Dictionaries | References

वारणे

   
Script: Devanagari

वारणे     

क्रि.  चुकवणे , टाळणे , निवारणे ;
क्रि.  दूर करणे , बाजूस करणे ;
क्रि.  फेडणे , मुक्त होणे ( कर्ज );
क्रि.  देवाज्ञा होणे , निवर्तणे , मरणे .

वारणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  दूर होईल असे करणे   Ex. गायीने शेपूट हलवून माशा वारल्या.
See : मरणे

वारणे     

उ.क्रि.  ( कों . अशिष्ट ) हांक मारणे ; पुकारणे .
उ.क्रि.  
परावृत्त होणे ; करणे ; प्रतिबंध करणे ; प्रतिकार करणे ; टाळणे ; चुकविणे ; बाजूस करणे , सारणे ( एखादे अनिष्ट वगैरे ). शरणागत व्यसन तो स्वये वारणे । - केका ५६ .
हात वगैरे हालवून घालवून देण , दूर करणे , हांकून देणे ( माशा वगैरे ). तुम्हां लागोनिलियां गौमासिया । तरि वारां जा कां । - शिशु २१९ .
फेडून टाकणे ; मुक्त करणे ( कर्ज वगैरे ).
फिरविणे ; हलविणे ; ढाळणे ( चवरी , मोरचेल वगैरे ). ते चामरे वारिती निर्विकारी । - सारुह ५ . २९ .
सांगण ; कथन करणे . वैद्य पथ्य वारुनि जाये । - ज्ञा ३ . ८ .
वाटेस लावणे ; संभावना करण . भाटाते उचिती वारितू । - शिशु ५२१ . - अक्रि .
( सांकेतिक ) मरणे .
संपणे ; नाहीसे होणे ; दूर होणे ; टळणे ; निभावणे . हळू हळू त्यांचे पुण्य जाते वाड । वारते हे जाड तिमिराचे । - तुगा ४० . हल्ली गडबडही वारली । - समारो १ . ९ . [ सं . वा = टाळणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP