Dictionaries | References क कर्ज Script: Devanagari Meaning Related Words कर्ज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ऋण, उधार, उधार कर्ज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Debt. कर्ज लागणें To become a debtor; as हा-ही-हें कर्ज लागतो-ती-तें He &c. owes. डोईवरून पाणी जाई इतकें कर्ज असणें To be over head and ears in debt. कर्ज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Debt. कर्ज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उसना पैसा , ऋण , देणे . कर्ज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ठरावीक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य Ex. त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले. HYPONYMY:तगाई ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ऋण उसनेWordnet:asmঋণ bdदाहार benঋণ gujલોન hinऋण kanಸಾಲ kasقَرٕٕض kokरीण malവായ്പ mniꯁꯦꯜ꯭ꯄꯨꯕ oriଋଣ panਕਰਜਾ sanऋणम् tamகடன் telఅప్పు urdقرض , ادھار See : उधार कर्ज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ऋण ; दुसर्यापासुन उसनें घेतलेलें द्रव्यज ; खर्चासाठीं परत देण्याच्या बोलीनें काढलेली रक्कम ; ठराविक व्याजानें दुसर्या कडुन उसनवार घेतलेली रक्कम ; कर्जाचें ऋणकोसंबंधी पांच व धनको . संबंधी दोन असे सात प्रकार आहेत . ( अर . कर्झ ; सं . तुल०कर्ज् = पीडा देणें )०लागणें क्रि . ऋणकरी होणें . ' हा माझें कर्ज लागतो .' डोइवरुन पाणी जाई इतकें कर्ज असणें - अतिशय कर्ज असणें ; कर्जात बुडून राहाणें .०अमदान स्त्री. परत किंवा वसुल आलेल्या कर्जाची जमाखर्चाच्या वहींतील बाजू ; कर्जफेडीसाठीं आलेली रक्कम जेथें जमा केली असते ती हिशेबाची बाजू ; कर्जदारान पहा . ( अर . कर्झ + आमदनि )०करी पु. १ ऋणकरी ; ऋणको . २ धनको ; कर्जाऊ रक्कम देणारा . ३ कर्जादरांना तगादा लावणारा नोकर , माणुस , शिपाई , अधिकारी .०खत न. कर्ज घेतल्याबद्दल ऋनकोनें धनकोस लिहुन द्यावयाचा कागद ; कर्जरोख ; ऋणपत्र .०दादन न. परतफेड म्हणुन वसूल आलेल्या कर्जाची जमाखर्चाच्या वहींतील बाजू ; कर्जफेडीसाठीं दिलेली रक्कम जेथें मांड्ली जाते ती जमाबाजू ; कर्जफेडीसाठीं दिलेली रक्कम जेथें मांडली जाते ते एजमा खर्चाची बाजू ; कर्ज अमदान पहा . ( फा . कर्झ + दादन )०दार वि. १ कर्जकरी ; ऋणकरी ; ऋणको .' सबब नादारीस आलों आणि लोकांचें कर्जदारी जाहलों .' - रा १३ . ९१ . २ धनको . ' तर्फ मजकुरची रयत कर्जदार ( ऋणको ) जाली आहे त्यास कर्जदारांचे ( धनकोची ) निकड होते आणि द्यावयासी अवसर नाहीं .' - वाडसमा २ . २२५ . ( फा . कर्झ + दार )०दारी स्त्री. ऋणकोपणा .०पाणी न. कर्जवाम ; कर्ज या शब्दास व्यापक संज्ञा .०बंदी वि. ऋणको . ' खायावांचुण बैल मेले , कर्जबंदी झाला .' - पला ८६ . ( कर्ज + बंदी )०बाजारी वि. ज्यास अनेकांचें कर्ज आहे असा ; देणेदार ; ज्यास फार कर्ज आद्दे असा ( माणुस .) ( अर . कर्झ + बाझार )०भरी रू वि . कर्जबाजारी ; देणेदार . ' आपण कर्ज भरू होतात .' - बाळ २ . १२९ . ( कर्ज + भरणें .)०रोखा पु. कर्जखत पहा . ( क्रि० लिहून देणें ; घेणें ) ( फा .)०वाम न. ऋण ; देणें , ' साहुकाराच्या योगानें राज्य आबादान होतें ... पडलें संकट प्रसंगीं कर्जवाम पाहिजे तें मिळतें .'- मराआ २० . ( अर . कर्झ + फा . वाम् ) कर्ज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोईवरून पाणी जाई इतके कर्ज असणेंकर्जात पूर्णपणे बुडणेंअतिशय कर्ज असणें. कर्ज Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कर्ज r. 1st cl. (कर्जति) To pain or make uneasy. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP