नेत्रीचें पाते ॥ सहज निरक्षण भवती होतें ॥ तें नावेक आलें मागुतें ॥ स्वस्था-नासी ॥३७॥
ब्रह्या विष्णू रुद्र जाण ॥ हे त्रिविध माझे गुण ॥ उत्पत्ति स्थिति आणि मरण ॥ अधिकारी हे ॥३८॥
तो भोग आम्हांसीच आला ॥ उपेगा आधींच फिटला ॥ माझिया अर्ध निमिष्यांत वेंचला ॥ उरेचि ना ॥३९॥
ब्रह्या बीजें विस्तारी भावें ॥ विष्णु प्रतिपाळी आघवे ॥ रुद्रें एकवटोनि आणावें ॥ निजस्थानीं ॥४०॥
आतां असो ही सर्वाची पाठवणी ॥ माझी मजची दाटणी ॥ मृत्यू मूर्च्छा तैसीच ग्लानी ॥ माझ्या स्वरुपीं ॥४१॥
सर्वपणें मीच संचरलो ॥ अव्यक्तस्वरुपी सुरवाडलों ॥ सदा शिवत्वीं पैसावलों ॥ परिपूर्णत्वें ॥४२॥
सर्व साकारचि अव्यक्त ॥ मजमाजीच अखंडित ॥ द्दश्याद्दश्य मूर्तिमंत ॥ आपे-आप ॥४३॥
मजमाजी मी असें ॥ आपल्या स्वरुपाचेनि पैसे ॥ आणि हारपले पै दिसे ॥ मजमाजी ॥४४॥
ऐसा मीच वेष्टलो ॥ सर्वत्र ब्यापकत्वें दाटलों ॥ नेणे केधवा म्यां घोंटिलों ॥ महाप्रळय ॥४५॥
संहारसमयाचे रिघवणें ॥ घेतसें सर्वाकाराचें घेणे ॥ प्रळय महाप्रळयासी उपणें ॥ माझ्या स्वरुपीं ॥ ४६॥
प्रळयादी काजप्रकृति उघडे ॥ निर्जळें न पवती स्वरुपाचिये कडे ॥ माझ्या एकांतीचे तेज धडाडे ॥ जळोनि गेलें ॥४७॥
ऐसा अढळ मी निजस्तंभू ॥ सर्व साकार निरालंबु ॥ अखंडस्वरुप स्वयंभू ॥ व्यक्ताब्यक्त जाण देवी ॥४८॥
परी तुज शक्तीसी पोटाळे ॥ जो काळ प्रळयासी नातळॆ ॥ मज अविनाशातें नकळे ॥ जन्ममरण ॥४९॥
तंव शक्ति म्हणॆ देवासी ॥ देवा तुं दाही दिशा पांघुरसी ॥ म्हणोनी दिगंबर म्हणविसी ॥ तूं सर्वरुपी सर्वकर्ता ॥५०॥
तुमच्या अर्धागीं मज असणे ॥ परी देवा बुम्हांसी नेणे ॥ मज आदिअंतीं अनुसरणे ॥ स्वरुप तुमचे ॥५१॥
ही सप्तपाताळरचना अरुती ॥ तुझिया स्वरुपामाजी असती ॥ एकवीस स्वर्ग मुगुटावरती ॥ आणि चवदा भुवनें ॥५२॥
आणि ईश्वरासी म्हणे भवानी ॥ एक पुसेन पिनाकपाणी ॥ विश्वउपकारालागुनी ॥ तें सांगा देवा ॥५३॥
देवा तुं विश्वीभरित ॥ प्रत्यक्ष साकारवत ॥ त्रिलोकामाजी पूर्ण भरित ॥ विश्वरुपा ॥५४॥
तुजपासाव नाममंत्र समस्त ॥ आणि ध्यान धारणा सतत ॥ तुज पहावया मतें बहुत ॥ धांवती नाना मार्गी ॥५५॥
मग म्हणे तो ईश्वर ॥ अवो मी अवघें चराचर ॥व्यापूनि असता तुं दुर ॥ अविचारें कां पाहसी ॥५६॥
मी त्रिभुवनी चराचरु ॥ ब्रह्यादिक नेणती माझा पारु ॥ मग ते नाना कर्मी अविचारु ॥ मंदमती प्रवर्तले ॥५७॥
हे इंद्र चंद्र ब्रह्यादिक ॥ यांसी नाना कर्मे संसारीचे धोक ॥ मागुते संसारा न यावे हे एक ॥ प्रयत्न्न करिती ॥५८॥
ते नाना कर्मे चढले हटा ॥ संसारे खादलें म्हणती कटकटा ॥ मज एकलियाचा विस्तार श्रेष्ठा ॥ नकळें जाण ॥५९॥
मज पासोनि सर्व झालें ॥ या संसाराभयें भ्रमले ॥ मग कुकर्मासि प्रवर्तले ॥ नाना मार्गी ॥६०॥
देवी तूं मजपासोनी ॥ अठरायुगांची उभवणी ॥ सर्व जीव चारी खाणी ॥ मीचि शिव वो ॥६१॥
शक्ति तुझा फिटला संदेह ॥ त्रिभुवनी तुं देवी मी देव ॥ तुझा माझा विस्तार पाही सर्व ॥ हें नेणसी ॥६२॥
देवीं देवविस्तारु ॥ देवीं देवचराचरु ॥ देवीं देवअवतारु ॥ ल्विश्वरुप देवी वो ॥६३॥
देवीं देवप्रकृति पुरुषा एक ॥तुज मजगूनि नाहीं आणिक ॥ निपजले कैसे अनेक ॥ तें मी सांगेन ॥६४॥
जगाचा जनक मी ईश्वरु ॥ हा तुं जाणावा निर्धारु ॥ आणि अवघाचि संचारु ॥ मी ईश्वर जाण ॥६५॥
पार्वती म्हणे देवा साचार ॥ हा सर्व संसार तुं ईश्वर ॥ नव्हसी तरी नाम ईश्वर ॥ लटिकेंची कीं ॥६६॥
आतां मज जाहली तृत्ती ॥ देवा तुम्हापासोनी सर्व उत्पत्ती ॥ परी ज्याचें ध्यान तुझे चित्ती ॥ तें सांगा मज ॥६७॥
तुम्हांविण कोणी नाहीं ॥ तरी तुम्हीं ध्यान कोणाचे करिता पाहीं ॥ तुमची योगाभरणॆ काय कायी ॥ तीं सांगा देवा ॥६८॥
मग म्हणॆ ईश्वरु ॥निरंजण आभरणाचा विस्तारु ॥ निरंजण तो ईश्वरु ॥ लेइला असे ॥६९॥
एकवीस ब्रम्ह्याडेंहें कडासन ॥ दंडर्धी एकडार्धी एक थाट उदरी कुपीन ॥ यवनु जोगवटा स्वार्थ इच्छा विवेक जाण ॥ द्दश्य पादुका जाण देवी ॥७०॥
पवन मेखळा नीळकंठा ॥ पंचतत्वकथा जोगवटा ॥ प्रियाकुंडली ब्रह्यकमळ टोपी धूर्जटा ॥ जाण देवी ॥७१॥
अलेख तेचि आधारी ॥ विश्व विभूती भरली त्या भीतरी ॥ अष्टमा सिद्वि अष्टभाव वनस्थळीं अवधारीं ॥ भार संजीवनी ॥७२॥
नवद्वारें ही शैली ॥ दाहावेंद्वारी टाळी ॥ अभ्रकमंडलु सत्रावीचें जळी ॥ भरिलें देवी ॥७३॥
सत्य तेचिं कडासन ॥ वरी सत्यत्व तेंचि आसन ॥ ऊर्ध्व मन पवन जाण ॥ समाधान अव्यक्तिं ॥७४॥
अनुहत शिंगी नाद ध्वनी ॥ श्वेतशेला अष्टधा पांघरुनी ॥ भूचरी सिद्वी गहनी ॥ गहन अति जाण देवी ॥७५॥
ऐसी हीं आभरणॆं ॥ सांगितली तुजकारणॆं ॥ हीं जाणीतल्यावरी मनें ॥ स्वयें सिद्व होईजे ॥७६॥
ऐसीं आभरणॆ परिधान ॥ जो सर्व सिद्व जाणे जाण ॥ येर वरवर करिती मुंडण ॥ तें काय करावें ॥७७॥
कुळ कर्ममार्ग जे त्यजिती ॥ जातिकर्मे प्रतिपादिती ॥ त्यांसी दोनी अर्थ चुकती ॥ पडती पंथी भ्रांतीचे ॥७८॥
तरी माझा कुळकर्म मार्ग ॥ सिद्व बोली कैवल्य ज्ञानऊर्ध्वसंसर्ग ॥ विरालंबी पीठस्वर्ग ॥ दिव्यशक्ति जाण देवी ॥७९॥
नक्षत्र सत्य समाधान ॥ निर्गुणगंगा सत्य तें गमन ॥ ब्रह्यद्वारींचे लक्षालक्ष तें निरांजन ॥ आदिसिद्व ॥८०॥
अष्टकल्लोळिणी आदि प्रेमजाण ॥ आनंदनिर्वाणतेथीचें तनमन ॥ अव्यक्त जागरण सिद्वांतदिप गहन ॥ तारक राममंत्र ॥८१॥
आदि ब्रह्या निश्चल गात्र ॥ आणि प्रतिसुनिरासुळ गोत्र ॥ आदि अवलोकन संतोषवचन पवित्र ॥ विवेकवृंद ॥८२॥
करुणावोनसु आणि मुक्ति ॥ स्वभाव आसन समद्दष्टी निगुती ॥ अनुभव पंथ हे दर्शनी स्थिती ॥ प्रेम तें समाधान देवी ॥८३॥
संतोषगोष्टी अक-क्पित वचन ॥ निरासविद्या हंसउच्चार तत्वजाण ॥ संजोग भूतहिंसा प्रतिपाळण ॥ उपसाम श्री-कमळीं ॥ ८४॥
ॐनमःशिवाय शिवसोहंहंसाय श्रीगुरुलिंगाय नमः ॥
॥ ही शिवगायत्री अहंजडत्वाची हे उत्तमगती ॥ पिशाच चेष्टा उन्मनीअवस्था स्वरुप सती ॥ सर्वस्वरुपसत्य-स्फूर्ती ॥ विवेक वचन जाण देवी ॥८५॥
ओंकारमूर्ती निराकार ॥ स्थिर लोचन ते साचार ॥ उत्पत्ति भसंख्यमंडळाकार ॥ जाण देवी ॥८६॥
आलेखवृक्ष त्रिभुवन ॥ घडुअकुळसंजोग अपार जाण ॥ सप्तपाताळ गहन ॥ पासुका देवी ॥८७॥
ऐसा स्वयभुं सदोदितू ॥ देवी ध्यान करीं तुं ॥ आवो आदि आणि अंतु ॥ नाहीं मज ॥८८॥
देवी गगनद्वारीचें लक्षण ॥ रेचक पूरक कुंभक जाण ॥ त्राहाटक संयोग आकुंचन ॥ देवी वो ॥ ८९॥
चाचरी भूचरी खेचरी ॥लक्षते भिडती अगोचरी ॥ स्फुट ती त्रिकुटाभीतरी ॥ षट्चक्र भॆदती ॥९०॥
तेथें प्रत्यक्ष प्रमाण अपान ॥ उदान समान ब्यान ॥ करीं यांमध्ये मिळण ॥ जाण देवी ॥९१॥
एकांता-मध्ये उलटती ॥ नाद मध्यें उसळती ॥ गंगा मिनी त्या इडापिंगला होती ॥ योगक्षेत्रीं ॥९२॥
देउनिया बिंदुनासिका कपाटी ॥ सात फणी मणी कल्पकोटी ॥ नागसंकोच सुषुम्ना शेवटीं ॥ ऐक्य होय ॥९३॥
पुन: देवीसी सांगे शंकर ॥ पवनांमध्ये ओंकार ॥ धर्मतीर्थपवित्र ॥ विचार तैसाचि ॥९४॥
जलकुंडलिनी योगध्यान सार ॥ सावित्री शक्ति सप्त समुद्र ॥ निश्वळ वायु-स्तंभ परिकर ॥ जाण देवी ॥९५॥
माझा त्रैलोक्य हा प्राण ॥ तेथें ब्रह्यधारणादि तटाक संपूर्ण ॥ मूळ आधी अमरकंद प्रवीण ॥ चिन्ह तत्व तें फळ देवी ॥९६॥
मान आणि अभि-मान ॥ संकल्प विकल्प जाणोन ॥ ब्रह्यपद तीर्थ करुन ॥ जपतो जयविजय जाण देवी ॥९७॥
स्वसंतोष स्वयें मुक्ति ॥ आदि ते समाधी प्रेमतत्वीं ॥ दिशा स्फुरण आदितत्वीं ॥ ज्ञान तें द्दष्टीदेवी ॥९८॥
सर्वव्यापक तें मन ॥ एकांत तेंचि ज्ञान ॥ अनुत्तरबुद्वी पद प्राण ॥ विभूति सिद्व संकेत निरंतर ॥९९॥
मज स्वयंभाचीं भावी आभरणें ॥ सर्वांगीं सर्व धारणॆं ॥ ध्यान धारणा समाधी लक्षणें ॥ मनासी आलीं ॥१००॥
मी निरंजनी निराधार ॥ ऐसा तारज युगाचा प्रकार ॥ हा सकळीक सविस्तर ॥ तुज सांगितला देवी ॥१॥
ब्रह्या विष्णु रुद्र पुरंदर ॥ हे मजमाजी गेले अपार ॥ मी स्वयंभू निराकार ॥ निरंतर जाण देवी ॥२॥
वेदशास्त्रें श्रुति पुराणें ॥ कवित्व कविकुशळता करणॆं ॥ हें सर्व अरुती जाणें ॥ मी युगांर जाण देवी ॥३॥
श्र्लोक ॥ ईश्वर उवाच ॥ सृष्टि: सृता मया पूर्व ममोत्पत्तिनिरंजनात् ॥ निरंजनस्य त्वालेखा दालेखोऽगोचरादभूत् ॥१॥
ही त्रेलोस्यशक्ति मजपासुनी ॥ मज उत्पत्ति निरंजनी ॥ आले-खाची करणी निरंजनी ॥ आलेख केला अगोचरें ॥४॥
अगोचर पदज्ञान ॥ हाचि सिद्वांत पूर्ण ॥ स्वयें घ्याती योगीजन ॥ अंररध्यानीं ॥५॥
हें तारजयुगीं कथिले ॥ तेथून सिद्वांत अध्यात्म प्रगटलें ॥ तेचि सिद्वीं साधिलें ॥ शिवज्ञान देवी ॥६॥
हा शिवनिबंध प्रसिद्व ॥ पूर्णयोग सिद्वांत बोध ॥ यापासुनी चार वेद ॥ प्रगट केले देवी ॥७॥
हा संपूर्ण गो ऐके ॥ त्यासी जन्ममरण दुरी ठाके ॥ प्रपंच संसारघोळ चुके ॥ यथार्थ जाण देवी ॥८॥
ऐसे भ्रांती भुलवणें ॥ नटलावी आडलावणॆं ॥ मग फेडिलिया जाणणे ॥ वीट नये मना ॥९॥
जरी वाणी म्हणाल मराठी ॥ कठोर भाषा शूद्राटी ॥ तरी संस्कृत द्दष्टी ॥ तें सांगों देवी ॥११०॥
तैसी संस्कृत शब्दीं आटी ॥ श्र्लोक सांगणॆ परी वाणी मराठी ॥ न्हणुनी अडलावणें ते खोटी ॥ नाना श्र्लोकांची ॥११॥
म्हणोनी निंदा सांडीजें ॥ हा शिवनिबंध अनुष्ठिजे ॥ तेथें शास्त्राचा द्दष्टांत दिजे ॥ तरी आदी मूळ हें ॥१२॥
आदीमूळ मज शास्त्रशाखा ॥ मूळ्स्तंभींची गायत्री विशेखा ॥ तें गायत्रींपासाव देखा ॥ वेदांसी जन्मी ॥१३॥
आधीं मूळस्तंभ महापुराण मग देदू ॥ येथें तारजयुगींचे वर्तमान ॥ हें भवानीनें पुसिले आपं ॥ शिवें केले कथन ॥ पार्वतीसी ॥११५॥
इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वती संवादे द्वितीयोऽध्यायः समाप्तः
॥२॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2010
TOP