|
पु. १ देश अर्थ १ पहा . प्रदेश , प्रांत . शिरवळ सुपे देस । - ऐपो ९ . २ . तुच्छतादर्शक शिवी . - शास्त्रीको . ३ एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत गांधार व धैवत स्वर वर्ज्य . जाति औडुव - संपूर्ण . वादी ऋषभ संवादी पंचम . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . [ सं . देश ] ०क पु. पिढीजात वतनदार ; सरकारी अधिकारी ; प्रायः देशमूख . ०कत की नस्त्री . देसकाचे काम , अधिकारी ; देसाईपणाचा हक्क . कागल प्रांताची पूर्वी देसकत होती ... - मराचिथोरा ४१ . कू ( महानु . ) समूह . आईकैल श्रोतयाचा देसकू । - भाए १६ . ०गौड पु. एक राग . ह्यांत षड्ज , कोमल ऋषभ , पंचम , धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . गांधार व मध्यम स्वर वर्ज्य . जाति औडुव - औडुव . वादी धैवत , संवादी ऋषभ . गानसमय प्राःकाळ . ०धड स्त्री. देशत्याग करण्यासारखी विपत्ती . ०धूळ स्त्री. अतिशय विपन्नावस्था ; पूर्ण कंगाली , दुःख . ०वट देसाळ , देसोळी वि . घाटावरील , देशावरील मनुष्य , प्राणी याच्यासंबंधी . ०वटा पु. १ देशाटण ; मुशाफरी ; प्रवास ; देशांतर . की मानिला प्रभुने तो दसवटाहि उत्सव नवासा । मोवन १० . ७० . २ हकालपट्टी ; हद्दपारी . दुःखास तो देसवटाच द्यावा . - अकक २ - हरिराज - कृत मुद्ग्लाचार्य विरचित रामार्यांचे भाषांतर १०० . देसाई य पु . देशमुखासारखा परगण्याचा वतनदार अधिकारी . ( व . ) देशमुख - देशपांड्यांचे वडील मुलास टोपण नांव . देसी पु . एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत गांधार व धैवत वर्ज्य . जाति औडुवसंपूर्ण . वादी षड्ज . संवादी पंचम . गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर . देसूर पु . मांगांतील एक पोट जात . ही खानदेश जिल्ह्यांत आढळते . - अस्पृ ४७ . देसुरी वि . देशावरील . तिखटाचा गोळा खाणारे देसुरी लोक अधिक बळकट असतात . - सहस्त्रबुद्धे शिक्षणमीमांसा २०४ . देसोधडी , देसोधडीस देशधडी पहा .
|