Dictionaries | References

ढाळणे

   
Script: Devanagari

ढाळणे

 क्रि.  वारणे , हलवणे ( चवरी );
 क्रि.  गाळणे ( अश्रू ).

ढाळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

ढाळणे

 उ.क्रि.  साफ करणे ; ढेंकळे मोडणे ( नांगरलेल्या जमीनींतील ). २ ( व . ) पाऊस पडल्यानंतर वखरणे . [ ढळणे ]
 उ.क्रि.  १ ( चवरी , पंखा इ० ) हलविणे ; वारणे . वैदर्भी चामरते धरुनि लसदुरोहार ढाळूनि सेवी । - मोकृष्ण ६० . १ . भरत शत्रुघ्न दोघे चवर्‍या ढाळिती - विष्णुदासनामा पद . २ प्रकाशणे ; सतेज दिसणे ( मोती ). ३ अश्रू गाळणे . घोडा असूं ढाळतो . ४ टाकणे ; फेंकणे . धर्म प्रथम फांसे ढाळी । - मुसभा १४ . ३४ . ५ घालणे ; वर ओतणे ; अभिषेक करणे . श्रीगुरुलिगा ढाळी । ध्यानामृत । - ज्ञा १३ . ३८६ .- अक्रि . १ पडणे ; गळणे ( अश्रु ). २ ढाळ होणे . [ ढळणे ; दे . प्रा . ढाल = खाली टाकणे ; चवरी वारणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP