Dictionaries | References

ढळणे

   
Script: Devanagari

ढळणे

 क्रि.  खाली घसरणे , जाग्यावरून हलणे . पदच्युत होणे , सरणे , स्थानभ्रष्ट होणे ;
 क्रि.  कलंडणे , झुकणे ;
 क्रि.  वारणे , हलवणे ( वारा घातल्यसारखे ).

ढळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  ध्येय वा नेम यांपासून चुकणे   Ex. त्याचा निश्चय कधीच ढळला नाही
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  एखाद्या लोभास बळी पडणे   Ex. पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
   see : सरणे

ढळणे

 अ.क्रि.  चलित होणे ; जाग्यावरुन हलणे ; घसरणे ; स्थानभ्रष्ट , पदच्च्युत होणे ; कलंडणे ; डळमळणे ; झुकणे . जैसी तीरी नाव न ढळे । टेकलीसांते । - ज्ञा ७ . ४ . २ रेलणे ; कलणे . ३ ( शरीरप्रकृति ) खालावणे ; ढासळणे ; खचणे . ४ माघार घेणे ; दबणे ; अपयश पदरी येणे ; कचरणे ; हटणे . ५ चुकणे ; न लागणे ; अंतरणे ( ध्येय , नेम यापासून ). ६ ( ल . ) वजन कमी होणे ; मागे पडणे ; विसरले जाणे ; रुढीत नसणे ( वर्चस्व आचार , नियम ). ७ उडणे ; वारली जाणे ( मूर्तीवर चवरी ). कुंचे ढळती दोही बाहीजवळी राही रखुमाई । - तुगा २७८ . ८स्त्रवणे ; गळणे ( अश्रु ). अश्रुबिन्दु ढळती नयनी । - मुआदि २३ . २४ . ९ वाहणे ; सुटणे ( वारा ). म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वते वोळे । - ज्ञा ९ . २८ . १० क्रम बदलणे ; पुढे सरणे . हे कायसेनही न ढळे । अनादि ऐसे । - ज्ञा ११ . ४९७ . [ दे . प्रा . ढल = झुकणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP