|
वि. ( वयाने , उंचीने , अधिकाराने , योग्यतेने ) लहान , कमी . उद्यां धाकल्या भाऊसाहेबांचा वाढदिवस हाय . - इपं ८ . धाकटा - ( याचा अधवा , मधवा या शब्दांबरोबर उपयोग करतात . ) शेवटचा , सर्वात लहान ; कमी प्रतीचा . धाकटपण , धाकटपणा - नपु . धाकटपणा , धाकुटापणा १ लहानपणा . २ हलकेपणा ; अपमान . आपलेचि आपणु । कांई सांधौ धाकटुपणु । - शिशु १४५ . ०कुंवर पु. ( शेतकरी ) पुष्य नक्षत्र , आठवे नक्षत्र . ०मालेबंद न. एक प्रकारचे झाड . याची उंची एक वीतपासून एक हातपर्यंत असून पान एक बोट रुंद व तीन चार बोटे लांब असते . ०वाडा पु. धाकटी धनीण , राणी ( शाहू छत्रपतीची धाकटी राणी सगुणाबाई हीस म्हणत ). - शारो . धाकटे सरकार पु . १ धन्याचा मुलगा , वारस . २ युवराज ; राजाचा थोरला मुलगा . आपण जाऊन धाकट्या सरकारास भेटावे . - रत्न ३ . २ .
|